नात्यातला गोडवा हरवतोय sakal
सप्तरंग

नात्यातला गोडवा हरवतोय!

‘बचपन के दिन भी क्या दिन थे, उडते थे हम तितली बन’, खरेच असेच काहीसे होते

सकाळ वृत्तसेवा

सोशल मीडियाचा प्रभाव असलेल्या आजच्या युगात जो तो पैसा, प्रतिष्ठा यांच्या मागे धावत आहे. वाढत्या स्पर्धेच्या दुनियेत नात्यातील गोडवा मात्र हरवत चालला आहे. पूर्वी दिवाळी सर्वांनी एकत्र येऊन साजरी केली जायची; परंतु आज दिवाळी सोशल मीडियावरच जास्त साजरी केली जाते.

‘बचपन के दिन भी क्या दिन थे, उडते थे हम तितली बन’, खरेच असेच काहीसे होते पूर्वीचे बालपण. मस्त हुंदडायचे, कुणाच्याही घरी जे मिळेल ते खायचे आणि पुन्हा खेळण्यासाठी सज्ज व्हायचे. प्रत्येक घरी किमान चारतरी मुले-मुली असायची. दोन-तीन घरची बच्चे कंपनी एकत्र आली की संपूर्ण क्रिकेट टीम तयार व्हायचे. मग काय दिवसभर धम्माल मस्ती आणि बरेच काही. परंतु आज तसे काहीच होत नाही. लहान लहान मुले मोबाईलमध्ये एवढी व्यस्त असतात की त्यांना दुसरी कुठले भानच राहात नाही. मैदानी खेळ पूर्णतः बंद झाले आहेत. एकंदरीत नात्यातील गोडवा हरवत चालला आहे.

पूर्वीच्या काळी दिवाळी म्हटले की सर्वाधिक धम्माल असायची ती बच्चे कंपनीची. आत्या, मामा, मावशीची मुले एकत्र आली की, दिवसभर धम्माल. तेव्हा सोशल मीडिया नव्हता त्यामुळे नाती जपली जायची. आजूबाजूच्या महिला एकत्र येऊन फराळ तयार करायच्या. घरोघरी तो वाटला जायचा. दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून घरोघरी फराळाचे आमंत्रण दिले जायचे. गप्पागोष्टी करीत फराळाचा आनंद लुटला जायचा. एखाद्याच्या घरी लग्न असले की संपूर्ण मोहल्ल्यात हुरूप चढायचा. लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडेपर्यंत चैन पडायचे नाही.

परंतु बदलत्या काळानुसार आवडीनिवडी बदलत चालल्या आहेत. प्रत्येक जण आत्मकेंद्री झाला आहे. कुटुंबांचा आकार कमी झाला आहे. मुलांना खेळायला बाहेर पडता येत नाही. मला त्याचे काय, हा अहमभाव वाढत असल्याने नात्यातील मजा हरवली आहे. सोशल मीडियावरच शुभेच्छाची देवाणघेवाण होते. कोरोनाने तर मुलांना मोबाईलच्या अधिक जवळ आणले आहे. अभ्यासाच्या नावाने मोबाईलला चिटकलेली मुले त्या पाहतात तरी काय, हे आई-वडिलांना माहिती राहत नाही. वाढत्या स्पर्धेत आपली मुले टिकणार की नाही, ही चिंता पालकांना सतत सतावत असते. दुसऱ्याचा आनंद, दुःख याच्याशी कुणालाच काही देणेघेणे असल्याचे दिसत नाही. एकंदरीत संवाद हरवल्याने नाती दुरावली आहे. काळाचा महिमा दुसरे काय.

- मंजिरी तभाने, चिटणीसनगर, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsvardhan Sapkal : 'निवडणूक आयोग सरकारच्‍या हातचे बाहुले बनले आहे'; हर्षवर्धन सपकाळ यांची भाजप आणि आयोगावर तोफ

माेठी बातमी! 'पाथर्डीच्या उपअभियंत्याची क्लिप विधानसभेत':आमदार काशिनाथ दातेंची लक्षवेधी; अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

Kolhapur : सोलर पाईपचा विद्युत तारेला स्पर्श; घरमालकाचा मृत्यू, मदतीस आलेल्याही शॉक लागला अन्! कोल्हापुरातील धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट; ढगाळ हवामानासह हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज

Fake IAS Kalpana Case: कल्पना भागवतने चक्क माजी कुलगुरूंनाही फसवले

SCROLL FOR NEXT