Sarvapitri Amavsya esakal
सप्तरंग

अध्यात्म : महत्त्व सर्वपित्री अमावस्येचे

पं.नरेंद्र धारणे (धर्म अभ्यासक)


यजुर्वेदानुसार पितृकार्य श्राद्धादी कर्म केले असता आयु, आरोग्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, सुख, धनधान्य, समृद्धी मिळते. पितृ तिथी माहिती नसल्यास किंवा काही कारणाने तिथीस श्राद्ध नाही करता आले तर सर्वपित्री अमावस्येस जरूर करावे. स्वतःच्या परिस्थितीनुसार खालील श्राद्ध प्रकारापैकी कोणत्याही एक प्रकारे श्राद्ध करावेच.

१. सपिंडश्राद्ध ब्राह्मण भोजन झाल्यानंतर पिंड पूजा करून केलेले श्राद्ध.

२. ब्रह्मार्पण श्राद्ध ब्रह्मास अर्पण करण्याच्या बुद्धीने केलेले पिंडरहित श्राद्ध. ३. हस्त श्राद्ध-शिजलेल्या अन्नाने करण्यात येणारे श्राद्ध.

४. आम (शिधा) श्राद्ध ब्राह्मणास शिधा देणे.

५. हिरण्य श्राद्ध ब्राह्मणास दक्षिणा, दूध, केळी, पेढे देणे.

६. चट श्राद्ध-दर्भबटु आणि विष्णू स्वरूप मूर्ती द्वारा पूजन करून दोन ब्राह्मण भोजन देणे.

७. काहीच शक्य नसल्यास गायीस गवत द्यावे. पितर स्मरण करून तील तर्पण करावे.

८. वरीलपैकी काहीच शक्य नसेल तर घराबाहेर येऊन दक्षिण दिशेस तोंड करून खालील प्रार्थना म्हणावी.

न मे अस्ति वित्तम न धनं न चन्यात श्राद्धहोपयोगी स्व पितृन न तोस्मि।
त्रुप्यन्तु भक्त्या पित्रो मयैती भूजो कृतो वतमणी मारुतस्य॥


(माझ्याकडे द्रव्य नाही, धन नाही, श्राद्धास उपयुक्त वस्तू नाहीत पण मी मनोभावे पितरांना नमस्कार करीत आहे. माझ्या या भक्तीने सर्व पितर संतुष्ट होवोत यासाठी वाऱ्याच्या दिशेने मी दोन्ही हात वर केले आहेत.)
असे म्हणून पितरांना आपली श्राद्ध न करण्याविषयीची असमर्थता व्यक्त करावी. सारांश, ज्यांनी आपली प्राचीन परंपरा आधुनिक काळापर्यंत कायम ठेवून चांगल्या प्रकारे जोपासण्यास हातभार लावला त्या पूर्वजांचे ऋण व्यक्त करण्याच्या हेतूने सर्वपित्री अमावस्येला त्यांचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करावी. पितृनारायण देवते नमः ....पितृ स्मरणात धन कनक समृद्धी अस्तु...!!
- संदर्भ : श्राद्ध कल्पलता ग्रंथ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतली, तरी हे आंदोलन थांबणार नाही; संजय राऊत यांचा मोदी सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT