लेखक : के. एस. आझाद
भौगोलिक, ऐतिहासिक, शास्त्रीय, करमणूक, टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञान व मोठमोठे उद्योग अशा ठिकाणी सहलीच्या माध्यमातून भेटी दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, चिकित्सा आकलन, व्यक्तिमत्त्व विकास व अवतीभवती जग कसे चालले आहे, अशा एक ना अनेक फायदे स्कूल ट्रीपचे आहेत.
चार भिंतींमध्ये शिकविण्यापेक्षा प्रत्यक्ष फिल्डवर नेऊन शिकवले, तर ती विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात राहाते. प्रत्येक शाळेने विशिष्ट कालावधीने सहलीचे आयोजन केले पाहिजे.
अभ्यासक्रमामधला भाग म्हणून विद्यार्थ्यांना सहली, दौरे बंधनकारक असायला हवेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते आवश्यक आहे. (saptarang latest marathi article by KS Azad on Edu Corner Importance of study tour in education nashik)
शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांसाठी सर्वांत आवडीचा विषय म्हणजे स्कूल ट्रीप होय. नवनवीन ठिकाणांना भेट देणे, तेथे जाऊन मजा करणे हे आपण शालेय जीवनापासून अनेक वर्षांपासून अनुभवत आहोत.
शाळेच्या सहलींचं स्वरूप बदललं जरी असलं तरी तिचं महत्त्व शालेय जीवनात आजही अधोरेखित आहे.
भौगोलिक, ऐतिहासिक, शास्त्रीय, करमणूक, टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञान व मोठमोठे उद्योग अशा ठिकाणी सहलीच्या माध्यमातून भेटी दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, चिकित्सा आकलन, व्यक्तिमत्त्व विकास व अवतीभवती जग कसे चालले आहे, अशा एक ना अनेक फायदे स्कूल ट्रीपचे आहेत.
एखादे स्थळ जर प्रॅक्टिकली जाऊन जर दाखविले तर त्याबद्दल चिकित्सा निर्माण होते. सध्याच्या जगामध्ये अशी अनेक ठिकाणे, प्राणी व स्थळे आहेत, की जी नामशेष होत चाललेली आहे. कदाचित, विद्यार्थी मोठा झाला तर तो ते बघण्यापासून वंचित राहू शकतो.
उदाहरणार्थ वन्यजीव प्राण्यांमध्ये असे अनेक प्राणी आहेत, की ती अत्यंत दुर्मिळ होत चालले आहे. वाढणाऱ्या बांधकामामुळे डोंगर, दऱ्या, विहिरी हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
नदीचे पात्र कमी होत चालले आहे, त्यामुळे आताच तातडीने जर त्यांच्या या नैसर्गिक स्थळांना भेटी घडवून आणल्या तर किमान त्यांचे हे बघणं तरी होईल.
म्हणूनच शालेय जीवनामध्ये किमान वर्षातून दोन ते तीन शैक्षणिक सहल म्हणजे फिल्ट्रिपच आयोजन करणे गरजेचे आहे.
चार भिंतींमध्ये शिकविण्यापेक्षा प्रत्यक्ष फिल्डवर नेऊन शिकवले, तर विद्यार्थ्यांच्या ते कायम लक्षात राहाते. प्रत्येक शाळेने विशिष्ट कालावधीने सहलीचे आयोजन केले पाहिजे. अभ्यास सहलींचं आयोजन होणं महत्त्वाचं आहे.
अभ्यासक्रमामधला भाग म्हणून विद्यार्थ्यांना असे दौरे बंधनकारक असायला हवेत. कारण आजच्या मल्टिमीडिया आणि आयटी युगामध्ये पुस्तकातलं वर्णन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला, अनुभवायला मिळालं तर विद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाढायला मदत होते.
तसंच शब्दांतून व्यक्त करण्याची त्यांची क्षमताही वाढते. कला शाखेत भूगोल, इतिहास या विषयाच्या सहली काढल्या जाव्यात. ज्यात प्राकृतिक भूगोलाची माहिती आणि विविध ऐतिहासिक ठिकाणांना भेटींचा समावेश असावा.
विज्ञान विभाग, विविध रासायनिक प्रयोगशाळा, संशोधन शाळा, वनस्पतींचे विविध प्रकार, प्राण्यांच्या विविध जाती शोधण्यासाठी आणि या सर्वांचं कलेक्शन करण्यासाठी जास्त विविधता असलेल्या ठिकाणी सहली काढल्या जाव्यात.
अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या सहली परदेशात प्रचलित आहेत. परदेशातल्या त्या-त्या देशांच्या सर्व प्रांतांतून, जंगलातून, पर्वतराजीतून विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेलं जातं. अशा सहलींची योजनाबद्ध आखणी आणि नियोजन केलं जातं.
पायी चालणं, डोंगर चढणं वगैरे क्रियांमुळे विद्यार्थी शारीरिकदृष्ट्याही सक्षम आणि सुदृढ बनतात. अशा सर्व प्रकारांच्या सहलींमध्ये शिक्षकही सहभागी होत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात जवळीक आणि जिव्हाळा वाढतो.
तसेच स्वावलंबन, कष्ट, काटकसर, स्वयंशिस्त इत्यादी गोष्टी विद्यार्थ्यांनासुद्धा अनुभवाने शिकायला मिळतात. प्रत्यक्ष पायाखालून सगळा प्रदेश घातल्याने मिळणारे ज्ञान जास्त चांगल्या पद्घतीने प्राप्त होऊ शकते.
कोणत्याही सहलीचे विशिष्ट उद्दिष्ट, हेतू, उपयुक्तता इत्यादी बाबी
विचारात घेऊन आयोजन केले पाहिजे. त्यासाठी पूर्वतयारी आवश्यक असते. सहलीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या स्थळांना भेटी द्यायच्यात, तिथे काय काय पाहायचंय, कोणकोणती माहिती मिळवायचीय, कोणती टिपण काढायची या सगळ्यांची पूर्वसूचना तसंच सहभागी विद्यार्थ्यांनी सहलीला येताना काय तयारी करावी,
कोणत्या वस्तू बरोबर घ्याव्यात, सहलीचा एकूण कार्यक्रमाची माहिती, निघण्याच्या वेळा, मुक्कामाला पोचण्याच्या वेळा, मुक्कामाची ठिकाणं, तेथील प्रेक्षणीय स्थळांची माहिती आधी देणं श्रेयस्कर ठरतं. प्रेक्षणीय स्थळांची पूर्वपरवानगी घेणं,
निवासव्यवस्था, अल्पोपाहार आणि भोजनव्यवस्था यांसारख्या सोयीसुविधा माफक दरात उपलब्ध करून देणं, हे सहल व्यवस्थापकाचं कर्तव्य असतं. प्रेक्षणीय स्थळांच्या किंवा दीर्घ मुदतीच्या सहलींमध्ये कित्येकदा मार्गदर्शकाची भूमिकाही तो पार पाडतो.
त्या-त्या स्थळाची ऐतिहासिक, भौगोलिक, पुरातत्त्वीय, कलासौंदर्यात्मक वैशिष्ट्य, तसंच अन्य महत्त्वाची माहिती आपल्या रंगतदार निवेदनशैलीत तो सांगतो.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. प्रत्यक्ष निरीक्षणातून वेगवेगळ्या विषयातलं ज्ञान वाढीला लागतं आणि अशा अभ्यासातून त्या त्या विषयात जास्त रस निर्माण व्हायला मदत होते. म्हणून आजच्या शिक्षणपद्धतीत अभ्यास सहलींचा समावेश असायला हवा.
सहली अनेक अर्थाने महत्त्वाच्या असतात. सहलीमध्ये एक प्रमुख शैक्षणिक घटक असायला हवा. सहलींचा प्रभाव खूप वाढू शकतो. सहलींच्या वातावरणात त्यांच्या वर्गमित्रांशी नाते निर्माण करण्याची संधी आहे.
जेव्हा विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग एकत्र असतात तेव्हा नवीन शैक्षणिक वातावरण आणि अनुभव मिळतो. शैक्षणिक सहल तारांगणाची असेल तर कदाचित ताऱ्यांसह उपलब्ध नसलेल्या गोष्टी अनेकांचे निरीक्षण करण्याची परवानगी देऊ शकते.
शैक्षणिक सहलींमुळे वर्गातील दैनंदिन वातावरणापासून दूर गेल्याने थोडे तणावमुक्त होता येते. सहलीत विद्यार्थी अधिक अनौपचारिक वातावरणाचा अनुभव घेऊ शकतात. ते त्यांच्या एकूणच विकासासाठी गरजेचे असते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.