पती-पत्नीच्या भांडणामुळे 10 संसारांची राखरांगोळी; गृहराज्यमंत्र्यांकडून गंभीर दखल sakal
सातारा

सातारा : पती-पत्नीच्या भांडणामुळे 10 संसारांची राखरांगोळी

आगीमध्ये दहा कुटुंबीयांचे संसार उपयोगी सर्व साहित्य भस्मसात

सकाळ वृत्तसेवा

सातारा : पती पत्नीच्या घरगुती दिवसभराच्या भांडणाच्या रागातून पतीने स्वत:चे घर पेटवल्याने शेजारील नऊ कुटुंबाच्या घरास भीषण आग लागल्याची घटना काल सायंकाळी पाच वाजता माजगाव (ता.पाटण) येथे घडली होती, त्या आगीमध्ये दहा कुटुंबीयांचे संसार उपयोगी सर्व साहित्य भस्मसात झाल्याने आरोपी संजय रामचंद्र पाटील यास ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्याने काल रात्री उशिरा आरोपी संजय पाटील याचेवर कायदेशीर कारवाई करून आग लाऊन वित्त हानिस कारणीभूत असल्याचा आरोपाखाली ३५४ कलमाने अटक केली होती, आरोपी संजय याचेवर आज चौकशी साठी रिमांड घेण्यात आल्याचे मल्हारपेठ पोलिसांनी सांगितले. पुढील तपास स.पो. नि.भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

आगीचे रौद्र रूप एवढे भयंकर होते की त्यामध्ये सर्व दहा कुटुंबांच्या घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य, धान्य, दागदागिने, रोखड , शेतीची औजारे आदी आगीमध्ये जाळून खाक झाले होते, मात्र कोणतीही जीवित हानी झाली नव्हती.

येथील संजय रामचंद्र पाटील व पत्नी पल्लवी संजय पाटील यांचे कौटुंबिक घरगुती भांडण काल दिवसभर सुरू होते, या भांडणाच्या रागाने वतागुन संजय पाटील याने स्वत:च्या राहत्या घरात आग लावली, त्यामध्ये घरातील गॅस सिलिंडर ने पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले, त्यामुळे शेजारील पांडुरंग महादेव पाटील, ज्ञानदेव महादेव पाटील, संभाजी गणपत पाटील, चंद्रकांत शिवाजी पाटील, भिमराव गणपती पाटील, दातत्रय मारुती पाटील, कृष्णात मारुती पाटील, पंढरीनाथ मारुती पाटील, गोरखनाथ मारुती पाटील व भाडेकरू आनंदराव तुकाराम पाटील या दहा घरांना भीषण आग लागून बाधित सर्वांचे घरासह पन्नास लाखांच्या वर नुकसान झाले आहे.

सदर आगीच्या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पाटण तालुका खरेदी विक्री संघ, सायाद्री साखर कारखान्याच्या व जयवंत शुगर च्या आग्णी शामक या तीन गाड्याना प्रचारण करून ग्रामस्थांच्या दोन तासांच्या मदतीने आग आटोक्यात आणली होती. तोपर्यंत सर्व घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य, टी व्ही, फ्रिज, दागिने, रोखड व इतर मौल्यवान साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.

या विकृत रौद्र स्वरूप घरांच्या आगीची माहिती समजताच राज्य ग्रहमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन बधीतांची भेट घेऊन लगेच प्राथमिक स्वरूपात बाधितांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून लवकरच काही शासकीय यंत्रणेकडून मदत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dal Prices: सणासुदीपूर्वी महागाईचा झटका! साखर-कांद्यानंतर आता डाळी महागल्या, जाणून घ्या नवे दर...

Sugar Stocks: साखर तुमच्यासाठी महागली, मात्र शेअर्ससाठी 'गोड' झाली! साखर कंपन्यांचे अनेक शेअर्स 52-Week High वर

Marathi News Live Updates : भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

कल्याणमध्ये डॉक्टरांवर पुन्हा हल्ला! रुग्णाच्या नातेवाईकाकडून अरेरावीची भाषा वापरत बेदम मारहाण; धक्कादायक घटना CCTVत कैद

MHADA: भाडेतत्त्वावरील घरांसाठी नवे धोरण; म्हाडाचे घर भाड्याने कसे घेता येणार? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT