सप्तरंग

आरोग्यासाठीचं कवच (डॉ. सतीश देसाई)

डॉ. सतीश देसाई

'सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच' योजनेची नवीन वर्षासाठीची नोंदणी सुरू झाली आहे. विमा कवच, रुग्णालयातल्या बिलावर सवलत, तपासण्यांबाबत विविध आकर्षक योजना अशी या योजनेची वैशिष्ट्यं. या योजनेची आवश्‍यकता, तिचे तपशील, प्रसार आदी गोष्टींवर एक नजर. 

गेली चाळीस वर्षं वैद्यकीय क्षेत्रात, तर 19 वर्षं सामाजिक क्षेत्रात मी कार्यरत आहे. साहजिकच त्यामुळं नानाविध प्रकारची माणसे माझ्या संपर्कात आली. वैद्यकीय क्षेत्र असो अथवा सामाजिक क्षेत्र- एक गोष्ट माझ्या प्रकर्षानं लक्षात आली ती म्हणजे बहुतांश लोकांनी स्वत:च्या आरोग्याकडं केलेलं दुर्लक्ष. परमेश्वरानं मनुष्याला शरीर ही बहुमोल भेट दिलेली आहे; परंतु बहुतांश लोकांना या मोफत भेटीचं मूल्य नसतं. अर्थात त्यामागं पैशाचा किंवा वेळेचा अभाव अशी अनेक कारणंदेखील आहेत. सध्याच्या धकाधकीच्या आणि तीव्र स्पर्धेच्या युगात नानाविध कारणांमुळं जवळपास घरोघरी कुठल्या न कुठल्या आजारानं मुक्काम केला आहे. त्यातून जीवनशैली विचित्र झाल्यामुळं छोटासा आजार कुठलं गंभीर स्वरूप धारण करेल याचा नेम नाही आणि उपचारांच्या किंमती अक्षरश: आभाळी धडका मारू लागल्या आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांनाच काय, तर उच्च मध्यमवर्गीयांनादेखील उपचार खर्च आवाक्‍याबाहेर वाटू लागला आहे. अशा गंभीर वेळेस पाठीमागं खंबीर आर्थिक आधार असणं आवश्‍यक आहे. 

पूर्वी विमासंरक्षणाबाबत सर्व स्तरांतले लोक बेफिकिरीनं वागत असत; परंतु आता मात्र विमासंरक्षणाबाबतची जागरुकता वाढीस लागू लागली आहे. परंतु, नेमका आणि योग्य मार्ग बऱ्याच जणांना ठाऊक नाही. म्हणूनच समाजाभिमुख 'सकाळ' वृत्तपत्र आणि सह्याद्री हॉस्पिटल समाजातल्या सर्व स्तरांतल्या ज्येष्ठांसाठी, किफायतशीर आणि बहुपयोगी अशी 'सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच योजना' गेली बारा वर्षं राबवत आहेत. अनिश्‍चिततेच्या या युगात विमा संरक्षण ही काळाची गरज ठरत आहे. वैद्यकीय क्षेत्राचा आणि सामाजिक क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असल्यानं मी खात्रीनं सांगतो, की 'सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच' योजनेसारखी सुलभ आणि सर्वांना उपयोगी अशी योजना मी पाहिली नाही. दोन लाखांच्या विम्याबरोबरच सह्याद्री सुरक्षा कवच सभासदांना जॉईंट पेन, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल, डायबेटिस, हृदयविकार, ओबेसिटी, डाएट, नेत्रतपासणी अशा काही चाचण्या संपूर्ण मोफत, तर काही चाचण्या मुबलक सवलतीत करून घेता येणार आहेत. एवढंच नव्हे, तर काही शस्त्रक्रियादेखील सभासदांना सवलतीच्या दरात करून घेता येणार आहेत. या सर्वसमावेशक आरोग्य योजनेचा सर्व ज्येष्ठांनी लाभ घेतला पाहिजे. 

मला आठवतंय- काही काळापूर्वी मी पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत असताना आजी-माजी नगरसेवकांना अवघ्या काही रुपयांत विमासुरक्षा देण्याचा उपक्रम सुरू झाला होता. तेव्हापासून मनात समस्त पुणेकरांनाही अशी हक्काची विमा योजना असावी हे रेंगाळत होतं. माझं ते स्वप्न 'सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच योजने'नं प्रत्यक्षात आणलं आहे. 

ही योजना पुणे शहर आणि उपनगरात घरोघरी पोचणं नितांत आवश्‍यक आहे. या योजनेचा लाभ समस्त पुणेकरांना मिळावा म्हणून सर्वपक्षीय कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, पालकमंत्री यांनी पुढाकार घ्यावा, असं माझं आवाहन आहे. यामुळे इतर कोणत्याही लाभापेक्षा गरजवंतांचे दुवे निश्‍चित मिळतील याची खात्री आहे. गणेश मंडळांनीही ही 'सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच योजना' सर्वदूर पसरवावी, असं मला वाटतं. किंबहुना आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या गणेश मंडळांनी गरजू कुटुंबांना दत्तक घेऊन त्यांच्या आयुष्यात 'सुरक्षा कवच योजने'द्वारे खंबीरपणे मागं उभं राहावं, अशी माझी कळकळीची विनंती आहे. तेव्हाच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना समाजासाठी अभिप्रेत असलेला गणेशोत्सव खऱ्या अर्थानं साजरा होईल. 

आयुष्यभर आपल्या मुलाबाळांसाठी अतोनात कष्ट उपसून आयुष्याच्या उत्तरार्धात बहुतांश ज्येष्ठ मंडळी उपेक्षित आणि दुर्लक्षितच राहतात. मुलंबाळं देशात असोत अथवा परदेशात- सध्या सर्वत्र हेच विदारक आणि भीषण चित्र पाहायला मिळतं. अशा वेळेस सर्व स्तरांवरच्या ज्येष्ठांना संजीवनी देणाऱ्या या योजनेला माझ्या मनापासून शुभेच्छा. तसंच समाजातल्या सर्व घटकांनी या योजनेला चळवळीचं रूप देऊन एक आरोग्यसंपन्न समाज निर्माण करावा अशी माझी मनापासून विनंती. 

नोंदणीसाठी हे करा... 
आजही सभासद नोंदणी करू शकतात. फॉर्म आणि माहिती 'सप्तरंग'मध्ये उपलब्ध. 

1) वय वर्षं 50 ते 69 : 
3650 रुपये एकरकमी 'सह्याद्री हॉस्पिटल्स लिमिटेड' या नावे कार्ड/ रोख/ डीडी/ धनादेशाद्वारे + 800 रुपये 'सकाळ मीडिया प्रा. लि.' या नावे रोख भरावेत. 

2) वय वर्षं 70 आणि अधिक : 
4850 रुपये एकरकमी 'सह्याद्री हॉस्पिटल्स लिमिटेड' या नावे कार्ड/ रोख/ डीडी/ धनादेशाद्वारे+ 800 रुपये 'सकाळ मीडिया प्रा. लि.' या नावे रोख भरावेत. 

3) सभासदनोंदणी सर्व सह्याद्री हॉस्पिटल्समध्ये सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत. 

अधिक माहितीसाठी : 9607992885 /9607992886 या क्रमांकांवर संपर्क साधावा. (योजनेचा कालावधी 31 मार्च 2020 पर्यंत) 

सभासदांच्या प्रतिक्रिया 
मी माझ्या आई आणि वडिलांसाठी 'सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच' यांचा विमा घेतला आहे. आईचं वय 72, तर वडिलांचं वय 76 वर्षं आहे. या वयात त्यांच्यासाठी अन्य कोणतंही विमासुरक्षा कवच उपलब्ध नाही. या योजनेत मी त्यांची नोंद केल्यामुळं मला माझ्या आईच्या कमरेच्या हाडाच्या शस्त्रक्रियेसाठी 2,30,000 रुपयांची मदत झाली. अडचणीच्या काळात ही फार मोठी मदत 'सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच'च्या माध्यमातून मला मिळाली. या योजनेचे सभासद होण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत आहे. तुम्हीही तुमच्या आई-वडिलांना आरोग्यासाठी 'सुरक्षा कवच'ची भेट द्या. मी 'सकाळ' समूह आणि सह्याद्री हॉस्पिटलचा आभारी आहे. (लाभार्थी : कमल शिरू यादव) 
- मंगेश शिरू यादव (रा. हडपसर, पुणे) 

सुरक्षेचं नाव ऐकून कसं अगदी बरं वाटतं! म्हातारपणीचं अवघड गणित अगदी सोपं वाटतं! मी आणि माझी पत्नी निवेदिता काळे 'सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच' या योजनेचे पहिल्या वर्षापासून सभासद आहोत. ता. 1 सप्टेंबर 2018 रोजी माझी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी झाली. त्यासाठी 2,70,000 रुपये खर्च आला. त्यातली 1,08,000 रुपयांची मदत 'सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच योजने'मधून झाली. माझी शस्त्रक्रिया करणारे डॉक्‍टर, 

त्यांचे सहायक आणि हॉस्पिटलमधला सर्व स्टाफ यांचा मी खूप आभारी आहे. 'सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच' म्हणजे म्हातारपणाची कवचकुंडलं. याचा 
सर्वांनी लाभ घ्यावा. (लाभार्थी क्रमांक : 10/6327) 
- सतीश काळे, पुणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT