Sharda Bhilare writes about favourite song of Lata Mangeshkar
Sharda Bhilare writes about favourite song of Lata Mangeshkar  
सप्तरंग

Happy Birthday Lata Mangeshkar : मन लतादीदींचे सुर कानावर पडत नाही तोवर शांत व्हायचेच नाही

शारदा श्रीकांत भिलारे

लता दीदींच्या गाण्याचं आपल्या मनावरचं गारूड शब्दात मांडणे केवळ अशक्यच...आणि त्यासाठी एक गाणं निवडण म्हणजे आपल्याच मुलांमध्ये डाव उजव करण्यासारखं. शेवटी मी दोन दिवस शेकडो गाणी पुन्हा पुन्हा ऐकली आणि पुन्हा एकदा जाणवलं. अगदी बालपणापासून ही सुरावट हा आवाज आपला सोबती आहे. पूर्वी जेव्हा आजच्यासारखे हवे ते गाणे हवे तेव्हा ऐकायची सोय नव्हती तेव्हा रात्री छायागीत, बेला के फूल ऐकून मगच लिखाण करायचे. मन लतादीदींचे सुर कानावर पडत नाही तोवर शांत व्हायचेच नाही.

गाणी बदलत गेली. मग ते येरे घना असो की हमने देखी हैं उन आँखोंकी महकती खुशबू असो, अजीब दासता हैं ये, असो किंवा थोडीशी जमी थोडा आस्मान तिनकोंका हैं एक आशियां असो सर्वच गाण्यांना लतादीदींच्या आवाजाचा परीसस्पर्श झालेला, म्हणून ही गाणी त्यांची अवीट गोडी कधी कमी झालीच नाही.पण मी आज जे गाणं निवडलय ते आहे 

फैली हुई हैं सपनो की बाहे आजा चल दे कही दूर..
वही मेरी मंझिल वही तेरी राहे आजा चल दे कही दूर..

आजकाल बरेचदा कुठेतरी जावस वाटत. कधी सगळं सोडून जावस वाटत तर कधी बदल म्हणून. पण अस वाटलं की मी हे गाणं ऐकते. साहीरचे शब्द आणि लता चे सुर आपण फक्त डोळे मिटून घेणे आणि कानात प्राण आणून एकजीव होवून ऐकणे.

उंची घटा के छाये तले छुप जाये धुंधली फिजा मे कुछ खोये कुछ पाये. सासोंकी लय पे कोई ऐसी धून गाये.. दे दे जो दिलं को दिलं की पनाहे..
आजा चल दे कही दूर...

ऐकता ऐकता खरंच मन शांत होवून जात... सुरावट तनामनात डोक्यात फिरू लागते आणि मी सुरावटी बरोबर मी वेगळ्याच विश्वात जाते ..कल्पना कार्तिकच पडद्यावर लताच्या सुरावटी वर बागडण केवळ आनंददायी, अप्रतिमच....

झुला धनक का धीरे धीरे हम झूले,
अंबर तो क्या हैं तारो के भी लब छूले,
मस्ती मे झुमे और सभी गम भूले,
देखे ना  पीछे मुडके निगाहे ..
आजा चल दे कही दूर...

बस दूर जायचं तेही अस तस नाही ताऱ्यांनाच गवसणी घालण्याची स्वप्न आणि भूतकाळ. सगळी दुःख विसरायची आहेत. अगदी नजरेनेही मागे वळून पाहायचे नाहीय. अस दूर जायचय मस्तच ना मला तर मग लता ची सुरावट पुरते खूप दूर जावून माझ्या जगात.. हलकं फुलकं होवून परतायला. आभार दीदी..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT