manthan foundation hiv positive women life journey Sakal
सप्तरंग

कहाणी वेदनादायी आयुष्याची

पुण्यातल्या आमच्या कार्यालयातले काम संपता संपता रात्री दहा कधी वाजले हे कळलं नाही. आम्ही मुंबईकडं निघालो. माझा सारथी गणेशने गाडी काढली.

संदीप काळे saptrang@esakal.com

पुण्यातल्या आमच्या कार्यालयातले काम संपता संपता रात्री दहा कधी वाजले हे कळलं नाही. आम्ही मुंबईकडं निघालो. माझा सारथी गणेशने गाडी काढली. आम्ही रस्त्याने पुढे निघालो. थोडा वेळ पुढे गेल्यावर गणेश म्हणाला, ‘‘मला खूप आळस आल्यासारखं वाटतंय, मी चहा घेतो.

आपण दहा मिनिटे थांबू या.’’ मी ‘ठीक’ आहे म्हणत मान हलवली. गणेश गाडी बाजूला लावत समोरच्या चहाच्या टपरीवर गेला. बराच वेळाने माझी नजर त्या चहाच्या टपरीकडे गेली. एक महिला त्या टपरीच्या बाहेर भांडी घासत होती.

दुसरी महिला चहा गरम करत होती. मी जेव्हा त्या दोन्ही महिलांकडे बारकाईने पाहिलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं, त्या दोघींच्याही कपाळावर कुंकू नाही. त्यांचा चेहरा एकदम खंगला होता. डोळे खोल खोल गेले होते.

त्यांच्या यजमानाच्या पश्‍चात त्या चहाची टपरी चालवत असतील, असा मी प्राथमिक अंदाज लावत होतो. मी त्यांच्याजवळ गेलो आणि म्हणालो, ‘‘कधी निघणार आहात घरी. आटोपले नाही का अजून?’’ त्या दोन्ही महिलांनी माझ्याकडं पाहिलं आणि त्या मला म्हणाल्या, ‘‘नाही दादा, निघतो आता.’’

त्यांच्या बोलण्यावरून त्या महिला उत्तर प्रदेशच्या आहेत हे माझ्या लक्षात आले. मी त्या महिलांशी बोलत होतो, त्या कोण आहेत? कुठल्या आहेत? इथे केव्हापासून चहाची टपरी चालवतात, अशा मी त्यांच्यासोबत गप्पा मारत होतो. त्यांच्या घरातला कर्ता पुरुष कुणीतरी गेल्यानंतर त्या महिला ती चहाची टपरी चालवत असतील, हा माझा अंदाज अगदी चुकीचा ठरला.

आम्ही खूप वेळ बोलत होतो. दोन्ही हातात दोन बॅगा आणि डोक्यावर स्टोव्‍ह घेत त्या महिला चालायला लागल्या. मीही बोलत बोलत त्यांच्यासोबत निघालो. त्या मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही तर मुंबईला निघाला होतात ना?’’ मी म्हणालो, ‘‘जायचं आहे मला.

आपण जरा गप्पा मारू या.’’ मी त्यांच्यासोबत जो वेळ घालवला, त्यांच्याशी केलेल्या संवादामधून जे कळलं ते सारं धक्कादायक होतं. काय एखाद्याचं आयुष्य असतं. बापरे ! संपूर्ण आयुष्य गेल्यावर माणसाला कळायला लागतं. आपण आयुष्यभर चुकीचं वागलो. या दोन्ही महिलांचं असंच होतं.

गौतमी आणि शिवगामिनी बारी (खरी नावे बदलली आहेत) या दोघी सख्ख्या बहिणी. वयाच्या विसाव्या वर्षी दोघीही घरातून बाहेर पडल्या. एका मित्राच्या मदतीनं त्यांनी दिल्ली गाठली आणि चित्रपटात काम करायचं, या उद्देशानं त्या दिल्लीमध्ये फिरत होत्या. मुंबईत अधिक संधी आहे हे कळाल्यावर त्या मुंबईमध्ये आल्या.

मुंबईमध्ये आल्यावर त्यांच्या लक्षात आलं, आपण समजतो तसं काही नाही. इथं तर हजारोंची चित्रपटांत काम करण्यासाठी रांग आहे. इथं पहिल्यांदा स्वतःला विका आणि मग पैसे मिळवा, असंच समोर यायचं. जगायचं होतं आणि स्वतःला सिद्धही करायचं होतं.

काही वर्षांत त्या दोन्ही बहिणींनी वाममार्गाच्या सर्व सीमा ओलांडल्या. स्वतःला सिद्ध करायचं असेल, तर प्रचंड पैसा पाहिजे. याच विचारावर त्या दोन्ही बहिणींनी रोज आपलं शरीर विकायला काढलं. या रेड लाइट एरियामधून, त्या रेड लाइट एरियामध्ये त्यांचे जाणं व्हायचं.

पुण्यातल्या ‘त्या’ रेड लाइट एरियामध्ये मी त्यांच्या घरी पोहोचलो. घर कसलं, दहा बाय दहाचे जुन्या लाकडाचे ते घर होतं. एका तुटक्या खुर्चीमध्ये त्यांनी मला बसायला लावलं. एका कागदामध्ये बांधलेला वडापाव त्या दोघींनी खाल्ला.

मलाही त्यांनी खाण्यासाठी विचारले. बोलता बोलता त्या दोन्ही महिला खूप रडायला लागल्या. सोबत असलेली महिला त्यांची समजूत काढीत होती. गौतमी म्हणाली, ‘‘चला सकाळी तपासायला जायचंय, रेशनही घेऊन यायचं आहे.’’ मी म्हणालो, ‘‘कुठे जाताय?’’ त्या दोघींनीही सांगितले, त्या दोघी एचआयव्हीबाधित होत्या.

कधी मरणार हे त्यांना माहिती नव्हतं. त्यांनी देहविक्री करणाऱ्या अनेक महिलांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, अनेक महिलांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी पुढाकार घेतला. अनेक सामाजिक कार्यात त्यांचं योगदान होतं.

ज्या ‘मंथन’ फाउंडेशननं त्या महिलेसह शेकडो महिलांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे समोर आणले आहे, त्या ‘मंथन’च्या सर्वेसर्वा आशा भट्ट यांनी या महिलांच्या औषध, नियमित तपासणीची जबाबदारी घेतली; तर रोजच्या संगोपनाची, जगण्याची जबाबदारी घेतली सामाजिक कार्यकर्ते शेखर मुंदडा यांनी.

त्या दोघांना भेटायचं, असं मी ठरवलं. मी त्या दोन्ही महिलांना भेटून तिथून निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी औंध येथे राहणाऱ्या आशा भट्ट (७३५००१६५७१) यांना भेटलो. रेड लाइट एरियामधील महिलांसाठी खूप मोठे सामाजिक काम त्यांनी उभं केलं होतं.

त्या मला बोलताना म्हणाल्या, ‘‘मी आणि माझी वीस लोकांची टीम या महिलांच्या नेहमी संपर्कात असते. त्यांची रोज तपासणी, औषधं, समुपदेशनाची जबाबदारी आम्ही घेतली आहे.’’ आशा भट्ट तिथे असणाऱ्या अनेक महिलांच्या बाबतीतल्या मरणयातना मला सांगत होत्या.

आशा यांनी अनुभवलेल्या अनेक घटना थक्क करणाऱ्या होत्या. मी आशा भट्ट यांच्याकडून गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर रामविलास मुंदडा (९८६०७५५५४४) यांच्याकडं गेलो. मुंदडा यांनी सेवाभावी कार्यात जे काम उभे केले, ते काम पाहून कुणीही थक्क होईल. मुंदडा मला त्यांच्या सामाजिक कार्याविषयी सांगत होते. मुंदडा यांचं अनेक क्षेत्रांत मोठं सामाजिक योगदान आहे.

मी मुंदडा यांचा निरोप घेऊन माझ्या बुधवार पेठ कार्यालयाच्या दिशेने निघालो. रस्त्यात त्या महिला भर उन्हात काम करीत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यायला हवी. तसंच सहकार्याचा हातही आपण द्यायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT