सप्तरंग

सीजीसीआरआय (सुधीर फाकटकर)

सुधीर फाकटकर sudhirphakatkar@gmail.com

काच आणि मृत्तिका (सिरॅमिक) विज्ञान-तंत्रज्ञानाचं महत्त्व व्यापक स्वरूपाचं आहे. सन १९५० पर्यंत आपल्या देशात फक्त साध्या काचांचं मर्यादित उत्पादन होत असे. या विषयक्षेत्रातल्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत परकीय मदतीची आवश्‍यकता ओळखून सीएसआयआरनं देश स्वतंत्र होण्याच्या आधीच १९४४ ला मर्यादित स्वरूपात ‘केंद्रीय काच आणि मृत्तिका संशोधन संस्थे’ची (सीजीसीआरआय) उभारणी केली. पुढं १९५० मध्ये सीजीसीआरआयचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं.

सीजीसीआरआयचा उद्देश काच आणि मृत्तिका तंत्रज्ञानात उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण संशोधन करणं, तसेच या संशोधनातून देशातल्या गरजांसाठी तंत्रज्ञान विकसित करत आणि आर्थिक उत्कर्ष साधत नवनिर्माण साध्य करणं असा आहे.
काचेचं उपयोजन सूक्ष्मदर्शक, दुर्बिण, द्विनेत्री, कॅमेरा, प्रोजेक्‍टर, थिओडोलाईट, पेरिस्कोप, रेंज फाइंडर, प्रकाश व अवरक्त किरण ऊर्जा संवेदन करणारी साधनं, वेगवेगळे गुणधर्म असलेल्या काचा-तावदानं, तसंच शस्त्रसामग्रीशी संबंधित साधनांपासून ते कृत्रिम स्फटिक, सौरघटक, काचतंतू, इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्रातल्या विविध प्रकारच्य दिव्यांपर्यंत असं विस्तृत कार्यक्षेत्र या संस्थेचं आहे.  

मृत्तिका म्हणजे निसर्गातले अतिसूक्ष्म कणरूपी द्रव्य (असेंद्रिय, अधातू पदार्थ). प्रक्रिया केल्यानंतर यांचे विविध गुणधर्म बदलून असंख्य उपयोग असतात. पारंपरिक विटा-मडक्‍यांपासून इलेक्‍ट्रॉनिक्‍स घटक, अर्धवाहक पदार्थ, विद्युत आणि यांत्रिक प्रणालीत असंख्य घटकांसाठी मृत्तिका उपयोगात येते. सीजीसीआरआयमध्ये काच, काचतंतू, इंधनघट, जैवमृत्तिका पटल, नॅनो पातळीवरचे पदार्थ, अद्ययावत पदार्थगुणवत्ता, उपकरण आणि पारंपरिक मृत्तिका व भट्टी असे स्वतंत्र संशोधन विभाग आहेत. याखेरीज अभियांत्रिकी, तपासणी, कार्यशाळा या सुविधांबरोबरच संगणक विभाग आणि ५० हजार ग्रंथांनी सुसज्ज असं ग्रंथालय आहे. सीजीसीआरआयकडून नियमितपणे वार्तापत्र, तसंच संशोधन, स्वामित्व हक्कांची माहिती प्रसिद्ध केली जाते. बदलत्या विज्ञान-तंत्रज्ञानानुसार काच आणि मृत्तिकेबरोबरच अभ्रक, उष्णता-अग्निरोधक पदार्थ, कृत्रिम शारीरिक अवयव आदी विषयक्षेत्रांमध्येही ही संस्था कार्यरत आहे.

सीजीसीआरआयमध्ये रासायनिक, जैव-वैद्यकीय, उत्पादन इलेक्‍ट्रॉनिक्‍स-उपकरण या अभियांत्रिकी शाखा, पदार्थविज्ञान आणि ृमृत्तिकातंत्रज्ञान या विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी अल्पकालीन प्रशिक्षण, संशोधन प्रकल्प सहायक, मदतनीस ते पीएच.डी.चं उच्च शिक्षण आणि पुढील कार्यक्षेत्राच्या संधी उपलब्ध असतात. सीजीसीआरआयची नरोडा (जि. अहमदाबाद) आणि खुरजा (जि. बुलंदशहर) इथं प्रसिद्धी आणि विस्तारित केंद्रं आहेत.

संस्थेचा पत्ता -
  केंद्रीय काच आणि मृत्तिका संशोधन संस्था
  १९६, राजा एस. सी. मलिक मार्ग, कोलकता - ७०००३२.
  दूरध्वनी - (०३३) २४७३३४६.
  संकेतस्थळ - www.cgcri.res.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT