सप्तरंग

#InnovativeMinds संगम लक्ष्मी अन्‌ सरस्वतीचा!

अभय जेरे

भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकतीच ‘अटल रॅंकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्‌स’ची (एआरआयआयए) स्थापना केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन्सबद्दलची वातावरणनिर्मिती करण्यासाठी उच्च शिक्षण संस्था देत असलेल्या सुविधा आणि त्यांचा दर्जा याचे मूल्यांकन ‘एआरआयआयए’ करेल व त्यांची श्रेणी ठरवेल. मोठी क्षमता असलेले एकमेवाद्वितीय व भविष्यवेधी इनोव्हेशन करणाऱ्या संस्थांची निवड याद्वारे केली जाईल. ‘एआरआयआयए’च्या स्थापनेमुळे भारताचे उच्च व तांत्रिक शिक्षणाचे क्षितिज विस्तारेल व सर्व महत्त्वाच्या संस्था प्रेरित होऊन आपले मुख्य ध्येय ‘इनोव्हेशन’ हेच ठेवतील, यात शंका नाही. 

‘एआरआयआयए’ संस्थांना त्यांच्या ध्येयात बदल घडवून त्यांना कल्पना, प्रकल्प आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित करेल. इनोव्हेशनचे पेटंट मिळविणे, त्याचे व्यापारीकरण करून रेव्हेन्यू मॉडेल विकसित करण्यास मदत केली जाईल. हा खऱ्या अर्थाने लक्ष्मी आणि सरस्वतीचा संगम आहे! सध्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्‍स (जीआयआय) क्रमवारीमध्ये भारताचा क्रमांक ५७ वा आहे. माल्टा, क्रोएशिया, मंगोलिया, सायप्रससारखे छोटे देशही आपल्या पुढे आहेत. चीन सतराव्या क्रमांकावर असून, स्वित्झर्लंड सर्वाधिक इनोव्हेशन करणारा देश आहे. 

भारताला देशाची ‘प्रयोगशाळा’ व ग्लोबल इनोव्हेशनचे केंद्र बनायचे असल्यास ‘तरुण मनां’ना फुलण्याची संधी द्यायला पाहिजे. त्यासाठी योग्य वातावरणनिर्मिती करून त्यांच्या कल्पनांना जागतिक दर्जाच्या उत्पादनांमध्ये रूपांतरित करायला हवे. हे साध्य करण्यासाठी आपल्याकडील व्यवस्थांची पुनर्बांधणी करावी लागेल आणि सर्व संबंधित घटकांना इनोव्हेशला पाठिंबा देण्यासाठी संवेदनशील बनवावे लागेल. अर्थात अटल टिंकेरिंग लॅब्ज, हायर एज्युकेशन फंडिंग एजन्सी, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन आदी प्रयत्नांतून इनोव्हेशनची संस्कृती रुजविली जात आहे. 

एआरआयआयएची निर्मिती या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल आहे. जगभरामध्ये शैक्षणिक संस्थांची क्रमवारी ठरवताना केवळ ‘निकाल’ काय आहे, यावर लक्ष केंद्रित केले जाते. मात्र, भारतातील इनोव्हेशचे क्षेत्र अद्याप विकसित होत असल्याने आपल्याला त्याचे मूल्यमापन तीन निकषांच्या आधारे करावे लागेल -  

१)     दिली जाणारी मदत (इनपुट) - इनोव्हेशनमध्ये केली जाणारी गुंतवणूक आणि मूलभूत सुविधा. 

२) पद्धत (प्रोसेस) - इनोव्हेशच्या निर्मितीसाठी व्यवस्था बसविणे व सुयोग्य प्री-इनक्‍युबेशन आणि इनक्‍युबेशनला पाठिंबा.

३) योजनेचे यश (आउटकम) - विकसित तंत्रज्ञानाचे व्यापारी तत्त्वावरील उत्पादनांसाठीचे हस्तांतर, तसेच उद्योगांना पेटंट देणे व फायद्यातील स्टार्टअप उभारून मिळालेला महसूल याचे मोजमाप.

संस्थांचे या तिन्ही निकषांच्या आधारे मूल्यांकन केले जाईल. यामध्ये संस्थेच्या व्यवस्थापनाने इनोव्हेशसाठी केलेली गुंतवणूक, दिलेल्या मूलभूत सुविधांच्या आधारे विश्‍लेषण होईल. दैनंदिन व्यवहारांतील इनोव्हेशन, विशेष अभ्यासक्रमांची निर्मिती, आयपीआर व आंत्रप्रेन्युअरशिप विकसित करण्यासाठीच्या पर्यायांचा विचार मूल्यांकनावेळी केला जाईल. एआरआयआयए शिक्षकांकडून निर्माण केले गेलेले स्टार्टअप व त्यांचा विकास यांचा मूल्यांकनासाठी विचार करेल. ‘एआरआयआयए’ गुंतवणूक आणि कार्यपद्धतीची मोजणी करणार असली, तरी सर्वाधिक महत्त्व त्यातील यशाला देणार आहे. हे यश इनोव्हेशन्सची संख्या आणि त्यांच्या दर्जाच्या आधारे मोजले जाईल. यातील महत्त्वाचा घटक यशस्वी स्टार्टअपची निर्मिती, तंत्रज्ञानाचे व्यावसायिक वापरासाठीचे हस्तांतर व त्याद्वारे पेटंट व उद्योगांकडून मिळालेला आर्थिक फायदा, हा असेल.

या क्षेत्रातील काही ‘थॉट लीडर्स’ संस्था ‘एआरआयआयए’सारख्या संस्थांकडून होणाऱ्या मूल्यांकनासाठी तयार होतील का, असा प्रश्‍न विचारतील. ‘त्यांनी त्यासाठी लवकरात लवकर तयार व्हावे,’ हेच त्याचे यश आहे. ‘एआरआयआयए’ इनोव्हेशची संस्कृती येणाऱ्या काही वर्षांत सर्व शैक्षणिक संस्थांच्या ‘डीएनए’मध्ये खोलपर्यंत रुजण्यासाठी प्रयत्नशील असेल. शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत संस्थांपुढे दोनच पर्याय आहेत, इनोव्हेशन करा अथवा नाहीसे व्हा...  (क्रमश-)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT