Marathi Literature Sakal
सप्तरंग

स्वागत नव्या पुस्तकांचे

श्रीपाल सबनीस यांची भाषणे आणि अंजली धडफळे यांचा योगप्रवास या पुस्तकांमधून समाज, साहित्य, अध्यात्म आणि अनुभवांचे चिंतनात्मक दर्शन घडते.

सकाळ वृत्तसेवा

वृत्तांकनातील डॉ. श्रीपाल सबनीसांचे विचारदर्शन

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी महाराष्ट्रासह भारतात विविध ठिकाणी कार्यक्रमांना गेल्यावर तिथे जी भाषणे केली, मुलाखती दिल्या आणि त्या कार्यक्रमांचे जे वृत्त वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले, त्यांपैकी काहींचे संकलन ह्या पुस्तकात करण्यात आले आहे. डॉ. सुधाकर न्हाळदे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. मराठी भाषा, समाज, संगीत, कला, राजकारण-अर्थकारण, दहशतवाद, धर्म-अधर्म संघर्ष यांसह विविध विषयांवरील विचार या पुस्तकात संकलित झाले आहेत.

वैशिष्ट्य : विविध विषयांवरील विचारांचे संकलन व दिनांकानुसार मांडणी. प्रकाशक : वेदांत पब्लिकेशन्स

पृष्ठे : ३४४ मूल्य : ४०० रु.

योग माझा सांगाती

अंजली धडफळे यांनी योगाभ्यास प्रवासाची मांडणी या पुस्तकातून केली आहे. योगाभ्यास करताना त्यात सहजता कशी आली, ताण कसा गेला, कोणते बदल होत गेले, योग शिकवताना काय अनुभव आले यांसह विविध मुद्द्यांवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला आहे. मन, अध्यात्म, ध्यान, योगाचे व्यापारीकरण, निवासी योग शिबिर, दिनक्रम व आहार आदी घटकांबाबतची माहिती धडफळे यांनी आपल्या अनुभवातून आणि चिंतनातून मांडली आहे.

वैशिष्ट्य : साध्या-सोप्या शब्दांत अवघड विषयाची मांडणी व मार्गदर्शन. प्रकाशक : मिहाना पब्लिकेशन्स

पृष्ठे : १२० मूल्य : १७५ रु.

कार्यकर्ता

लोकसाधनेचं उत्तुंग स्वप्न पाहणाऱ्या डॉ. राजा दांडेकर यांची ही आत्मकथा असून, ती सुमेध वडावाला (रिसबूड) यांनी शब्दबद्ध केली आहे. सार्वत्रिक शिक्षणाचं कार्य हाती घेऊन लोकनिर्माणासाठी केलेली ४५ वर्षांची ‘लोकसाधना’ या पुस्तकात उलगडून दाखवण्यात आली आहे. कोकणातल्या अतिदुर्गम गुडघे गावातून आलेली एक व्यक्ती अत्यंत खडतर परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण करते आणि समाजकार्याची आस धरते. या प्रवासात त्या व्यक्तीला कोणकोणत्या अडचणी येतात आणि त्यावर ती कशा प्रकारे मात करत जाते, याची प्रेरणादायी गाथा या पुस्तकात आहे.

वैशिष्ट्य : सोप्या शब्दांतली मांडणी. लोकसाधना संस्थेची वाटचाल उलगडणारी छायाचित्रे व थोरामोठ्यांच्या शुभेच्छापत्रांचा समावेश.

प्रकाशक : उन्मेष प्रकाशन, पुणे पृष्ठे : ३५० मूल्य : ५०० रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कृषी खातं म्हणजे त्रास? क्रीडा खात्याचं बरं होतं, लय त्रास नव्हता, मंत्री भरणेंचं विधान; स्पष्टीकरणही दिलं

Asia Cup 2025 साठी पाकिस्तान संघाची घोषणा! बाबर आझम, रिझवानला डच्चू; पाहा कोण झालं कर्णधार

Asim Munir : 'अल्लाहनं मला रक्षक म्हणून पाठवलंय...'; ऑपरेशन सिंदूरमध्ये पराभूत झाल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानचे लष्करप्रमुख?

Success Story: ऊसतोड कामगाराची लेक ठरली मुंबई पोलिसांत; गावकऱ्यांचा अभिमान वाढला

Bihar Elections 2025 : बिहारमध्ये गुंतवणूकदारांसाठी पायघड्या; नीतिशकुमार यांची आर्थिक विशेष पॅकेजची घोषणा

SCROLL FOR NEXT