राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार. sakal
सप्तरंग

क्रिकेट समजलेला अभ्यासू संघटक, पवारसाहेबांनी आयुष्याचं शतक पूर्ण करावं - गावस्कर

जेव्हा शरद पवारांनी ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’च्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

सूरज यादव

मुंबई (Mumbai) क्रिकेट असोसिएशन’चा कारभार हाती घेतल्यावर शरद पवारसाहेबांनी (Sharad Pawar) क्रिकेट संदर्भातील काम आणि निर्णय क्रिकेटर्सच्या हाती सोपवले. तसेच ‘गरवारे क्लब हाऊस’ आणि ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’मधला वाद दोन महिन्यांत संपवला. पवारसाहेबांची ही खासियत आहे, की ते जी जबाबदारी घेतात, ती पूर्ण करतात आणि ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात, त्याला संपूर्ण पाठिंबा देत काम करायची मोकळीक देतात. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळेच त्यांनी कारभार हाती घेतल्यावर ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’, ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ’ आणि ‘इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल’च्या क्रिकेटविषयक निर्णयांमध्ये खूप प्रगती झाली.

तसे बघायला गेले, तर पवारसाहेब आणि गावसकर कुटुंबीयांचे संबंध जुने आहेत. त्यांनीच मला एकदा अगदी जुना मजेदार किस्सा सांगितला होता. माझे अाजोबा अप्पासाहेब गावसकर उभा दांडा, वेंगुर्ला गावात राहत असताना एकदा एका स्थानिक बैठकीकरता पवारसाहेब गेले होते. अप्पासाहेबांना गावात मान असल्याने त्यांना पण बैठकीचे निमंत्रण होते. बैठक सुरू होण्याची वेळ झाली, तरी अप्पासाहेब आले नाहीत म्हणून संयोजक थांबले होते. काही वेळानंतर वाट बघून बैठकीचा कार्यक्रम सुरू झाला आणि स्थानिक नेत्याने जोरदार भाषण करताना गावातील रस्ते कसे सुधारले वगैरे सांगितले. नंतर अप्पासाहेब आले आणि पहिल्या रांगेत बसले. सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने अप्पासाहेबांना ‘उशीर का झाला,’ असे विचारले असता गावातील रस्त्याची कशी दुर्दशा झाली आहे, त्यामुळेच आपल्याला यायला उशीर झाला असल्याचे ठणकावून सांगिल्याने स्थानिक नेत्याची दांडी गुल झाली आणि सगळे हसू लागले. असा मजेदार किस्सा सांगितला होता. शरद पवारसाहेबांच्या विनोदबुद्धीचे ते एक प्रतीक होते.

२००१ सालची गोष्ट असेल. जेव्हा शरद पवारांनी ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’च्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. कर्मधर्मसंयोगाने आम्ही दोघे लंडनला जाणाऱ्या विमानात एकत्र होतो. निवडणूक जिंकून सूत्रे हाती आली, तर काय मुख्य गोष्टी करायला हव्यात, असे त्यांनी मला विचारले होते. क्रिकेटसंदर्भातील काम आणि निर्णय क्रिकेटर्सच्या हाती द्यायला हवेत आणि ‘गरवारे क्लब हाऊस’ आणि ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’मधला कोर्टात गेलेला वाद मिटायला पाहिजे. कारण त्याने फक्त वकिलांचा फायदा होतो. अशा दोन गोष्टी मी सुचवल्या होत्या. निवडणूक जिंकून कारभार हाती घेतल्यावर शरद पवारसाहेबांनी क्रिकेटसंदर्भातील काम आणि निर्णय क्रिकेटर्सच्या हाती सोपवले. तसेच ‘गरवारे क्लब हाऊस’ आणि ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’मधला वाद दोन महिन्यांत संपवला. त्यांची ही खासियत आहे, की पवारसाहेब जी जबाबदारी घेतात, ती पूर्ण करतात आणि ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात, त्याला संपूर्ण पाठिंबा देत काम करायची मोकळीक देतात. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळेच त्यांनी कारभार हाती घेतल्यावर ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’, ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ’ आणि ‘इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल’च्या क्रिकेटविषयक निर्णयामध्ये खूप प्रगती झाली.

मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे ‘आयपीएल’ स्पर्धा सुरू करण्यामागे पवारसाहेबांची मोठी भूमिका होती. ललित मोदी यांनी ती राबवली असली, तरी त्या निर्णय प्रक्रियेत बोर्डाचे अध्यक्ष म्हणून पवारसाहेबांचे मोठे योगदान आहे. ‘आयपीएल’ सुरू करण्यावरून बोर्डाच्या सदस्यांमध्ये शंका होत्या, की अशी स्पर्धा सुरू केली, तर प्रत्येक संघाच्या चालकांची मक्तेदारी सुरू होईल आणि राज्य क्रिकेट संघटनांचे महत्त्व कमी होईल. पवारसाहेबांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन, चर्चा करून सर्व शंका दूर केल्या आणि बोर्डाने ‘आयपीएल’ स्पर्धा भरवण्याकडे २००८ साली वाटचाल केली.

माजी खेळाडूंना निवृत्तिवेतन देण्याचा असो, की एकरकमी मोठे मानधन देण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा पवारसाहेबांनी मंडळात मंडला होता, हे विसरून चालणार नाही. त्याकरता क्रिकेटपटू हे पवारसाहेबांचे ऋणी आहेत.

साहेबांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देताना माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे, की त्यांना असे दीर्घायुष्य मिळावे, की क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या पवारसाहेबांनी आयुष्याचे शतकसुद्धा पूर्ण करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT