Satara Crime News esakal
सातारा

उसाच्या फडात आईनं नंदिनीला झोळीत बांधून झोपवलं अन् आगीत..

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यातील एका साखर कारखान्याची ऊसतोड मजुरांची टोळी बनवडीत आलीय.

कऱ्हाड सातारा : उसाच्या फडाला लागलेल्या आगीत अवघ्या अकरा महिन्याच्या चिमुरडीचा भाजून मृत्यू झाला. काल रात्रू बनवडी येथे घटना घडलीय. नंदिनी सोमया वरवी (रा. निलपाणी ता. चोपडा, जि. जळगाव Jalgaon) असं दुर्देवी मुलीचं नाव आहे. शहर पोलिसांत (Karad Police) याची नोंद झालीय.

पोलिसांनी सांगितलं की, सांगली (Sangli) जिल्ह्यातील एका साखर कारखान्याची (Sugar Factory) ऊसतोड मजुरांची टोळी बनवडीत आली आहे. मजुरांच्या टोळीकडून परिसरातील उसाची तोड सुरू होती. काल गावातील एका शेतकऱ्याच्या उसाची तोडणी करण्यासाठी मजूर गेले होते. त्यापैकी एकाची नंदिनीही होती. तीच्या आईनं नंदिनीला झोळीमध्ये बांधून झोपवलं. त्यानंतर ती फडात गेली. सायंकाळी सहाच्या सुमारास मजूर ऊस तोडणीमध्ये व्यस्त होते. त्यावेळी नंदिनीला जेथे झोळीत ठेवलं होतं.

तेथील पाचोळ्याला आग लागल्याचे दिसले. सर्वांनी तिथं धाव घेतली. आग विझविलीही मात्र, आगीत नंदिनी जखमी झाली होती. त्यांनी त्वरित तीला कृष्णा रुग्णालयात (Krishna Hospital) उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित ठिकाणचा पंचनामा केला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT