sex.j 
सप्तरंग

मानवाची लैंगिक वर्तणूक कशी ठरते

डॉ. संजय देशपांडे लैंगिक समस्या तज्ज्ञ 9922941483 sanjaygdeshpande2@rediffmail.com

मानवाची लैंगिक वर्तणूक कशी ठरते हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ही समाजात जेव्हा आपली वाढ होते तेव्हा भवतालच्या लोकांच्या वर्तणूक, समजूत, धार्मिक रूढी व परंपरा आणि प्रसार व समाजमाध्यमे यावरून घडत असते. मात्र, लैंगिक वर्तणुकीबाबत व लैंगिकसंबंधांबाबत गैरसमजही मोठ्या प्रमाणात असतात. हे सर्व आपण एक सामाजिक प्राणी म्हणून कळत-नकळत समाजापासून शिकत असतो. यात योग्य व अयोग्य वर्तन या दोन्हींचा समावेश असतो. त्या अनुषंगाने आपण लैंगिक वर्तणुकीची जडणघडण जाणून घेऊया.
लैंगिक वर्तणूक म्हणजे स्त्री-पुरुषांचे एकमेकांशी वागणे, बोलणे आणि त्यांच्यात स्थापित होणारे शारीरिक व मानसिक संबंध; या सगळ्यांचा अंतर्भाव लैंगिक वर्तणुकीमध्ये होत असतो. लैंगिक वर्तणूक ही वेगवेगळ्या प्रकारची असते. जेव्हा एखादा पुरुष अथवा स्त्री स्वतःहून स्वतःचे लैंगिक समाधान प्राप्त करीत असतो, तेव्हा त्याला हस्तमैथुन असे म्हणतात. हस्तमैथुनासंबंधी बरेच गैरसमज समाजात प्रचलित आहेत. पुढील लेखांमध्ये त्यावर सविस्तर चर्चा करू. लैंगिक वर्तणुकीमध्ये अगदी सर्वमान्य अशी लैंगिक वर्तणूक म्हणजे एक स्त्री आणि पुरुष यांचे लैंगिक संबंध; त्यास शारीरिक संभोग असे म्हणतात. संभोग हा शब्द सम आणि भोग या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. सम म्हणजे समान. संभोग म्हणजे दोघांनी समान रीतीने तो भोगायला हवा असा! म्हणजेच लैंगिक संबंधांमध्ये दोघांचा वाटा हवा व लैंगिक समाधान, तृप्तीही दोघांना समान मिळावी.
विभिन्नलिंगी लैंगिक आकर्षणाव्यतिरिक्त पण अन्य लैंगिक अभिमुखता (सेक्‍स्युअल ओरिएंटेशन) आढळतात. त्या लैंगिक वर्तणुकींबद्दल आपला समाज बोलण्याचे टाळतो. मात्र, सुज्ञ समाज म्हणून आपणास त्यासंबंधी बोलणे आवश्‍यक आहे. समाजाच्या सुदृढतेसाठी निश्‍चितच गरजेचे आहे. ही लैंगिक वर्तणूक म्हणजे एलजीबीटी: लेस्बियन, गे, बायसेक्‍स्युअल आणि ट्रान्सजेंडर. तसं बघितलं तर हे लैंगिक अल्पसंख्यांक आहेत. यापैकी लेस्बियन, गे आणि बायसेक्‍स्युअल हे होमोसेक्‍स्युअल म्हणजे समलैंगिक अभिमुखता(ओरिएंटेशन)ला प्राधान्य देतात. म्हणजे जेव्हा एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होत असेल आणि लैंगिक संबंध प्रस्थापित करीत असेल तर त्यास लेस्बियन असे म्हणतात. अगदी त्याचप्रकारे एखादा पुरुष दुसऱ्या पुरुषाकडे लैंगिक दृष्टीने आकर्षित होऊन संबंध प्रस्थापित करीत असेल तर त्यास गे असे म्हणतात. या दोन्ही बाबींमध्ये स्त्री आणि पुरुष आपली लैंगिक ओळख(स्त्री/पुरुष) जी आहे, तिचा स्वीकार करतात आणि समान लिंगाच्या व्यक्तीकडे आकर्षित होतात. आणि ट्रान्सजेंडर म्हणजे ज्याला समाज तृतीयपंथी म्हणतो. त्यामध्ये या वर्तणुकीचे कारण भिन्न असते. ट्रान्सजेंडर व्यक्ती पुरुष असला तरी त्यास आतून स्त्री आहे असे वाटते. आणि मग पर्यायाने तो पुरुषाकडे आकर्षित होतो. त्याचप्रकारे स्त्रीलासुद्धा आपण पुरुष आहोत असे वाटते व त्यावरून त्यांची पुढील लैंगिक वर्तणूक घडते. ही मात्र, समलैंगिकता नव्हे, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
आपल्या समाजातील लोकांना ही बाब चुकीची वाटते. पण खरंच ही बाब चुकीची आहे का?
जसं आपण म्हणतो की आपला भारत देश धर्मनिरपेक्ष आहे. सर्वधर्म समभाव ही आपली भावना असते. त्यामुळे अल्पसंख्याकांचे रक्षण करणे हे बहुसंख्याकांचे कर्तव्यच होय. तसंच समलैंगिकता आणि वर चर्चा केलेली लैंगिक वर्तणूक अगदी नैसर्गिक आहेत, असे वैद्यकशास्त्र ठामपणे सांगते. मात्र, एलजीबीटी अभिमुखता असलेल्यांची संख्या कमी आहे. आणि भिन्नलिंगी (भिन्न लिंगी व्यक्तीकडे आकर्षित होणारे) व्यक्तींची समाजातील संख्या नेमकी किती आहे हे सांगता येणार नसले तरी ती जवळपास 95 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. त्यामुळे एलजीबीटी लैंगिक वर्तन असणाऱ्या लोकांची संख्या कमी असल्याने ते अल्पसंख्याक ठरतात व त्यांचे लैंगिक वर्तन चूक आहे, असा एक समज होतो. अलीकडे सुप्रीम कोर्टाने कलम 377 मधून ही बाब अपराधाच्या कक्षेतून काढल्याने समलैंगिकांना थोडं स्वातंत्र्य मिळालं आहे. मात्र, पूर्वी हे संबंध चोरून व्हायचे म्हणून लैंगिक आजाराची शक्‍यता वाढायची आणि समलैंगिक वर्तन असल्याने डॉक्‍टरकडे जाणे टाळायचे; त्यामुळे अधिक गुंतागुंत निर्माण होत असे. लैंगिक वर्तणूक जी समाजाला मान्य असते ते उघडपणे केले जाते आणि जे लैंगिक वर्तन समाजाला मान्य नसते ते चोरून अथवा लपून केले जाते आणि जेव्हा एखादे लैंगिक वर्तन चोरून अथवा लपून केले जाते त्यामुळे अधिक गुंतागुंत आणि समस्या निर्माण होतात. याशिवाय लैंगिक संबंध स्थापित करताना मुखमैथुन, गुदामैथुन आणि नियमित लैंगिक मैथुन यांचाही अंतर्भाव असतो. मात्र, हे सगळे संबंधांचे प्रकार प्रत्येकालाच आवडतील असे नसते. त्यामुळे आपल्या जोडीदाराची संमती असेल तरच हे करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

SCROLL FOR NEXT