सप्तरंग

मुलाला प्राधान्य देत कामाला जपले! (वैशाली सामंत)

वैशाली सामंत

कम बॅक मॉम
आई होणं म्हणजे नक्की काय, हे मी प्रत्यक्षात अनुभवत आहे. मी अगदी सातव्या महिन्यापर्यंत स्टुडिओमध्ये जाऊन गाण्याचे रेकॉर्डिग्स करत होते. कारण मी आधीपासूनच ठरवलेलं होतं की प्रेग्नंसीदरम्यान घरी बसून न राहता काम करत राहायचं. मी काम न करता राहूच शकत नाही. प्रेग्नंसीनंतर बाराव्या दिवशीच कामाला सुरवात केली, ते स्वामी समर्थांचं गाणं होतं. संगीतकार नंदू होनप यांचा मला फोन आला. ‘स्वामी समर्थांचं एक गाणं आहे आणि ते तुझ्या आवाजातच रेकॉर्ड झालं पाहिजे,’ असं त्यांनी मला सांगितले. मी लगेचच होकार दिला. त्या वेळी आईच्या घरापासून पाचव्या मिनिटावर स्टुडिओ होता. तिथे जाऊन मी गाण्याचं रेकॉर्डिंग केलं. मी रेकॉर्डिंगला गेले म्हणून आई ओरडली. मात्र, मी तिला समजावलं. प्रेग्नंसीनंतर दीड ते दोन महिन्यांनंतर मी माझ्या कामावर रुजू झाले. माझ्या मुलाच नाव कुशान आहे. तो मला उत्तम सहकार्य करतो. कुशान झाल्यानंतर आईने मला सांगितलं होतं आता मुलाकडे, कुटुंबाकडे लक्ष दे. पण मला ते पटलं नाही. गाण्याची आवड मला जोपासायची होती. हळूहळू माझं म्हणणं आईला पटायला लागलं. मी पुन्हा गाणी, शोज करू शकले ते माझी आई, नवरा, आजी यांच्यामुळे. कारण कुशानला सांभाळण्यात त्यांचाही मोठा हात आहे. त्यांच्यामुळे मी घराबाहेर पडू शकले. मी मनाशी पक्कं केलं होतं, की मी कितीही बिझी असले, कितीही मोठी सेलिब्रिटी असले तरी कुशानला हव्या त्या गोष्टी मी देणार. कुशानला वेळ देऊन जो वेळ उरतो त्या वेळात मी माझं काम केलं. एकाच वेळी आई, गृहिणी, पत्नी ही जबाबदारी सांभाळत आपलं काम, गाण्याची आवड जोपासायची हे आव्हान होतंच, ते मी हसत-हसत पेललं. बाळ झाल्यानंतर माझं दिवसभराचे शेड्यूल अगदी सुरळीत सुरू झालं. माझ्या कामाच्या वेळा ठरवलेल्या आहेत आणि त्याच वेळेत माझं काम होतंही. याआधी असं काहीही नव्हतं. आता वेळेच बंधन आलं आहे. कुशान आठ वर्षांचा आहे. त्याची साडेतीन वाजता शाळा सुटते. मी त्याला शाळा सुटल्यावर आणायलाही जाते. आता सगळ्यांना माहीत झालं आहे की, कितीही काही झालं तरी वैशाली तिच्या मुलाला शाळेमधून आणायला जाणारच. मग माझ्या गाण्याचं रेकॉर्डिंगही ११ ते २ या वेळेत ठेवलं जातं. कुशानला शाळेतून एकदा घरी सोडल्यानंतर पुढील तीन ते चार तास मी बाकीची काम करते. मी शाळेत असताना माझी आई मला शाळेत सोडायला-न्यायला यायची. त्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. तो आनंद मला माझ्या मुलालाही द्यायचा होता. यासाठी माझं नेहमीच शेड्यूल कुशानच्या वेळेनुसार तयार करून घेतलं. मी मुंबईत नसल्यावर आई किंवा माझा नवरा त्याला शाळेत आणायला-सोडायला जातात. आई म्हणून त्याचे सगळे लाड मी पुरवते. 

कुशान दोन वर्षांचा होईपर्यंत मी जास्त लांब गाण्यांचे शोज केले नाही. तो दोन वर्षांचा झाल्यावर मी एका कार्यक्रमासाठी नऊ दिवसांच्या यूएस टूरला गेले. कुशानपासून पहिल्यांदाच लांब गेले होते. पाच दिवस यूएसमध्ये कसे तरी गेले. पण नंतर मला करमेना. माझ्या मुलाला माझी आठवण येत आहे आणि तिथे मी त्याच्याजवळ नाही, ही परिस्थिती तेव्हा मी अनुभवली. कुशान थोडा मोठा झाल्यावर एक ते दोन दिवसांचे शोज मी करायला लागले. मला इंडस्ट्रीमधील लोकांनी फार सांभाळून घेतलं. एक-दोन वेळा माझ्या गाण्याचं रेकॉर्डिंग असताना कुशान आजारी पडल्याने मला रेकॉर्डिंगला जाता आलं नाही. मात्र, सगळ्यांनीच मला सांभाळून घेतलं. माझं आईपण इंडस्ट्रीनेही स्वीकारलं असं मी म्हणेन. कधी कधी ऐनवेळी रेकॉर्डिंगला जावं लागतं, तेव्हा कुशानच्या प्रश्‍नांचा भडिमार सुरू होतो. आता तू मला माझ्या जवळच हवी आहेस, असा त्याचा हट्ट सुरू होतो. तेव्हा त्याला समजून घ्यावं लागतं. आता त्याला कळायला लागलं आहे. आम्ही बाहेर जातो तेव्हा लोक गर्दी करतात, माझी सही घेतात. त्याला सगळं समजावून सांगितल्यानंतर सेलिब्रिटी ही व्याख्या कळू लागली आहे. कुशानच्या जन्मानंतर ‘पिझ्झा बॉक्‍स’ नावाचा व्यवसाय सुरू केला. तोही जोमाने सुरू आहे. प्रेग्नंसीनंतर मी एक गोष्ट स्वतःला समजावली की, तू आता एकटी नाही आहेस तुझ्यावर आणखी एका जिवाची जबाबदारी आहे. ते सांभाळून सगळं तुला सांभाळायच आहे. आई झाल्यानंतर माझं पहिलं प्राधान्य नेहमीच कुशानला असणार.
(शब्दांकन - काजल डांगे)

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT