kokan sakal
सप्तरंग

खुराडे, कोंबडी अन् कोंबडीचोर!

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड ते पालघर जिल्ह्यापर्यंत विचार केला, तर तेथे होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

- प्रकाश पाटील

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड ते पालघर जिल्ह्यापर्यंत विचार केला, तर तेथे होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकणची माणसं, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांचा तापटपणा. स्वभाव फणसासारखा. वरून काटेरी; पण आतून गोड. खोडकरपणा तर आलाच आला. सध्या राजकारणात जो काही संघर्ष सुरू आहे, जे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, ते पाहता राज्याचे चांगले मनोरंजन सुरू आहे असे म्हणायला काही हरकत नाही. विकासाच्या प्रश्नावर भांडणं सुरू असती, जनतेच्या भल्यासाठी कोणी तरी आवाज उठवितो आहे असे झाले असते तर ठीक आहे. पण, तसे मात्र काही दिसत नाही. मनोरंजन अशासाठी म्हटले, की राजकीय संघर्षात काही उपाध्या देण्यात आल्याचे पाहून प्रत्येकाला तरुणपणाची, केलेल्या खोड्यांची आठवणही झाली असेल.

या राजकीय संघर्षामुळे गावखेडं आठवलं. शेतीवाडी, जनावरं, शेळ्या-मेंढ्या आणि कोंबड्याही डोळ्यासमोर उभ्या राहिल्याच राहिल्या. एक काळ असा होता, की खेड्याप्रमाणेच शहरातही कोंबड्यांची खुराडी घरांसमोर दिसायचीच. मुंबईतील गिरणी कामगारांच्या वसाहतीही या निमित्ताने आठवल्या.

कोंबडी अंड्यावर बसणं, खुडुक कोंबडीचं देवळीत बसणं, सकाळी कोंबडीला सोडलं की अंधार पडायच्या आत तिनं घरात येणं, ती आली नाही तर मालकाचा जीव कासावीस होणं, मग तिचा शोध घेणं, दुसऱ्याच्या खुराड्यात तर गेली नाही ना, तिला कोणी खाल्लं तर नसेल ना, ही चिंता मालक- मालकिणीच्या चेहऱ्यावर दिसून यायची. कोंबड्यांची खुराडी आज कॉँक्रिटच्या जंगलामुळे कमी कमी होत गेली, हेही खरं.

कोंबड्यांची खुराडी घराबाहेरच असायची. काही खोडकर मुलं गाव झोपलं की जागी होत. मग मध्यरात्रीचा बेत कोंबडीच असे. कोंबडी आणायची कोठून, हा प्रश्‍नच नसे. थंड केलेला कपडा घेऊन एखाद्याच्या खुराड्यातील कोंबडी आवाज न करता चोरणे, ही एक खास कला. चोरलेली कोंबडी रात्री पोरं भाजून खात. एन्जॉय करीत. रात्री कोंबडी चोरीला गेली, हे घरमालकांना सकाळी कळायचं. मालकाला कळलं की या पोराने कोंबडी चोरली, तर त्याचं काही खरं नसायचं. त्याचा उद्धार ‘कोंबडीचोर’ म्हणूनच होत असे. असे प्रकार नेहमीच चालत असत. विशेषत: होळीच्या सणाला या गमतीजमती होत.

तरुणपणी कोंबड्या चोरल्या नाहीत, खोड काढली नाही, असे कधी होत नसे. कोकणात कोंबडीचोर म्हणजे काय, हे सर्वांना माहीत आहे. कोंबडीचोर याप्रमाणे एका हडकुळ्या माणसाला कारवी किंवा सुका बोंबील म्हणूनही चिडविले जाते. प्रत्येक जिल्हा किंवा गावाची काही वैशिष्ट्ये आहेत. कोंबडीचोर पेपरात वाचलं आणि एकदम डोळ्यासमोर कोकण उभं राहिलं. सध्या राजकारणात कोंबड्या उडविल्या जात आहेत. तसे फ्लेक्स झळकत आहेत. काहीही असो, राजकारणातही बिचाऱ्या कोंबडीला महत्त्व आहे, हे मान्य केलेच पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे! पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; नाशिक, धुळे जळगावला रेड अलर्ट

Muslim Polygamy Case : मुस्लिम पुरुषांच्या बहुपत्नीत्वाला याचिकेद्वारे आव्हान, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडे मागितले स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : कोयना-वारणा धरणांच्या विसर्गामुळे सांगलीत कृष्णा-वारणा नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढली

Russia-Ukraine Conflict : इराण-अमेरिका युद्ध सुरू असताना मध्येच युक्रेन-रशियाचं काय बिनसलं?

R. Ashwin: वैभव सूर्यवंशीला डच्चू, भुवनेश्वर कुमारला संधी; 2027 वर्ल्ड कपसाठी आर. अश्विनचा संभाव्य भारतीय संघ चर्चेत

SCROLL FOR NEXT