International Yoga Day 2024 article esakal
सप्तरंग

सह्याद्रीचा माथा : 'प्रत्येक दिवस व्हावा योग दिन'

International Yoga Day 2024 : २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला. सर्वाधिक देशांच्या समर्थनाने आणि मतदानाशिवाय योग दिनाचा प्रस्ताव पारीत होणं, हे भारताच्या योग सामर्थ्यावर जागतिक विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासारखंच होतं.

लेखक : डॉ. राहुल रनाळकर

'आंतरराष्ट्रीय योग दिना'चा प्रारंभ २०१४ मध्ये झाला. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर झालेल्या संयुक्त राष्ट्र सभेच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी 'आंतरराष्ट्रीय योग दिना'चा प्रस्ताव मांडला. आजवरच्या जगाच्या इतिहासातील सर्वाधिक म्हणजेच १७७ देशांचा या प्रस्तावाला पाठिंबा मिळाला.

विशेष म्हणजे या प्रस्तावासाठी मतदान घेण्यात आले नव्हते. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला. सर्वाधिक देशांच्या समर्थनाने आणि मतदानाशिवाय योग दिनाचा प्रस्ताव पारीत होणं, हे भारताच्या योग सामर्थ्यावर जागतिक विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासारखंच होतं.  (saptarang latest article on world yoga day)

२१ जून हा संपूर्ण वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो, म्हणून २१ जून हा दिवस योग दिनासाठी निवडण्यात आला. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन संयुक्त अरब अमिराती आणि इजिप्त या मुस्लिम राष्ट्रांमध्येही साजरा होतो. 'योगा डे' हा सध्या प्रचलित शब्द असला तरी खरा शब्द 'योगा' नसून 'योग' हा आहे. योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य अशी संपत्ती आहे.

गेल्या ९ वर्षांमध्ये योग दिन हा जगभर प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. आपल्या देशातही योग दिनाचे कार्यक्रम जल्लोषात होतात. मात्र, योग दिनापुरते या विषयाचे महत्त्व न राहता, ३६५ दिवस राहायला हवे. म्हणून योग दिन रोज साजरा करता येणे शक्य आहे, अनेक व्यक्ती, संघटना या दिशेने कार्यरत आहेत. पण त्या दिवसाची सुरुवात २१ जूनपासून नक्कीच होऊ शकते. 

शालेय अभ्यासक्रमात योग विषयाचा समावेश व्हावा, हे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरु आहेत, पण अजून त्यात यश आलेलं नाही. खरं तर आजवर हा निर्णय होणं अपेक्षित होतं. परदेशातील अनेक शाळांमध्ये योगविषयक शिक्षण दिले जातं, हे विशेष. योग विषयाला आपल्याकडे धार्मिक चष्म्यातून पाहिले जाते, जे सर्वथा चूक आहे.

ही बाब जर खरी असती तर मुस्लिम राष्ट्रांमध्ये योग विषयक कार्यक्रम झालेच नसते. योग हा जीवनशैलीचा भाग आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक उन्नतीसाठी योग हा सर्वोत्तम मार्ग ठरतो. सध्याच्या काळात अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत नैराश्याने ग्रासलेल्यांचा समावेश होतो. वाढत्या आव्हानांच्या या काळात योग ही ऋषीमुनींनी दिलेली सर्वोत्तम देणगी आहे, असेच म्हणावे लागेल. जर आता योगविषयात आपण आगेकूच केली नाही तर तो दिवस दूर नाही, जेव्हा परदेशातून योग शिक्षक येऊन आपल्याला योगाचे धडे देतील.  (latest marathi news)

यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हा चढत्या क्रमाने जाणारा अष्टांग योग. यातील प्रत्येक पायरीत अजून उपप्रकारही आहेत. योग म्हणायला गेलात तर क्लीष्ट प्रकार आणि म्हटला तर एकदम सोपा. आपण कोणत्या दृष्टिनं त्याकडे पाहतो आणि आचरणात कसं आणतो, हे महत्त्वाचं आहे. अष्टांग योग हे अतिशय गहन शास्त्र आहे.

पतंजली मुनींनी योग विषयाला १९५ श्लोकांमध्ये सुत्रबद्ध केले. पतंजलींच्या नंतरच्या काळात भारतात सुमारे १८०० प्रकारच्या वेगवेगळ्या योगकला अस्तित्त्वात होत्या, असेही काही संदर्भ आहेत. थोडक्यात सांगायचं तर गुरु-शिष्य परंपरेत योग विषयातील एखाद्या पैलूला ध्येय मानून त्यात अधिक अभ्यास केलेल्या या वेगवेगळ्या परंपरा त्यांना म्हणता येऊ शकते.

सध्याच्या काळातील सर्वोत्तम योग मार्ग म्हणजे आपल्याला जे रुचेल, भावेल, जमेल आणि उपयुक्त ठरेल, तो योगमार्ग निवडावा. मात्र, हे करण्यासाठी जे-जे योगमार्ग उपलब्ध आहेत, त्यांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. योग दिनाची सुरुवात करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना सगळ्यांनीच यासाठी धन्यवाद द्यायला हवे. ते ही राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT