Chhatrapati Sambhaji Raje Bhosale esakal
सप्तरंग

सह्याद्रीचा माथा : बरं झालं राजे तुम्ही बोललात..!

लेखक : डॉ. राहुल रनाळकर

शिवरायांचे तेरावे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिकस्थळी नुकतेच एक वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्याला थेट राजकीय धार नसली, तरी त्यांनी नाशिकच्या विकासासंदर्भात मांडलेली भूमिका स्वागतार्ह आहे. तथापि, राजांना जे दिसतं व त्यांनी त्याची खंत राज्य शासनापुढे मांडली ती इथे राज्य करणाऱ्यांना दिसत नाही का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. त्यामुळेच सर्वसामान्य नाशिककरांची ‘बरं झालं राजे तुम्ही बोललात’, अशी सहज स्पष्ट प्रतिक्रिया उमटत आहे. (saptarang Latest Marathi Article sahyadricha maths by dr rahul ranalkar on chhatrapati sambhaji raje nashik news)

एका खासगी कार्यक्रमानिमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवरायांचे तेरावे वंशज संभाजीराजे छत्रपती एका व्यासपीठावर आले. या वेळी संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या आवडत्या विषयाला हात घातला. तो म्हणजे, गडकिल्ल्यांचे संवर्धन. संभाजीराजे छत्रपती अनेक वर्षांपासून गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटत आहेत. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी त्यांनी फोर्ट फाउंडेशनची स्थापना केली आहे. रायगड किल्ल्याच्या संवर्धनाची जबाबदारीदेखील संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांच्या अभ्यासानुसार कोल्हापूरपाठोपाठ नाशिकमध्ये सर्वाधिक गडकिल्ले आहेत. परंतु दुर्दैवाने नाशिकच्या गड व किल्ल्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. गडकिल्ल्यांच्या संवर्धनातून ऐतिहासिक संपत्तीचं जतन होण्याबरोबरच पर्यटनाचं केंद्र होण्याची क्षमता नक्कीच आहे. पर्यटनामुळे रोजगाराचे देखील चांगले पर्याय उपलब्ध होऊ शकतात. गडकिल्ल्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करताना पर्यटनासाठी पूरक असलेल्या विमानसेवेचा मुद्दा देखील राजेंनी छेडला.

येत्या ३० ऑक्टोबरपासून केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत नाशिकमधून सुरू असलेली विमानसेवा बंद करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. विमानसेवा बंद झाल्यास पर्यटनाला खीळ बसेल, असे मत राजेंनी व्यक्त केले. यात महत्त्वाचा मुद्दा असा, की नाशिकच्या विकासासंदर्भात राजेंना जे सुचलं किंवा सुचत आहे ते इथल्या विद्यमान लोकप्रतिनिधींना का सुचत नाही? फक्त निवेदन देण्यापुरतीच नेत्यांची भूमिका का असते? असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडला आहे.

वास्तविक, विमानसेवा बंद पडणं हे नाशिकच्या विकासाच्या दृष्टीनं धोकादायक आहे. एखाद्या शहरात जेव्हा मोठा प्रकल्प आणायचा असतो, त्या वेळी सविस्तर प्रकल्प अहवाल किंवा फिजिबिलिटी सर्व्हे सादर करावा लागतो. त्यातील व्यवहार्यता तपासून प्रकल्प करायचा की नाही, हे ठरते. नाशिकच्या विमान सेवेसंदर्भात कायमस्वरूपी डॉक्युमेंट तयार झाले आहे. २०२१ व २०२२ या कालावधीमध्ये ओझर विमानतळावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी आले व गेले. फेब्रुवारी महिन्यात १८ हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे नाशिकमधून विमानसेवा चालेल की नाही, याचं उत्तर प्रवाशांच्या आकड्यातून मिळतं.

त्यामुळे उडान योजनेंतर्गत का होईना नाशिकमधून विमानसेवा चालू ठेवणं विमान कंपन्या, केंद्र सरकार व नाशिककरांच्या दृष्टीनं देखील फायदेशीर आहे. विमानसेवा बंद होत असताना स्थानिक एकाही नेत्याकडून यासंदर्भात प्रतिक्रिया आलेली नाही. विमानसेवा बंद झाल्यानंतर पुढील ॲक्शन प्लॅन काय आहे? याचे नियोजन नाही. नाशिककरदेखील या संदर्भात गांभीर्यानं भूमिका मांडत नाहीत. जसा विमान सेवेचा विषय तसाच नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा रखडलेला प्रकल्प, टायर बेस मेट्रो, कृषिप्रक्रिया उद्योग या संदर्भात देखील गांभीर्यानं विचारमंथन होऊन ठोस कृती झालेली नाही.

नाशिकच्या विकासाला कोणी वाली नाही का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. स्थानिक पातळीवर हा विषय कोणी गांभीर्यानं घेतलेला नाही. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी विमानसेवा बंद होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली विनवणी महत्त्वाची ठरते. म्हणूनच जे इथल्या लोकप्रतिनिधींना सुचत नाही ते राजे तुम्ही बोलून दाखवलं, याबद्दल तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत.

कोविडकाळातील वजावट गृहीत धरावी

सध्या आयटी उद्योगाला बहर आहे. आयटी उद्योगांना इन्फ्रास्ट्रक्चरची फारशी आवश्यकता नसते. जमीन असली तरी उद्योग उभारणे सहज शक्य आहे. नाशिकमध्ये जमिनीची मुबलकता आहे. पाणी नाशिकसाठी मुबलक आहे. नाशिकचे आयटी उद्योगाला चालना मिळण्यासाठी विमानसेवा महत्त्वाची आहे. उडान योजनेंतर्गत देशात प्रतिसाद मिळणारे नाशिक दुसरे ठिकाण आहे. उडान योजनेंतर्गत सेवा बंद झाल्यास आयटी उद्योगांसाठी निर्माण झालेली किंचितशी आशादेखील संपुष्टात येणार आहे. केंद्र सरकारनं नाशिकसाठी विमानसेवा अखंड सुरू ठेवावी, अशी नाशिककरांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

ICC Women’s World Cup 2025 Points Table: भारताच्या पोरींनी शेजाऱ्यांना त्यांची जागा दाखवली, पाकिस्तानची गुणतालिकेत गोची केली

PMC News : बांधकाम परवानगीचे अधिकार द्या; समाविष्ट गावांबाबत पुणे महापालिकेचे राज्य सरकारला पत्र

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

SCROLL FOR NEXT