pavel durov sakal
सप्तरंग

माध्यम स्वातंत्र्यवीर!

एक डिप्लोमा कोर्स त्याने केलेला होता. लहानपणापासूनच दुरोव कॉम्प्युटरच्या जगात रमलेला होता. त्याने २००६ मध्ये ‘व्ही’ नावाची सोशल नेटवर्किंग साइट सुरू केली.

सकाळ वृत्तसेवा

-डॉ. प्रिया दंडगे

एका ठराविक टप्प्यावर, केवळ पैसे कमावणे, इतक्याच मर्यादेपर्यंत तुमचे आयुष्य राहत नाही. तुम्हाला एक ठाम भूमिका आयुष्यात घ्यावी लागते. कदाचित, अशी भूमिका घेतल्यानंतर तुमच्यावर खूप मोठे संकट येऊ शकते. परंतु, अशा संकटांना न घाबरता जे लोक आपले म्हणणे ठामपणे मांडतात, तेच लोक जगात यशस्वी म्हणवले जातात. पॉवेल दुरोव हा रशियाचा मार्क झुकेरबर्ग म्हटला जातो. त्याने फेसबुकप्रमाणेच ‘वीकॉन्टॅकते’ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनवला आहे, ज्याचे रशिया, युक्रेन आणि प्रागमध्ये १०० लाखांहून अधिक यूजर्स आहेत. सेंट पीटर्सबर्ग येथे जन्मलेल्या पॉवेल दुरोवचे बालपण इटलीमध्ये गेले. तो मोकळ्या विचारांमध्ये वाढला. जेव्हा रशियात परत आला, त्यावेळी त्याच्याकडे विद्यापीठाची पदवीदेखील नव्हती.

एक डिप्लोमा कोर्स त्याने केलेला होता. लहानपणापासूनच दुरोव कॉम्प्युटरच्या जगात रमलेला होता. त्याने २००६ मध्ये ‘व्ही’ नावाची सोशल नेटवर्किंग साइट सुरू केली. या साइटला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आणि इथेच खरी गंमत सुरू झाली. रशियाच्या इंटेलिजन्स एजन्सीने दुरोवकडे ‘व्ही यूजर्स’चा पर्सनल डाटा मागितला; परंतु दुरोवने रशियन इंटेलिजन्स एजन्सीला साफ नकार दिला. आपल्या यूजर्सची खासगी माहिती तो इंटेलिजन्स एजन्सीला द्यायला तयार नव्हता. त्यातूनच रशियन सरकारचे आणि त्याचे वाकडे झाले. याच दरम्यान पुतीन यांचे विरोधक अलेक्सी यांच्या पेजला ब्लॉक करण्यास त्याने नकार दिला. त्यामुळे रशियन सरकारने त्याच्याविरुद्ध कारस्थाने करायला सुरुवात केली. त्याच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव टाकायला सुरुवात झाली. मग दुरोवने एक दिवस, आपण आपल्या कंपनीचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. काही दिवसांनी त्यानेच ते खोटे असल्याचे सांगितले.

काहीतरी निश्चित घडत होते, त्याच्यावर रशियन सरकार दबाव आणत होते. या दबावाखाली त्याला व त्याचा भाऊ निकोलाय यांना काम करणे अशक्य होऊन बसले होते. त्यावेळी दुरोवने रशिया सोडण्याचा निर्णय घेतला आणि वेस्ट इंडिज बेटांपैकी सेंट किट्स अँड नेवीस या एका छोट्याशा, फारसे माहीत नसलेल्या देशात नागरिक म्हणून आश्रय घेतला. त्यासाठी त्याला बरेच लाख रुपये मोजावे लागले. परंतु, आपला देश सोडून जाण्याशिवाय त्याला गत्यंतर राहिले नव्हते. त्यानंतर तो बर्लिनमध्ये गेला. तिथे त्याने २०१३ मध्ये व्हॉट्सॲपप्रमाणेच ‘टेलिग्राम ॲप’ तयार केले. त्यालाही प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. दुरोव पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर विराजमान झाला. अमाप संपत्तीचा मालक झाला. परंतु, आपल्या कंपनीच्या स्वातंत्र्यासाठी त्याने घेतलेली भूमिका ही त्याला त्याच्या देशापासून, त्याच्या माणसांपासून दूर घेऊन आली.

दुरोव एरवी माध्यमांपासून दूर राहणारा आहे. तो क्वचितच कुठल्या कार्यक्रमात भाग घेतो. त्याच्या टेलिग्रामवरूनच तो आपल्या चाहत्यांशी बोलत असतो. ‘आपले स्वातंत्र्य, आपले खासगी आयुष्य या विक्रीच्या गोष्टी असू नयेत. आणि, भीती किंवा स्वार्थ... कोणत्याही कारणास्तव मानवी मूल्ये पायदळी तुडवली जाऊ नयेत!’ असे त्‍याचे स्‍पष्ट मत आहे. माणसाचे स्वातंत्र्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे, याचा केवळ शाब्दिक पुरस्कार न करता, आपल्या कृतीतूनही दाखवून देणारा, तो एक धडाडीचा योद्धा आहे. प्रसंगी आपल्या देशातून बाहेर पडून, संपत्तीचे नुकसान करून घेऊनदेखील त्याने आपली स्वातंत्र्यावरील श्रद्धा ढळू दिली नाही, हेच त्याचे वैशिष्ट्य आणि मोठेपण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT