rafael nadal sakal
सप्तरंग

प्रेक्षक ‘रसिक’ हवेत

संजय मांजरेकर माझा क्रिकेटचा मित्र. आम्ही कुचबिहार करंडक, सी. के. नायडू करंडक एकाच वर्षी खेळलो. नंतर विद्यापीठाच्या सामन्यातही एकत्र होतो. साहजिकच आमची मैत्री रुळत गेली.

सुनंदन लेले sdlele3@gmail.com

संजय मांजरेकर माझा क्रिकेटचा मित्र. आम्ही कुचबिहार करंडक, सी. के. नायडू करंडक एकाच वर्षी खेळलो. नंतर विद्यापीठाच्या सामन्यातही एकत्र होतो. साहजिकच आमची मैत्री रुळत गेली.

संजय मांजरेकर माझा क्रिकेटचा मित्र. आम्ही कुचबिहार करंडक, सी. के. नायडू करंडक एकाच वर्षी खेळलो. नंतर विद्यापीठाच्या सामन्यातही एकत्र होतो. साहजिकच आमची मैत्री रुळत गेली. आम्ही एकमेकांना लिहिलेली लेखी पत्रंही आहेत. परिणामी संपर्क कायम राहिला. खूप वर्षांआधीची गोष्ट आहे... पुण्यात रणजी सामना खेळायला संजय मांजरेकर आला होता. सामन्याअगोदर वेळ होता म्हणून संजय मला म्हणाला, ‘‘संध्याकाळी वेळ आहे. जेवायला तर जाऊयातच, पण त्या अगोदर पुण्यात कुठेतरी खास जागी जाऊयात की.’’ मला कल्पना सुचली. तो काळ जानेवारी महिन्याचा होता आणि नेमका सवाई गंधर्व महोत्सव सुरू होता. संजय मांजरेकर गाण्याचा रसिक म्हणून मी त्याला थेट सवाईला घेऊन जाण्याची योजना आखली.

जेव्हा आम्ही सवाई गंधर्वच्या मंडपात पोहोचलो, तेव्हा मालिनी राजुरकर यांचे सुरेल गाणे सुरू होते. जवळपास आठ-दहा हजार प्रेक्षक त्याचा आनंद घेत होते. वातावरण अगदी सुरांनी भारलेले होते. संजय ते वातावरण बघूनच थक्क झाला. आलाप संपून थोडा काळ मध्ये असताना संजय मांजरेकरने निरीक्षण करून मला एक गोष्ट विचारली. तो म्हणाला, ‘‘सुनंदन, इतक्या प्रचंड प्रमाणात प्रेक्षक महोत्सवाला हजर असताना सुरक्षा कर्मचारी किंवा पोलिस इतक्या कमी संख्येत कसे आहेत?’’ एक पक्का पुणेकर म्हणून मी बरीच वर्षे सवाई गंधर्व महोत्सवाला जात-येत असल्याने हा प्रश्न माझ्या डोक्यात कधीच शिरला नव्हता. मी संजयला म्हणालो, ‘‘गरजच नाही ना मित्रां सुरक्षा कर्मचाऱ्यांची. कारण इथे तू आणि मी सोडून सगळे पक्के रसिक लोक आहेत. सगळे स्वयंशिस्त पाळतात. कोणतीच गडबड या जागी कधीच होत नाही.’’

खेळाचे मैदान असो वा गाण्याची मेहफील... रसिक प्रेक्षकांविना त्यात जान येत नाही. ‘सवाई गंधर्व’चा विषय निघाला म्हणून सांगावेसे वाटते की, पुणेकर प्रेक्षकांनी चांगल्या कलेला दिलेली भरभरून दाद मी सवाईच्या मंडपात बघितली आहे, तसेच ताकदीचे गायन झाले नाही म्हणून उगाच टाळ्या वाजवून कलाकाराला परत तयारी करून गाणे सादर करा, असा एकही शब्द न उच्चारता मारलेला टोमणाही बघितला आहे. मोठ्या आजारातून सावरून पंडित भीमसेन जोशी काही कालावधीनंतर सवाईला हजर झाल्यावर त्यांना आनंदाश्रूंसह उभे राहून टाळ्यांच्या गजरात दिलेली मानवंदना मी प्रत्यक्ष अनुभवली आहे.

आज हा प्रसंग मला आठवला, कारण रसिक आणि स्वयंशिस्त पाळणाऱ्या प्रेक्षकांची किती मोठी गरज असते, हा विचार माझ्या मनात येऊन गेला. खास करून गेल्या शनिवारी-रविवारी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या महिलांच्या आणि पुरुषांच्या अंतिम सामन्यात स्थानिक ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी केलेले वर्तन मला विचार करायला लावून गेले आहे.

वेस्ट इंडीजचे प्रेक्षक समरसून सामना बघायचे, असे बरेच जुने जाणते खेळाडू कौतुकाने सांगतात. खट्याळ रसिक प्रेक्षक सामन्याचा रंग वाढवतात. लॉर्ड्‍स मैदान किंवा विम्बल्डनला सामने बघताना सुंदर अनुभव येतो. त्याचे कारण असे आहे की, तिथले प्रेक्षक रसिकता दाखवतात. खेळाडू कोणत्याही देशाचा असो... चांगल्या खेळाला भरभरून दाद देतात. तसा अनुभव ऑस्ट्रेलियात येईलच, असे सांगता येत नाही.

ऑस्ट्रेलियन प्रेक्षक वेगळे

गेल्या शनिवारी महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात स्थानिक खेळाडू अ‍ॅशले बार्टीचा मुकाबला अमेरिकेच्या डॅनिएल कॉलिन्सबरोबर होता. पहिला सेट बार्टीने घेतला होता. दुसऱ्या सेटमध्ये कॉलिन्सने ५-१ आघाडी घेतली असताना स्थानिक प्रेक्षकांनी लोकल गर्ल बार्टीला जोरजोरात टाळ्या वाजवून ओरडून आवाजी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. बघता बघता परिस्थिती बदलू लागली. बार्टीने घेतलेल्या प्रत्येक गुणाला इतकी दाद मिळू लागली की बोलायची सोय नाही. व्हायचा तो परिणाम झाला. बार्टीने पुढील चार गेम्स घेत ५-५ बरोबरी साधली. चांगल्या खेळाची लय पुढे पकडून ठेवताना अ‍ॅशले बार्टीने दुसरा सेट टाय ब्रेकरमध्ये घेत विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियन महिलेने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद ४४ वर्षांच्या कालखंडानंतर जिंकल्याने प्रेक्षकांच्या आनंदाला उधाण आले. सहभागी खेळाडू ऑस्ट्रेलियन असल्याने प्रेक्षकांनी बार्टीला पाठिंबा दिला, ज्याचे आश्चर्य वाटले नाही.

खटकणारे वर्तन

पुरुषांच्या अंतिम सामन्यात रफाएल नदालची लढत रशियाच्या डॅनियल मेडवेडेव बरोबर होती. जबरदस्त फॉर्मात असलेल्या मेडवेडेवने चांगला खेळ करून पहिले दोन सेट जिंकले. प्रेक्षकांना लांबणारा सामना बघायची इच्छा होती. त्यांनी तिसऱ्या सेटमध्येही सुरुवातीला मागे पडलेल्या नदालला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. हा प्रकार प्रत्येक क्षणागणिक वाढत गेला. नदालने पुढील दोन सेट जिंकत बरोबरी साधली तेव्हा ऑस्ट्रेलियन प्रेक्षक नदालला अजून चिथावणीखोर प्रोत्साहन देऊ लागले. डॅनियल मेडवेडेव चुकला की प्रेक्षक किंचाळून ओरडत आनंद व्यक्त करू लागले. मेडवेडेवने चांगला फटका मारून गुण घेतल्यावर अगदी बोटावर मोजता येणारे रशियन प्रेक्षक मेडवेडेवला प्रोत्साहन द्यायला लागले की स्थानिक प्रेक्षक त्यांना गप्प करू लागले. मेडवेडेव पहिली सर्व्हिस चुकला तर दुसरीपण चूक, असे ओरडून सांगू लागले. हा प्रकार हाताबाहेर जायला लागल्यावर मुख्य पंचांनी खराब वर्तन करणाऱ्या प्रेक्षकांना सुरक्षा कर्मचारी बाहेर काढू शकतात, असा सज्जड दम दिला. शनिवारच्या सामन्यात सहभागी खेळाडू ऑस्ट्रेलियन होती म्हणून प्रेक्षकांचे अवाजवी प्रोत्साहन निदान समजून घेता आले. रविवारच्या सामन्यात तसेही नव्हते.

अत्यंत कठीण परिस्थितीतून गेलेला तोल सावरत नदालने सामना जिंकला, यात तिळमात्र शंका नाही. फक्त त्याला प्रेक्षकांनी अनावश्यक आक्रमक साथ दिली, हे नाकारून चालणार नाही. सामन्यानंतर बोलताना डॅनियल मेडवडेवने नदालची मनापासून स्तुती केली. आपण निर्णायक गुणांवर सामना असताना अपेक्षित खेळ केला नाही हे उघड मान्य केले. फक्त प्रेक्षकांच्या वर्तनाचा त्याच्या मनावर खोल आणि विपरीत परिणाम झाल्याचे स्पष्ट बोलून दाखवले.

मेहफील असो वा खेळ... तो रंगायला जाणकार रसिक प्रेक्षक एक अविभाज्य घटक आहेत. हेच मायबाप प्रेक्षक जेव्हा एकांगी प्रोत्साहन द्यायला लागतात आणि कोणा एका खेळाडूला उचलून डोक्यावर घेताना दुसऱ्या खेळाडूला त्रास देतात, तेव्हा ते मनाला जाम खटकते.

रफाएल नदालने विक्रमी २१वे ग्रॅन्ड स्लॅम विजेतेपद पटकावून जगाला त्याच्या कधीही हार न मानण्याच्या वृत्तीची अजून एकदा झलक दिली. २०२२ सालात झालेली पहिली ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धा अव्वल मानांकित खेळाडू नोवाक जोकोविच डिपोर्ट होऊन ऑस्ट्रेलियाबाहेर जाण्याने सुरू झाली ती रफाएल नदालने केलेल्या अभूतपूर्व पुनरागमनाने स्मरणात राहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT