Book Sakal
सप्तरंग

मध्ययुगीन आशियाचं प्रवासदर्शन!

कालखंड म्हणून विचार केला तर इसवीसन ५०० ते १५०० असा एक हजार वर्षांचा हा कालावधी होता. या एक हजार वर्षांच्या कालावधीत अनेक लोकांनी जगप्रवास करण्याचा प्रयत्न केला.

सुरेंद्र पाटसकर surendra.pataskar@esakal.com

कालखंड म्हणून विचार केला तर इसवीसन ५०० ते १५०० असा एक हजार वर्षांचा हा कालावधी होता. या एक हजार वर्षांच्या कालावधीत अनेक लोकांनी जगप्रवास करण्याचा प्रयत्न केला.

एक काळ असा होता की, आशिया खंड हा विकसित प्रदेश होता. अनेक मोठी साम्राज्यं त्यात पसरलेली होती. आग्नेय आशियामध्ये श्रीविजय, पगान, अंकोर, चंपा, दाई को व्हिएत; भारतात दिल्लीतील कुशाण, सल्तनती, मोगल, दक्षिणेतील चोल व विजयनगर अशी साम्राज्ये होती. मध्य आशियात चंगीझखान, नंतर तैमूरचं राज्य होते. या काळात चीनमध्ये अनेक राजघराणी आली आणि गेली.

कालखंड म्हणून विचार केला तर इसवीसन ५०० ते १५०० असा एक हजार वर्षांचा हा कालावधी होता. या एक हजार वर्षांच्या कालावधीत अनेक लोकांनी जगप्रवास करण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी तसा तो केलाही. या प्रवासात त्यांनी अनेक निरीक्षणं नोंदवली. या निरीक्षणांवर आधारित ‘जेव्हा आशिया म्हणजेच जग होतं’ हे पुस्तक डॉ. स्टुअर्ड गॉर्डन यांनी लिहिलं आहे.

डॉ. गॉर्डन इतिहासाचे अभ्यासक-संशोधक आहेत. मराठा राज्याविषयीच्या मूळ कागदपत्रांचा अभ्यास त्यांनी ‘द मराठाज्’ या पुस्तकाद्वारे मांडला आहे. इतिहासावर अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. जगाच्या वेगवेगळ्या भागांतील प्रवाशांनी केलेली वर्णनं, प्रवासवर्णनं, त्या काळातील परिस्थितीचं चित्रण या पुस्तकातून मांडण्यात आलं आहे. ही सगळी वर्णनं अत्यंत जिवंतपणे केलेली असल्यानं आपणही त्या प्रवासातील एक सोबती आहोत असं पुस्तक वाचताना भासतं. ही वर्णनं वाचून मध्ययुगातील आशियाच्या प्रगतीनं आपण थक्क होऊन जातो. आशियातील विविध दरबारातील पद्धती एकसारख्याच असल्याचेही प्रत्येकानं केलेलं वर्णन वाचताना जाणवत राहतं.

मोठी साम्राज्ये हेच या कालखंडाचं वैशिष्ट्य नव्हतं, तर या सर्व भागामध्ये निर्माण झालेले दळणवळणाचे मार्ग, हजारो मैल अंतरावर पसलेले नातेसंबंध, विविध प्रकारच्या मालासाठी उपलब्ध असलेल्या बाजारपेठा ही या कालखंडाची काही वैशिष्ट्यं म्हणता येतील. या काळात गवताळ प्रदेशातून भारतात घोडे पाठवले जात, दक्षिण चीनमधून उत्तर चीनकडे भात पाठवला जाई, दमास्कसवरून अफगाणिस्तानात लोखंड येई. सर्वत्र चालणारी चलनं मोठ्या साम्राज्यांनी जारी केली होती.

पत्रव्यवहारासाठी स्वतंत्र व्यवस्थाही निर्माण केली होती. अब्राहम बेन यीजू यानं मंगळूरहून पाठवलेलं पत्र महिन्याभरात कैरोला पोहोचत होतं. इब्न बतूतानं भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून पाठवलेलं त्याचं परिचयपत्र दिल्लीला पोहोचलं आणि दोन महिन्यांत त्याला उत्तरही मिळाल्याच्या नोंदी आहेत. या सगळ्या प्रवासवर्णनांतून दरबारी आणि राजकीय संस्कृती, धर्माचा प्रसार, व्यापार, युरोपीयांचा वसाहतवाद अशा विविध विषयांवर या प्रवासवर्णनांतून प्रकाश पडतो.

मिठाला जागण्याच्या परंपरेचा वापर बाबरानं आपलं साम्राज्य स्थापन करण्यासाठी कसा करून घेतला याचं वर्णन ‘रक्त आणि मीठ’ या प्रकरणामध्ये लेखकानं सविस्तरपणे लिहिलं आहे. बाबराचा फरगाना खोऱ्यापासून अफगाणिस्तानपर्यंतचा प्रवास, काबूल शहर, खानदानी आयुष्याचा घेतलेला उपभोग, मेजवान्यांमध्ये वाजवली जाणारी वाद्यं, दिल्लीपर्यंत केलेले हल्ले याची वर्णनं बाबरानं लिहून ठेवली आहेत. त्यांचा संदर्भही पुस्तकात देण्यात आला आहे.

भारतातील दिल्ली, बंगाल आणि कालिकत इथं येऊन गेलेल्या इब्न बतूता यानं १३२५ ते १३५६ या कालावधीतील प्रवासाची सविस्तर वर्णनं लिहिली आहेत. मोरोक्कोहून निघाल्यापासून ही सगळी प्रवासवर्णनं आहेत. दिल्लीतील सुलतानाच्या दरबाराचं वर्णन त्यानं केलं आहे. कैरोमध्ये असताना त्यानं नाईलच्या काठावरील अल्-राव्दा हे ठिकाण, सीरियातील हलाब मशीद, जेरूसलेम, बैरूत, दमास्कस, मक्का आदी अनेक शहरांची वर्णनं केली. अनेक प्रथा-परंपरा, मठ, मशिदी, वसतिगृहं, धर्म, व्यापार, चाली-रीती यांचं सविस्तर वर्णन केलं आहे. दिल्लीच्या सुलतानानं तर त्याची काझी म्हणून नेमणूक केली होती. आपल्या चरित्रात त्यानं मिरीच्या लागवडीचं वर्णनही केलं आहे.

चौदाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये चिनी व्यापारी जहाजांच्या ताफ्यांनी आग्नेय आशियाची मर्यादा ओलांडून पश्‍चिमेला भारताकडे प्रयाण केले होते. अशा जहाजांचा एक ताफा इब्न बतूता याने १३३०च्या सुमारास पाहिला होता. त्याचे वर्णन त्याने केले आहे. कालिकतच्या किनाफ्यावर हा ताफा थांबला होता. मसाल्याच्या पदार्थांच्या खरेदीसाठी ती जहाजे आली होती. त्या जहाजांचे वर्णन करताना बतूताने लिहिले आहे की, ‘‘या मोठ्या जहाजांना बारापासून तीनपर्यंत विविध संख्यांची शिडे लावली आहेत. ही शिडे कधीही खाली उतरवली जात नाहीत. वाऱ्याची दिशा पाहून त्यांना वळविण्यात येतं. जहाजावर एक हजार माणसं असतात. त्यापैकी सहाशे खलाशी, तर चारशे सशस्त्र सैनिक असतात. त्यात धनुर्धारी, ढालकरी आदींचा समावेश होता.’’ पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला जंग ह या चिनी दर्यावर्दीने आफ्रिकेतून बीजिंगला एक जिराफ नेला होता. त्याचे वर्णनही एका प्रवासवर्णनात आढळते.

पोर्तुगीज औषधविक्रेता टोमे पिरेस, चीनच्या नानजिंगमधून आलेला मा हुआन यांनी आशियातील प्रवासादरम्यान केलेली जिवंत वर्णनं, बगदादहून रशियातील व्होल्गा नदीच्या काठावरील अल्मिश राजाच्या राज्यापर्यंत प्रवास करणारा इब्न फद्लान, तत्त्वज्ञ व हकीम असलेल्या इब्न सीना यानं १००२ ते १०२१ या कालावधीत केलेला प्रवास व अभ्यास यांचे अनुभव, अब्राहम बेन यीजू यानं भारतातून होत असलेल्या मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारासंबंधी केलेली वर्णनं, त्या काळातील चित्रं डोळ्यासमोर पूर्णपणे उभी करतात.

बौद्ध भिक्खू असलेल्या ह्युएन त्संग यानं चीनपासून अफगाणिस्तानपर्यंतचा प्रवास इसवीसन ६१८ ते ६३२ या कालावधीत केला. भारतातही तो साधारणतः नऊ वर्षं राहिला व विविध ग्रंथांचा अभ्यास त्यानं केला. बोधगयेतील ज्या बोधिवृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते, तो वृक्ष काही दुष्ट राज्यकर्त्यांनी छाटला होता आणि आता त्याची उंची केवळ ५० फूट उरल्याची नोंद ह्युएन त्संगनं केली आहे. चीनला परत जाताना त्यानं ६५७ ग्रंथ नेल्याचाही उल्लेख केला आहे.

युरोपीय जेव्हा आशियात आले, तेव्हा त्यांनी स्वतःला व्यापारी आणि त्याचबरोबर त्यांच्या राज्यांचे प्रतिनिधी असल्याचे घोषित केले होते. आपण थेट त्यांचेच ताबेदार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. हे अनपेक्षित होते. आशियातील कोणत्याही व्यापाऱ्याने कधीही त्यांच्या राज्याचे प्रतिनिधित्व केले नव्हते. वेगळ्या वंशांच्या आणि जातीच्या स्थानिक लोकांनी युरोपीयनांनी कधी चांगल्या हुद्द्यावर नेमले नाही. त्यांनी ज्या लढाया जिंकल्या त्या त्यांच्या राजांसाठी जिंकल्या असे जाहीर केले गेले. हा बदल पुढील काळात ठळकपणे दिसून आला.

ही सर्व वर्णनं लिहिण्यासाठी डॉ. गॉर्डन यांनी अनेक साधनांचा व संदर्भांचा वापर केला. प्रत्येक प्रकरणात ज्या घटनांचा उल्लेख केला आला आहे, त्या घटनांचे सत्यता सांगणारे संदर्भ डॉ. गॉर्डन यांनी दिले आहेत. त्यामुळे लिखाणाचे वजन आणखी वाढले आहे. इंग्लिशमधील हे पुस्तक मराठीमध्ये अनुवादित करताना त्याचा ओघवतेपणा नष्ट होणार नाही याची काळजी र. कृ. कुलकर्णी यांनी घेतली आहे. त्याकाळातील सामाजिक, सांस्कृतिक, व्यापारी संस्कृतीची तोंडओळख या पुस्तकाद्वारे नक्कीच होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT