Subhashit Ratnani satisfaction solution spirituality significance Sakal
सप्तरंग

संतोष-समाधान

ज्याच्या पायात जोडा आहे त्याला खरोखर सगळी पृथ्वीच ज्याप्रमाणे चामड्यानं मढवल्यासारखी वाटते; त्याचप्रमाणे, जो मुळातच संतुष्ट-समाधानी असतो तो जणू सर्व प्रकारच्या संपत्तीचा धनी असतो.

मंजिरी धामणकर

सर्वाः संपत्तयस्तस्य संतुष्टं यस्य मानसम्।

उपानद् गूढपादस्य ननु चर्मावृतैव भूः।।

अनुवाद : जणु सगळे धन लाभे त्याला संतुष्टचि जो सदा असे पायी जोडा ज्याच्या, त्याला चर्मावृत पृथ्वी भासे

अर्थ : ज्याच्या पायात जोडा आहे त्याला खरोखर सगळी पृथ्वीच ज्याप्रमाणे चामड्यानं मढवल्यासारखी वाटते; त्याचप्रमाणे, जो मुळातच संतुष्ट-समाधानी असतो तो जणू सर्व प्रकारच्या संपत्तीचा धनी असतो.

सर्पाः पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते शुष्कैस्तृणैर्वनगजा बलिनो भवन्ति।

कन्दैः फलैर्मुनिवरा गमयन्ति कालं संतोष एव पुरुषस्य परं निधानम्।।

अनुवाद : वारा पिउनी सर्प कधी दुबळे असती? अन् गवत वाळके खाउन गज बलशाली नसती? केवळ कंदमुळे सेवुनी राहति ऋषि-मुनि, मनुजाचे संतोष हे खरे निधान जगती

अर्थ :फक्त वाराच पिणारे सर्प दुबळे थोडेच असतात? वाळलेलं गवत खाऊन हत्ती बलाढ्य नसतात? ऋषी-मुनी केवळ कंदमुळेच खाऊन जगतात. यातलं मर्म असं की, संतोष हेच माणसाचं खरं निधान, ठेवा.

संतोषामृततृप्तानां यत्सुखं शान्तिरेव च।

न च तद्धनलुब्धानामितश्चेतश्च धावताम्।।

अनुवाद : संतोषामृत सेवन करुनी लाभे जे सुख अन् शांती कधि न पावती धनलोभी ते इथेतिथे धावत सुटती

अर्थ : संतोषरूपी अमृत पिऊन तृप्त झालेल्यांना जे सुख आणि जी शांतता लाभते, ती पैशाच्या लोभानं इकडं तिकडं धावणाऱ्यांना कधीच मिळणार नाही.

गन्धाढ्यां नवमल्लिकां मधुकरस्त्यक्त्वा गतो यूथिकाम्।

तां दृष्ट्वा ऽ शु गतः स चन्दनवनं पश्चात्सरोजं गतः।

बद्धस्तत्र निशाकरेण सहसा रोदित्यसौ मन्दधीः।

संतोषेण विना पराभवपदं प्राप्नोति सर्वो जनः।।

अनुवाद : गंधित जाई सोडुन भुंगा गेला जुईच्या फुलावरी

काहि क्षणांनी चंदनवनि, गेला नंतर तो कमळावरी

सूर्य बुडाला, चंद्र उदेला...रडू लागला तो मूर्ख

वणवण करुनी हरताती असंतोषी जन खरोखरी

अर्थ : जाईची सुगंधित कळी सोडून एक भुंगा जुईच्या फुलावर गेला. तिथं थोडा वेळ थांबून लगेच चंदनवनात गेला आणि तिथून उडून तळ्यातल्या कमळावर जाऊन बसला. तेवढ्यात सूर्य मावळला, चंद्र उगवला, ते सूर्यविकासी कमळ मिटलं आणि मग हा मूर्ख लागला रडायला. या भुंग्यासारखी असंतुष्ट राहणारी माणसं अशीच संकटात सापडून पराभूत होतात.

सन्तोषस्त्रिषु कर्तव्यः स्वदारे भोजने धने।

त्रिषु नैव च कर्तव्यो दाने तपसि पाठने।।

अनुवाद : तिन्हींमध्ये संतोष असावा पत्नी, भोजन आणि धन तिन्हींमध्ये संतोष नसावा दान-तपस्या-अध्यापन

अर्थ : आपली पत्नी, आपल्यासमोर असणारं जेवण आणि आपल्याजवळ असणारं धन या तीन गोष्टींत माणसानं नेहमी समाधानी असावं; पण दानधर्म, अभ्यास-तपश्चर्या आणि आपल्याला येतं ते दुसऱ्याला शिकवणं या तीन गोष्टींत मात्र कधीही संतुष्ट असू नये. म्हणजेच, त्या गोष्टींत कधी खंड पडू देऊ नये.

ते धन्याः पुण्यभाजस्ते तैस्तीर्णः क्लेशसागरः।

जगत्संमोहजननी यैराशाशीविषी जिता।।

अनुवाद : पुण्यवान ते धन्य, भवाचा सागर जे तरुनी गेले मोहमयी आशा नागिणीला ज्यांनी ज्यांनी जिंकियले

अर्थ : आशीविषी म्हणजे नागीण. ही आशारूपी नागीण जगाला संमोहित करत असते. तिला जे वश होतात ते या क्लेशदायक भवसागरातच गटांगळ्या खात राहतात; पण जे त्या नागिणीला जिंकतात, म्हणजेच नेहमी समाधानी-संतुष्ट असतात, ज्यांना सतत ‘हे हवं, ते हवं,’ अशी आसक्ती नसते, तेच पुण्यवंत हा क्लेशदायी भवसागर तरून जाऊ शकतात. ते धन्य आहेत.

(लेखिका ह्या भाषांतरकार, भाषाप्रशिक्षक, निवेदिका, तसंच एकपात्री कलावंत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

Election Commission Decision: बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

Nano Banana AI 3D Video Prompt: मॉडेल इमेजेसनंतर आता 3D व्हिडिओ ट्रेंड, एका मिनिटापेक्षा कमी वेळात तयार करा खास व्हिडिओ

Latest Marathi News Updates : मीनाताई ठाकरे पुतळ्याचा अवमान, दोषींना अजिबात सोडले जाणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pre-Wedding Photoshoot: प्री-वेडिंग शूट करायचंय? मग साताऱ्याचं कास पठार आहे एक परफेक्ट ठिकाण!

SCROLL FOR NEXT