saptrang  sakal
सप्तरंग

गावाकडच्या गोष्टी ; दिस व्हते सोनेरी...

सगळ्यांनी मिळून डोंगराच्या पायथ्याला असल्याला मोकळया रानात एक छपार बांधलं हुत.

नितीन पवार (koripati.production@gmail.com)

मला वाटतं मी सातवीत हुतो... तवा आमच्याकडं तांबडी नावाची गाय हुती.. उन्हाळ्याच्या सुट्टीत सकाळी च्या अन बटर खाल्लं की गाय सोडायची ती थेट रेडदऱ्यात न्याची... जातानाच मस्त पैकी बंधाऱ्यात घालायची... पप्या,गण्या, इक्या सगळी पोर गुराबरंबरचं स्वतः पाण्यात उड्या घ्यायची...

एकादं म्हशीच्या पाठीवर बसायचं तर एकादं एक रुपयावाली शाम्पूची पुडी म्हशीला आन गाईला चोळायचं... चांगली घासून आंगुळ घालायची... मग गुरं डोंगरात सुराला लागली की बंधाऱ्यात तास दोन तास पोर डुंबायची... मन भरलं कि पुन्हा वाटला लागायचो...

सगळ्यांनी मिळून डोंगराच्या पायथ्याला असल्याला मोकळया रानात एक छपार बांधलं हुत..! त्यात कपड्यानं बांधल्याल्या पाण्याच्या बाटल्या आन भाकरी अडकवून मग समदी पोर बाजूलाच असल्याला वड्याकडं निघायची... म्हातारी माणसं छपरातच मेंढी कोट खेळत बसायची ... आम्ही पोर खेकडं धरायला वड्या वड्यान दगडं उलटायचो... डोंगरातल्या वगळीपासनं पार खालच्या बंधाऱ्या पावतर न्हाय म्हणलं तरी परतेकाला आर्धा किलोचा तरी वाटा याचा... मग पुन्हा आलो की पोर जाळ करून नांग्या भाजून खायाची... म्हातारी माणसं त्याज्यावर आयती ताव मारायची...तवा घासातला घास दुसऱ्याला काढून द्याची माणसं..म्हातारीबी मागं सरून हानायची... रस्सा केला तर कालवणाचा वगुळ पार कोपरापावतरं याचा... कधी एकादा खेकडा चावला तर त्याला जिता भाजून खायचा असला बदला घ्याचा...

मग रंगायचं खेळ... बाजूला मस्त हिरव्या गार गवतावर लायनी आखायच्या... शिवनापाठ, कबड्डी, आबाधब्बी जे वाटलं ते.. आगदीच काय नसलं तर दगडानं टिपाटीपी खेळायला पण कमी न्हाय करायचो... कुणाचा गुडघा फुटायचा तर कुणाचं डोकं.. पण त्याज कवाच वायट वाटायचं न्हाय... गण्यावर डाव तंगला की त्यो म्हस दिसना म्हणून पळत सुटायचा... पुन्हा पप्यावर राज्य याचां... पप्याची गाय दुसऱ्याच्या वावरात गिली म्हनून त्यो जातो म्हणायचा, एवढ्यात तिकूडन गण्या हाक मारायचा..." तुजी गाय मी मागारी हाणतो तू खेळ " आस म्हणलं की पप्या गण्याला बेक्कार शिव्या द्याचा...खेळ रंगला की दिवस कुट आन कसा गेल्याला ते कळायच न्हाय..पुन्हा सांचीपारनं वाईच गवतावर पडलं की खिळून दमल्यामुळं लागलंच डोळा झाकायचा... गार वारा, बाजूला झरा, गवताची चादर आन उभा राहिल्या भला मोटा डोंगर... असली झ्वाप पुन्हा कवाच लागली न्हाय..! त्या कांदा भाकरी आन टॉवेल वला करून गुंडाळल्याला झऱ्याच्या पाण्याची चव कशालाच आली न्हाय.. रानात मन रमायचं, जीव लागायचा...दिस मावळतीला लागला की गुरं त्येंच्या मनानंच घराच्या वाटला लागायची...

दोस्तां संगट मग झालेल्या पार्टीची न्हायतर खेळाची खर्च रंगायची.. ज्याच्यावर डाव तंगला आसल त्याज्या घरी जास्तवर काय खरं नसायचं... एकाद नवं ख्वांड न्हायतर कालवड असली म्हजी कवा कवा रस्ता चुकायला होतो... मग सगळी मिळून त्याला शुधून द्याचं...न्हाय घावंल तर रडारड, बॅटऱ्या घिवून शोधाशोध... जीवाची घालमेल नुसती... गुरं म्हजी दुसरी लेकरच की शेतकऱ्याची...

यताना गुरानी पो टाकला की पोरी पाटीत भरायच्या... घरी जाऊन शेनी थापायच्या...आम्ही पोर आमच्या म्हशीनं एकादा पो टाकावा म्हणून वाट बघायचो.. आन आपल्याला पायजे तिलाच त्यो उचलायला बोलवायचो...मग रातभर सपणात ति पो उचलताना पुन्हा पुन्हा दिसायची, आन सकाळी आयकडं साकर मागायला याची.. मी वाटी जास्तीची भरून द्याचो.. त्या साकरंसारखं गोड कायचं न्हाय.. पुन्हा गुरं, पुन्हा पोर, पुन्हा रान आन पुन्हा पोरीनं उचल्याल शान...यातच उन्हाळा जायचा... कसा कुट गेला कळायचा न्हाय... पण त्ये दिवस सोनेरी हुत... सोनेरीच..!

नितीन पवार

koripati.production@gmail.com

(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी’ या ‘यू ट्यूब’ वरील वेबमालिकेचे लेखक - दिग्दर्शक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT