dr swati kulkarni sakal
सप्तरंग

सीमेपलीकडचा जनसेवेचा ‘स्टेथोस्कोप’

काही नियम बदलले आणि जवळपास बारा हजार भारतीय डॉक्टरांना अचानक इंग्लंडमधली नोकरी सोडायची वेळ आली. सगळ्यांना मायदेशी परतायला सांगण्यात आलं.

सकाळ वृत्तसेवा

काही नियम बदलले आणि जवळपास बारा हजार भारतीय डॉक्टरांना अचानक इंग्लंडमधली नोकरी सोडायची वेळ आली. सगळ्यांना मायदेशी परतायला सांगण्यात आलं.

- प्राची कुलकर्णी kulkarnee.prachee@gmail.com

काही नियम बदलले आणि जवळपास बारा हजार भारतीय डॉक्टरांना अचानक इंग्लंडमधली नोकरी सोडायची वेळ आली. सगळ्यांना मायदेशी परतायला सांगण्यात आलं. अचानक सगळं सोडून जायचं म्हणजे कोणासाठीही अवघडच. सगळ्या डॉक्टरांनी धाव घेतली ती भारताच्या हायकमिशनमध्ये. तेव्हा इथं हाय कमिशनरबरोबर फर्स्ट सेक्रेटरी म्हणून एक डॉक्टर काम करत होत्या. या डॉक्टरांना या प्रश्नाचं गांभीर्य लगेच लक्षात आलं. त्यांच्या तत्कालीन बॉसनी मग याची जबाबदारी त्यांच्याकडेच दिली. बैठका, वाटाघाटी सुरू झाल्या. अगदी त्यांच्या पातळीपासून ते पंतप्रधानांच्या पातळीपर्यंत हा प्रश्न मांडला गेला आणि अखेर सर्व वाटाघाटी होऊन डॉक्टरांना तिथं राहायची परवानगी मिळाली. या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या डॉक्टर होत्या डॉ. स्वाती कुलकर्णी.

डॉक्टर झालेल्या कुलकर्णी परराष्ट्र सेवेमध्ये आल्या त्या तशा अपघातानेच. मूळच्या नागपूरच्या स्वाती कुलकर्णींना लहानपणापासूनच कायम सांगितलं जायचं की, तू मेडिकलला जा. तसं मार्क मिळवून, प्रवेश घेऊन कुलकर्णी यांनी नागपूरमधून एमबीबीएस पूर्ण केलं. पुढे आयआयटी का एमएस याची चर्चा घरात सुरू होती. अशात त्यांच्या वडिलांचे मित्र असणारे महाजन नावाचे गृहस्थ त्यांच्याकडे आले. ही चर्चा ऐकत असतानाच त्यांनी स्वाती कुलकर्णींना सांगितलं की, तू भारतीय प्रशासकीय सेवेचा विचार करिअर म्हणून कर. हा एकूण प्रकार कुलकर्णी यांच्यासाठी नवा होता. पण, महाजनांनी त्यांना आयएएस, आयपीएस आणि आयएफएस हे सगळे पर्याय काय असतात ते समजावलं आणि तयारीसाठी मुंबईलासुद्धा नेलं.

दरम्यान, त्यांची पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेतून निवडसुद्धा झाली. एकीकडे नव्याने खुणावणारं क्षेत्र, तर दुसरीकडे इतकी वर्षं ज्यासाठी कष्ट वेचले त्याची पुढची संधी. ‘मी डॉक्टर झाले आहे मग मार्ग का बदलायचा, यावर घरी प्रचंड मंथन झालं. मी एक वर्षाचा गॅप घायचंसुद्धा ठरवलं होतं. त्यावरसुद्धा प्रश्न होते. पण अखेर घरात कोणी डॉक्टर नसल्याने या क्षेत्रात सेट व्हायला वेळ लागू शकतो, या एका मुद्द्यावर मी ‘यूपीएससी’ द्यावी असा निर्णय झाला.’ डॉ. कुलकर्णी सांगतात.

अनेकांना अवघड वाटणारी ‘यूपीएससी’ परीक्षा; पण एमबीबीएस करतानाची तासन्तास अभ्यास करायची सवय आणि महाजनांनी केलेलं नियोजन यामुळे कुलकर्णी पास झाल्या आणि आयएफएससाठी ट्रेनिंगला दाखलसुद्धा झाल्या. मसुरीमधलं ट्रेनिंग पार पडलं आणि मग त्यांना पुढे दिल्लीमध्ये ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आलं. सगळं मार्गी लागतंय असं वाटताना आणखी एक गंमत झाली.

कुलकर्णी यांच्याच शब्दांत, ‘आम्हाला प्रत्येकाला एक भाषा निवडायची असते, त्यात मी स्पॅनिश भाषा निवडली. मला वाटलं आता मला पुढच्या ट्रेनिंगसाठी स्पेनला पाठवतील. पण, प्रत्यक्षात मात्र मला मेक्सिकोमध्ये जायला सांगण्यात आलं. माझं मेरिट आहे तर मग मला स्पेन का मिळत नाही याचा मला राग आला आणि मी चक्क वरिष्ठांना विचारायला गेले. नुसतं विचारायला नाही, तर त्यांना थेट माझा राजीनामाच सोपवला. काय झालं हे त्यांनाही कळेना; पण जेव्हा माझं कारण कळलं, तेव्हा त्यांनी राजीनामा फाडून फेकून दिला.’

काही महिन्यांनी त्यांना खरंच स्पेनमध्ये जाण्याची संधीदेखील मिळाली.

पुढे ओमान, साउथ आफ्रिका, मग भारतात रिजनल पासपोर्ट ऑफिसर असे टप्पे पार करत त्या सध्या अमेरिकेतल्या अटलांटामध्ये कौन्सिल जनरल म्हणून काम करत आहेत. इथल्या मुक्कामात त्यांनी कोरोनामध्ये ऑपरेशन ‘वंदे भारत’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पासपोर्टसाठी प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी चॅट बॉट सुरू करणं असे अनेक प्रयोग त्या करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे ‘हाउडी मोदी’ हा कार्यक्रम यशस्वी करण्यात त्यांचं मोलाचं

योगदान होतं. त्यांनी केलेलं मोदींच्या कक्षाचं डेकोरेशन अमेरिकन लोकांनादेखील इतकं आवडलं की, त्यांनी चक्क ट्रम्प यांचा कक्षसुद्धा तसाच सजवून देण्याची मागणी केली होती, असं कुलकर्णी अभिमानाने सांगतात.

तरुणांसाठी त्यांचा एकच सल्ला आहे - ‘एक एक पाऊल टाकत राहा. साध्या साध्या टप्प्यातून यश नक्की मिळेल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT