SYSTEM
SYSTEM
सप्तरंग

मायभूमीने केलेला प्रेरणादायी सन्मान

सकाळ वृत्तसेवा

लेखक - के. सी. पांडे
सैनिक आयुष्यभर देशाची सेवा करत असतो. तेथे त्याच्यावर झालेले संस्कार त्याला अखंड आयुष्यासाठी ऊर्जेचा स्रोत ठरतात. अशाचा सैनिकांना निवृत्तीनंतरही त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले होते. त्यात माझा झालेला सन्मान हा मायभूमीने भूमिपुत्राचा केलेला आणि कायम प्रेरणा देणारा ठरला आहे.



जिसकी माँ की हिफाजत में
मैने जवानी के दिन जिये है
उसी धरती के आंचल ने
मुझे आज हिरे-मोती दिये है


आपल्या व्यवसायात कितीही मोठे अथवा प्रसिद्ध झालो, तरी ते यश मर्यादित स्वरूपाचे असते. आपल्याला मिळालेल्या यशावर जोपर्यंत आपण ज्या देशाचे आहोत, तेथील शासनाचे अथवा राज्यकर्त्यांचे आपल्याला पाठबळ मिळत नाही किंवा जोपर्यंत आपली दखल घेतली जात नाही, तोपर्यंत ते यश अपूर्णच असते. तुमची कला, तुमचं कौशल्य यास राजाश्रय मिळणे गरजेचे असते. भारत सरकारच्या संरक्षण विभागाने २०१३ मध्ये ‘सारे जहाँ से अच्छा हमारा फौजी के. सी. पांडे’ ही दूरदर्शनतर्फे गारगोटचा प्रवास व मी अशी यशोगाथा डॉक्युमेंटरी फिल्मची निर्मिती करून दूरदर्शनच्या ‘प्राइम टाइम’मध्ये प्रसारित केली. एक प्रकारे भारत सरकारतर्फे गारगोटी संग्रहालयाचा हा यथोचित सन्मान होता.


तेव्हा ए. के. अँटोनी देशाचे संरक्षणमंत्री होते. संरक्षण विभागात काम केलेले व सध्या निवृत्त झालेले असे माजी सैनिक, की आयुष्यात त्यांनी काही वेगळे उल्लेखनीय असे केले आहे, त्यांची माहिती संरक्षण विभागाकडून मागविली गेली. त्यामागील उद्देश असा होता, एक सैनिक आपल्या आयुष्याचा उमेदीच्या, तारुण्याच्या काळात आपल्या कुटुंब, मुलं, आई-वडील यांच्यापासून दूर राहून देशाची अविरतपणे सेवा करतो, त्याची दखल घेतली जावी, संरक्षण खात्यात काम करीत असताना निवृत्तीनंतरही त्यांना प्रोत्साहित केले गेले पाहिजे, त्याबद्दलची माहिती सर्वदूर पोचली पाहिजे, असा होता. सैनिक बोर्ड यांच्यामार्फत माझ्याबद्दलची माहिती ही संरक्षण खात्याला कळविली गेली. संपूर्ण देशातून अशी अनेकांची माहिती दिली गेली. सरकारने सर्वांची माहिती संकलित करून त्याची एक शॉर्टलिस्ट तयार केली व अंतिम २६ माजी सैनिकांची यादी निश्चित केली, की ज्यांनी खरंच व्यावसायिक अथवा सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदान दिले होते.

विशेष म्हणजे या २६ माजी सैनिकांमध्ये सर्व प्रकारच्या पदांवर काम केलेली व्यक्ती होती. त्यात माझेही नाव होते, जिल्हा सैनिक बोर्डाकडून मला कळविण्यात आले संरक्षण खात्याने तुमच्या नावाची निवड केली आहे. मी ही कुतूहलापोटी विचारले निवड केली म्हणजे नेमकी कशासाठी?
या २६ लोकांची केंद्र सरकारने डॉक्युमेंटरी बनविण्याचे ठरविले होते. त्याची स्टोरी करून दूरदर्शनवर प्राइम टाइममध्ये ती प्रसारित करणार होते. २०१३ मध्ये दूरदर्शनच्या टीमने माझ्याशी संपर्क साधला. माझ्याबद्दलची सर्व माहिती घेऊन त्यांच्या संपूर्ण टीमने माझ्या गावी, दिल्लीतील माझं म्युझियम, गारगोटी संग्रहालय, माझे दोन्ही बंगले, मी गारगोटी संकलित केलेल्या निवडक ठिकाणी भेट दिली. त्या परिसरातील चित्रीकरण करून माझ्याबद्दलची डॉक्युमेंटरी फिल्म तयार केली गेली. त्यासाठी जवळपास पाच महिन्यांचा कालावधी लागला. सैनिक देशासाठी, तर सेवा करतोच; पण त्याच्या उर्वरित आयुष्यातही सेवा कालावधीत झालेल्या संस्कारामुळे त्याच्या पुढील आयुष्यातही त्याला यशस्वी होण्यासाठी कायम ऊर्जा मिळत असते.

जागतिक पातळीवरही मला अनेकदा वेगवेगळ्या समारंभांत, प्रदर्शनात गुणगौरव करून सन्मानित करण्यात आले होते. पण आपण कितीही मोठे झालो आपल्या मातीला, आपल्या आईला, देशाला कधीही विसरू शकत नाही ही कल्पनाच आपण करू शकत नाही. नेव्हीमधील सेवेमुळे आयुष्याला एक प्रकारे चकाकी देण्याच काम झाले. त्यामुळेच पुढील आयुष्याच्या खडतर वाटचालीतही मी सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशस्वी झालो. सरकारतर्फे दूरदर्शनतर्फे करण्यात आलेली माझी डॉक्युमेंटरी ही म्हणजे मायभूमीकडून भूमिपुत्राचा करण्यात आलेला सन्मान, मला आयुष्यभर प्रेरित करीत राहिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: महाराष्ट्रात सभा घेतल्या पण मराठा आरक्षणाबद्दल PM मोदी का बोलले नाहीत? CM शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Ghatkopar Hoarding Collapse: भावेश भिंडे कोणाचा पार्टनर? घाटकोपरच्या दुर्घटनेवरून नितेश राणे यांचे गंभीर आरोप

Marathi News Live Update: नाशिकमध्ये गंगाधरी गावाजवळ एसटी-अल्टोचा अपघात; अडीच वर्षांचं बाळ गंभीर जखमी

EPFO: आनंदाची बातमी! EPFOने घेतला मोठा निर्णय; 6 कोटी PF खातेधारकांना होणार फायदा

Rapid and Blitz 2024 : मॅग्नस कार्लसन विजेता! डी. गुकेश अखेरच्या स्थानी

SCROLL FOR NEXT