Gargoti museum
Gargoti museum esakal
सप्तरंग

नौदलातील संधी आणि गारगोटीचा छंद

सकाळ डिजिटल टीम

लेखक - के. सी. पांडे

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी गारगोटीचा मला साक्षात्कार झाला. पुढे नौदलातील सेवा कालावधीमध्ये गारगोटीबद्दलचे प्रेम, चिकित्सा, जिज्ञासा ही माझ्यामध्ये उत्तरोत्तर वाढत गेली. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा म्हणतात, ''निर्णय घेण्यावर माझा विश्वास नाही, मी आधी निर्णय घेतो व नंतर तो योग्य ठरवितो.'' असेच काहीसे माझ्या बरोबर घडले. वयाच्या सोळाव्या वर्षीच माझे उर्वरित आयुष्य हे गारगोटी प्रति समर्पित राहील, अशी मनाशी खूणगाठ मी बांधली. या मार्गात यश येईल, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नव्हती.

नेव्हीमध्ये काम करत असताना, माझा छंद मी कधीही कुणापासून लपवून ठेवला नाही. उलट हा माझा छंद एक प्रकारे माझी ओळख बनली. माझा हा आगळावेगळा छंद जोपासण्यासाठी मला कायम नौदलातील सर्व सहकारी अधिकारी यांनी कायम सहकार्य केले. माझ्या नौदलातीलसेवा कालावधीत जेव्हा जेव्हा आमच्या युनिटला भेट देण्यासाठी अधिकारी येत, तेव्हा माझ्या छंदाबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांना कायम सांगत असे. त्यामुळे मला नेहमी प्रोत्साहन व पाठबळ मिळत राहिले. नौदल स्टाफच्या विविध स्पर्धांमध्ये मिळवलेले यश त्याबद्दल मिळालेल्या ट्रॉफी, सर्टिफिकीट नौदलाच्या दर्शनी भागात गॅलरीमध्ये ठेवले जायचे. तिथे मी संग्रहित केलेली गारगोटीसुद्धा ठेवली गेली. कमांडोर आर. बी. डिसूजा, कमाडोर अरुण सक्सेना या नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मला कायम पाठबळ लाभले.

संरक्षण खात्यातील नोकरी अत्यंत कडक शिस्तीची आणि वरिष्ठांच्या कायम देखरेखीखाली असणारी सेवा मानली जाते. यात चुकीला माफी नाही 'झिरो एरर' ही संकल्पना या खात्यात अविभाज्य मानली गेली आहे. शिस्तीला अन्य कोणताही पर्याय नाही. कारण अत्यंत जबाबदारीपूर्वक नौदलातील सेवा पार पाडावी लागते. ही जबाबदारी पार पाडून मी माझा छंद देखील जोपासत होतो. याबद्दल माझ्या वरिष्ठांना कायम माझा अभिमान वाटला. कदाचित त्यांना माझ्यातील ही अनन्यसाधारण प्रतिभा जाणवली असेल म्हणूनच असे घडले असावे, असे मी मानतो. माझ्या मातेने जसे माझ्यावर संस्कार घडविले, तसेच नेव्हीनीही मला घडविले.

माझे ट्रेनिंग आयएनएस मांडवी गोवा येथे झाले, त्यानंतर नेवल इंडियन टेक्निकल इन्स्टिट्यूट कोचीन, आयएनएस शिवाजी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, आयएनएस विक्रांत, विराट, कोस्ट गार्ड हेलिकॉप्टर्स, आयएनएस कुंजली, नौदल मुख्यालय, न्यू दिल्ली तसेच डायरेक्टरेट ऑफ सी हरियार प्रोजेक्ट मध्येही महत्त्वाकांक्षी प्रकल्पात मला काम करण्याची संधी मिळाली. ऑक्टोबर1993 मध्ये यशस्वीरित्या सेवा करून मी निवृत्त झालो.

संरक्षण दलाच्या तीन शाखा आहेत. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. यामधील नौदल ही एकमेव अशी शाखा आहे, की ती जमीन, पाणी व हवाई म्हणजेच नेव्ही एव्हिएशनशी संबंधित आहे. देशातील सर्वोच्च सेवांपैकी ही एक सेवा होय. शिवाय अत्युच्च पातळीवरील आत्मिक समाधान देणारी ही सेवा आहे. नौदलातील जहाजांहून विमान उड्डाणे घेतात. यासाठी फ्लाईट डेक असतो. तेथे जमिनीप्रमाणे रन-वे नसतो. त्यामुळे कमीत कमी जागेमध्ये यशस्वीरित्या उड्डाण करण्याचे कसब व कौशल्य व त्यासाठी लागणारा टेक्निकल सपोर्ट हे अत्यंत महत्त्वाचे असते. शिवाय विमानांचे डिझेल मॅनेजमेंट अशा अनेक कामगिऱ्या लिलया पार पाडाव्या लागतात. या प्रक्रियेत मला सेवा करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो.

देशातील सर्वोच्च शिक्षण संस्था म्हणून आपण आयआयएम व आयआयटीकडे आपण बघतो. ज्यामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर नोकरीच्या मोठ-मोठ्या संधी उपलब्ध असतात. तसेच इंडियन नेव्ही मध्येही करिअर केल्यास अनेक संधी उपलब्ध आहेत. देशाची सेवा करण्याचा सार्थ अभिमानही आहे. म्हणूनच युवकांनी देशसेवेसाठी प्राधान्य देऊन संरक्षण खात्यातील सेवा स्वीकारावी. अत्युच्च आनंद देणारे अनेक प्रसंग त्यातून आपल्याही आयुष्यात निश्चितच येतील.

(लेखक हे सिन्नरस्थित जगप्रसिद्ध गारगोटी संग्रहालयाचे संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT