Children are imitators
Children are imitators esakal
सप्तरंग

मुले ही अनुकरणप्रिय असतात

सकाळ डिजिटल टीम

"मुले हे अनुकरणप्रिय असतात, हे आपण जाणतो व घरात ते अनुभवतो आणि बघतो देखील. समजा, एकत्र कुटुंबात मुले वावरत असतील तर बरेच वेळा आजोबा, वडील किंवा काका यांना जर व्यसनाची सवय असेल म्हणजेच तंबाखू, सिगारेट, दारू पिणे, गुटखा खाणे यापैकी कोणतीही सवय असेल तर घरातील मंडळी ही मुलांसमोर या खाण्यापिण्याच्या क्रिया करत असतात. तेव्हाच कळत-नकळतपणे हा सारा प्रकार मुले अगदी जवळून बघत असतात. इतकेच नाही तर ते बघून मनात साठवत देखील असतात. यातून त्यांना नकळतपणे प्रेरणाच मिळत असते. तेव्हा या गोष्टी मुलांदेखत होणार नाही, याची खबरदारी पालकांनी घेतली पाहिजे किंवा ही गोष्ट मुलांसमोर करू नये हे पालकांनी मनाशी ठरवले पाहिजे. त्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे, हे जाणले पाहिजे." - माधुरी केवळराव पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडाळे (ता. इगतपुरी, जि. नाशिक)

(saptarang latest marathi article by madhuri patil on Children are imitators nashik news)

आपण हे सारे अनुभवले आहे, ऐकले देखील आहे, की आपण लहान मुलांना जेव्हा घरात जेव्हा खेळवत असतो तेव्हा त्यांना शिकवत देखील असतो. उदाहरण द्यायचेच म्हटले, तर आपण मुलांना छोटे छोटे प्रश्न विचारतो.

बाळा तुझे नाक दाखव? तुझे तोंड दाखव? तुझे कान, डोळे, हात, पाय, डोके, दात, जीभ दाखव? इतकेच नाही, तर त्याचबरोबर आजोबा कसे चालतात रे? आजोबांचे डोळे कसे आहेत? आजोबा तंबाखू कसे खातात? काका सिगारेट कशी पितात? दादा गुटखा कसा खातो? आणि बाबा दारू पिल्यावर कसे करतात? मुले या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी त्याच तालात करून दाखवतात किंबहुना देतात. तेव्हा त्यांच्या त्या छोट्या छोट्या क्रिया पाहून आपल्याला त्यांचं कौतुक वाटतं, आपल्याला हसूदेखील येतं असतं.

आपल्याला एकप्रकारे नवल वाटते. आपण बोलूनही जातो वा! किती हुशार आहे बाळ अगदी बरोबर लक्षात ठेवतो आणि तसेच करतो. पण याच क्रिया तो यापुढेही कायमस्वरूपी लक्षात ठेवतो आणि याच गोष्टी करण्याची धडपड करतो, हे आपण लक्षात घेतच नाही.

तेव्हा आपण मुलांना असे प्रश्न न विचारता त्याला त्याच्या बालबुद्धीला त्यातून संस्कार मिळतील असे प्रश्न विचारा. थोरांच्या गोष्टी सांगितल्या जाव्यात, म्हणजे प्रत्येक घरातून शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू असे अनेक थोर नेते घडतील आणि येणाऱ्या भावी पिढीचा या देशासाठी नक्कीच उपयोग होईल.

नोकरीत अनेक अनुभव रोज अनुभवायला मिळतात. जेव्हा मुले सतत गैरहजर असतात आणि अचानकपणे पुन्हा कधीतरी शाळेत येतात, तेव्हा जर का या मुलांना विचारले, का रे बाळा! इतके दिवस कुठे होतास? तर त्यांची कारणे ऐकून खरोखर वाईट वाटते.

मुले जेव्हा बोलतात, की पप्पा दारू पिऊन येतात व आईला मारतात. त्यासोबत आम्हाला देखील मारतात. घरातील वस्तूंची फेकाफेक करतात, त्यातून ही लहान मुले घाबरून जातात व जे प्रसंग रोजच्या रोज बघत असतात त्यांचा त्यांच्यावर किंवा त्यांच्या बालमनावर वाईट परिणाम होतो.

घडलेले ते वाईट प्रसंग त्यांच्या बालमनावर बिंबवत असतात आणि त्याचा देखील परिणाम मुलांवर शंभर टक्के होत असतो. मुले त्या क्रिया करण्याचा प्रयत्नदेखील करायला सुरवात करतात.

मला शेवटी एक गोष्ट आवर्जून पालकांना सांगावी वाटते, की आपण जेव्हा मुलांना शाळेत पाठवतो त्या वेळी त्यांना दहा-वीस रुपये प्रेमापोटी देत असतो. पण खर्च केलेल्या पैशाचा त्याला घरी आल्यावर हिशोब विचारत नाही.

त्यातून तू काय खरेदी केले? काय खाल्ले? हे देखील विचारत नाही. पण ते विचारले गेले पाहिजे. याचा नक्कीच पालकांना फायदा होईल. अनुभवातून सांगते, की बऱ्याच वेळा मुले दिलेल्या पैशातून चिंगम व गुटखा खातात आणि त्यातूनच त्यांना नकळत व्यसनाची सवय जडते.

मुलांची काळजी शिक्षक तर घेतातच, पण पालकांनीसुद्धा घेतली पाहिजे. मुलांना पैसे साठविण्यासाठी एक गल्ला घेऊन द्या. रोज दिलेले पैसे आपल्यासमोर गल्यात टाकायला सांगा आणि त्यांना आवश्यक गोष्टी स्वतः खरेदी करून द्या.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

म्हणजे पुढे निर्माण होणारे प्रश्न हे कधीही येणार नाही, असे मला वाटते. मी माझ्या शाळेतदेखील हा उपक्रम राबवत आहे. त्याचे नाव आहे ‘एक मुलगा, एक गल्ला’. मुलाचे नावे असलेले गल्लेही वर्गात असतात व त्यांना खाऊसाठी मिळालेली पैसे मुले त्यात साठवतात.

याचा मला व मुलांना भरपूर असा फायदा झाला आहे. मुले साठलेल्या पैशांतून शालेय वस्तू खरेदी करतात, शाळेची सहल निघते तेव्हा गल्ल्यातीलच पैशाचा उपयोग मुले सहलीची फी भरण्यासाठी करतात.

नवनीत असेल, वह्या असतील किंवा शालेपयोगी वस्तू असतील या साऱ्या त्या पैशातून खरेदी केल्या जातात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुले कोणतीही छोटी-मोठी शालेय फीसुद्धा त्यातून भरतात. ही सवय मी माझ्या मुलांना पहिलीपासून लावली.

त्याची कल्पनाही पालक मीटिंगमध्ये सांगितली आणि दाखवली. इतकेच नाही, तर गल्ला जेव्हा फोडला जातो तेव्हा पालकसुद्धा उपस्थित असतात. या उपक्रमात सहभागी मुलांना लहानपणापासून पैसे बचतीची सवय लागते, व्यवहार समजतो आणि मुलांना काटकसरीने कसे वागावे, पैसा कसा साचवावा, त्याचा योग्य ठिकाणी वापर कसा करावा, ही चांगली सवय मुलांना कमी वयातच लागते व त्याची जाणीव देखील होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT