Rajaram Pangavane
Rajaram Pangavane esakal
सप्तरंग

दृष्टिकोन : जुन्या-नव्याच्या संगमातून बलशाली समाजनिर्मिती!

सकाळ डिजिटल टीम

लेखक : राजाराम पानगव्हाणे

जुन्या पिढीचा अनुभव आणि तरुण पिढीची ऊर्जा यांचा एकत्रितपणे उपयोग केल्यास एक बलशाली व समृद्ध समाज निश्चितपणाने घडू शकतो. म्हणूनच नव्या आणि जुन्या पिढीत समन्वय व सकारात्मक संवाद आवश्यक आहे.

ज्येष्ठ नागरिक समाजाचे खऱ्या अर्थाने ‘यंग सीनिअर्स’ आहेत, असे समाजाने मानायला हवे. ‘विचार बदला जीवन बदलेल’ हे सूत्र आजच्या पिढीने लक्षात घ्यायला हवे. (saptarang latest marathi article by rajaram pangavhane on Strong social formation through confluence of old new and new nashik news)

ज्येष्ठ नागरिक समाजाचे खऱ्या अर्थाने ‘यंग सीनिअर्स’ आहेत, असे समाजाने मानायला हवे.

सामाजिक विकासासाठी प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. मग तो लहान असो अथवा मोठा, ज्येष्ठ असो तरुण. विशेषकरून तरुण पिढी घडविताना ज्येष्ठांची भूमिका निर्णायक आहे.

तरुणांचे विचार ज्या दिशेने जातील, त्या दिशेने समाज घडेल. पण त्याचबरोबर ज्येष्ठ पिढीही तितकीच महत्त्वाची आहे. कारण ज्येष्ठ नागरिकांनी समाजातील बदलती स्थित्यंतरे बघितली, अनुभवलेली असतात.

सांस्कृतिक, तंत्रज्ञान, डिजिटल, इन्फ्रा अशा अनेक क्षेत्रांतील बदलांमध्ये जीवनशैली बदलत्या काळानुसार स्वतःमध्येही बदल करून घेत असते. त्या वेळी निर्माण होणारी परिस्थिती व बदलत्या काळात होणारा संघर्षही त्यांनी योग्यरीत्या हाताळला आहे.

ज्येष्ठ नागरिक खऱ्या अर्थाने समाजाची ‘ब्रेन बँक’ आहे, असं म्हणायला हरकत नाही. ज्येष्ठ पिढीकडून संयम, संवेदना, अनुभवातून आलेले शहाणपण याची समाजाकडून कदर होणे आवश्यक आहे.

नव्या पिढीकडे ऊर्जा, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, स्मार्ट वर्क, उत्साह आहे. त्यामुळे जुन्या पिढीचा अनुभव आणि तरुण पिढीची ऊर्जा याचा एकत्रितपणे उपयोग केल्यास एक बलशाली व समृद्ध समाज निश्चितपणाने घडू शकतो.

त्यामुळेच नव्या आणि जुन्या पिढीत समन्वय व सकारात्मक संवाद आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांना ज्येष्ठ अथवा वयोवृद्ध झालात, याची जाणीव करून देण्यापेक्षा हे ज्येष्ठ नागरिक समाजाचे खऱ्या अर्थाने ‘यंग सीनिअर्स’ आहेत, असे समाजाने मानायला हवे.

ज्येष्ठांशी निःसंकोचपणे बोला

आजच्या तरुणाईत प्रचंड शक्ती आहे, ताकद आहे. कलात्मकता आणि सृजनशीलताही आहे. शिक्षणापासून विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा, समाजसेवा व राजकारणातही तरुण पिढी यशाला गवसणी घालू पाहत आहे.

तुमच्याकडून घडणाऱ्या उत्तम कार्यासाठी गरज आहे, ती दृष्टिकोन बदलण्याची. ‘विचार बदला जीवन बदलेल’ हे सूत्र आजच्या पिढीने लक्षात घ्यायला हवे. बऱ्याचदा आपल्यामध्ये बरेच काही करण्याची क्षमता असते.

आपल्या क्षमतेचा योग्य वापर कुठे केला पाहिजे, या संदर्भात आपण निःसंकोचपणे ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यायला हवे.

हे जरा आठवून पाहा...

ज्येष्ठ नागरिक हा आपल्या समाजातील सर्वांत महत्त्वाचा समूह आहे. आयुष्यातील अनुभवांमध्ये त्यांना स्वतःसाठी काय सापडले, हे शोधण्यात शहाणपण आहे. समाजासाठी त्यांचे योगदान साजरे केले पाहिजे.

आजच्या पिढीला स्पर्धात्मक युगात त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. पण दुर्दैवाने आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. सध्या ४०-४५ वर्षांच्या पुढे असणाऱ्यांनी आठवून पाहावे, लहानपणी आपण आई-वडिलांपेक्षाही अधिक वेळ आजी-आजोबांजवळ असायचो.

काळानुरूप वृद्धत्व सर्वांनाच

जिथे अंधार संपतो, तिथे प्रकाश सुरू होतो. जिथे प्रकाश संपतो तेथे अंधार सुरू होतो. निसर्गचक्राप्रमाणे आपले आयुष्य मार्गक्रमण करीत असते. प्रत्येकाच्या जीवनात सकाळ व सायंकाळ आहेच.

जो आज लहान आहे, तो उद्या तरुण आहे, जो आज तरुण आहे तो उद्या वृद्ध होणारच आहे. प्रत्येकाला काळानुरूप वृद्धापकाळाला सामोरे जावेच लागणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपल्या घरातील वडीलधारी मंडळींशी आपलेपणाच्या भावनेतून वागावे.

प्रत्येकाने एकमेकांचा आधार बनून जीवनाचा गाडा हाकायला पाहिजे, जेणेकरून भावी पिढीवर चांगले संस्कार होऊन पुढे ते आदर्श नागरिक बनून समाजाला सुयोग्य दिशा देतील. ज्येष्ठांचे समाजनिर्मितीमध्ये योगदान आहे, असे मानल्यामुळे आपला वयोगट सर्वसमावेशक समाज बनवण्यात मदत होईल.

ज्येष्ठांना दुखवू नका...

ज्येष्ठ हे कुटुंबाचे आधारवड आहेत. तरुण पिढीने वृद्धांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा, त्यांना समजून घेऊन विचारांशी सहमती दर्शवत प्रोत्साहित करावे.

ज्येष्ठ झालो म्हणून काही करता येत नाही, असे नसून परिस्थितीचा सामना करून त्यांच्या विचारांशी साधर्म्य, कसे साधता येईल, या दृष्टीने प्रयत्न करावेत, याकडे लक्ष देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आजचे युग वैज्ञानिक युग असून, कॉम्प्युटर, मोबाईल या चांगल्या बदलांसोबतच विचारांमध्येही बदल झाले आहेत. पण तरीही पालक, वृद्ध यांची विचारसरणी जुळणे गरजेचे आहे.

ज्यांनी बोट धरून जगवले, आपल्याला लहान्याचे मोठे केले, त्यांना दुखवू नये. संस्कारामुळे माणूस घडतो, जसे पालक आपल्या पाल्यांवर संस्कार करतात, त्याप्रमाणे त्यांची विचारसरणी, वागणूक ठरत असते.

संस्कारामुळेच घडतो माणूस

सध्याचे जीवन खूपच गतिमान झाले आहे. एकमेकांकडे वेळ पुरेसा नाही, पण चांगला माणूस घडण्यासाठी संस्कारांचीच गरज आहे. आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे लहान मुलांना सांभाळणे व घरात कोणीतरी लक्ष ठेवण्यासाठी असावे, इतक्या गरजेपुरतच त्यांचे काम आहे, असे मानू नये.

या ज्येष्ठांनी आपल्या जीवनात अनेक संघर्ष बघितले आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून कसा मार्ग काढावा, कमीत कमी संसाधने असताना आपला संसार कसा उभा करावा, हे ज्येष्ठ अतिशय योग्यरीत्या आपल्या अनुभवातून सांगू शकतात.

समाजामध्ये दैनंदिन जीवनात आपल्याला वेगवेगळी माणसे भेटत असतात. पण कोणत्या व्यक्तीची वागणूक कशी आहे? त्याच्या मनात काय विचार चालले आहेत? त्याची देहबोली कशी आहे? हे मात्र आपल्याला अनुभवातूनच शिकता येते.

ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या

ज्येष्ठांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे माणसे ओळखण्यामध्ये घालवलेली असतात. त्यामुळे एखाद्या नवीन व्यक्तीविषयी संबंध, व्यवहार करीत असताना किमान एकदा तरी आपण घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा आणि मगच पुढील निर्णय घ्यावा.

कदाचित असे होऊ शकते, की जुन्या पिढीच्या वेळेस त्या वेळेस केलेला विचार आजच्या पिढीला मान्य होईलच, असे नाही. पण किमान त्याच्यातला सारांश तरी किमान समजून घ्यायला हवा. किंबहुना ही काळाची गरज आहे.

(लेखक ब्रह्मा व्हॅली ग्रुप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक-अध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

SCROLL FOR NEXT