Netaji Subhas Chandra Bose 
सप्तरंग

#Netajibirthanniversary:सरकारी नोकरीवर लाथ मारून, नेताजी उतरले होते स्वातंत्र्यलढ्यात

सकाळ वृत्तसेवा

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज, जयंती. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात, इंग्रजांशी दोन हात करण्याची हिंमत नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दाखवली होती. संपूर्ण देश, किंबहुना संपूर्ण जग महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरणा घेत असताना नेताजींनी वेगळी वाट धरली होती. त्यांचा गूढ मृत्यू आजही भारतीयांना चटका लावणारा आहे. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं जाणून घेऊया, त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी. 

जन्म आणि शिक्षण 
ओडिशामध्ये 1897मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. शालेय जीवनापासूनच ते खूप हुशार होते. प्रत्येक परीक्षेत त्यांनी पहिला क्रमांक मिळवला होता. 1918मध्ये ते फिलॉसॉफी या विषयात बीए पास झाले.

नोकरीचा राजीनामा
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्लंडमध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती त्यात 1920मध्ये ते पासही झाले होते. पण, स्वातंत्र्या लढ्यात उतरण्यासाठी त्यांनी सरकारी नोकरीचा त्याग केला.  23 एप्रिल 1921 रोजी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. 

काँग्रेसमध्ये प्रभाव
स्वातंत्र्या लढ्यात काँग्रेसमधील एक तरुण नेतृत्व म्हणून नेताजींकडं पाहिलं जात होतं. 1920 ते 1930 या काळात त्यांना काँग्रेसमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांनी 1938 आणि 1939मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची महत्त्वाची धुरा सांभाळली. महात्मा गांधी यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळं त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. त्यावेळी नेताजींनी काँग्रेसच्या अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय धोरणांवर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. 1921 ते 1941 या काळात नेताजींना 11 वेळा वेगवेगळ्या आरोपांखाली इंग्रजांनी अटक केली होती.  

स्वामी विवेकानंदांचा प्रभाव
स्वामी विवेकानंदांच्या विश्व बंधुत्वाच्या तत्वज्ञानाला नेताजी फॉलो करत होते. तसेच त्यांना प्रेरणा मिळण्यात भगवतगीतेचा खूप मोठा वाटा असल्याचे त्यांनीच जाहीरपणे सांगितले होते. 

आझाद हिंद सेना
आझाद हिंद सेनेची स्थापना ही एका रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून झाली. जर्मनीमध्ये असताना नेताजींनी आझाद हिंद रेडिओ सुरू केला होता. त्याच नावाने पुढे आझाद हिंद सेना स्थापन झाली आणि आशिया खंडात या सेनेनं भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा उभारला. आझाद हिंद सेनेला संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अपयश आलं. पण, मणिपूरमधून भारतात आलेल्या या सेनेनं अंदमान आणि निकोबार ही दोन्ही बेटं स्वतंत्र केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT