Balasaheb Patil esakal
सातारा

कोविड, अतिवृष्टीसाठी 114 कोटींचा निधी मंजूर

प्रशासकीय मान्यतेसाठी लवकरात-लवकर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

सकाळ डिजिटल टीम

सातारा : जिल्हा वार्षिक योजना (District Annual Scheme) 2021-22 मधील मंजूर निधीच्या 30 टक्के निधी कोविड उपाययोजनांसाठी (Coronavirus) व 5 टक्के निधी हा अतिवृष्टी उपाययोजनांसाठी राखून ठेवण्यास पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांनी आज मंजुरी दिली. जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत उपाययोजनांसाठी हा निधी मंजूर केला. या बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai), खासदार श्रीनिवास पाटील (MP Shriniwas Patil), आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार अरुण लाड, आमदार मकरंद पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेच्या 2021-22 या वर्षासाठी एकूण 375 कोटी इतका निधी अर्थसंकल्पित आहे.

जिल्हा वार्षिक योजनेच्या 2021-22 या वर्षासाठी एकूण 375 कोटी इतका निधी अर्थसंकल्पित (Satara Budget) आहे. यामधून कोविड उपाययोजनांसाठी 30 टक्के निधी (98 कोटी 3 लाख 2 हजार), तसेच जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या उपाययोजनांसाठी 5 टक्के निधी (16 कोटी 72 लाख 50 हजार) इतका पुनर्विनियोजित करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून अर्थ संकल्पित झालेल्या निधीचा वेळेत खर्च करण्यासाठी, तसेच त्यातून घेण्यात येणारी कामे वेळेत होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी लवकरात-लवकर प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावा. कामे लवकर पूर्ण होण्यासाठी कामाची वर्क ऑर्डरही वेळेत द्यावी व जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेला निधी खर्च 100 टक्के करा, अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत केल्या.

आयत्या वेळेच्या विषयांमध्ये मौजे मसूर (ता. कऱ्हाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धनाने ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने प्रस्ताव आरोग्य संचालनालयास पाठविण्यासाठी मान्यता देण्यात आलीय. याबरोबरच मौजे नागठाणे (ता. सातारा) येथील चौंडेश्वरी देवस्थान, मौजे मलवडी (ता. माण) येथील श्री मल्हारी म्हाळसाकांत देवस्थान व गमेवाडी (ता. कराड) येथील गोरक्षनाथ देवस्थान या तीन देवस्थानांना तीर्थक्षेत्रास 'क' वर्ग यात्रास्थळाचा दर्जा मिळण्याबाबतचा प्रस्तावास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे. यावेळी उपस्थितीत लोकप्रतिनिधी व समितीच्या सदस्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ZP Election : जिल्ह्यात सात ठिकाणी महिलाराज; बारामती, हवेली, आंबेगावात सभापतिपदासाठी होणार चुरस

राम चरणच्या ‘पेड्डी’ चित्रपटाच्या पुढच्या शेड्यूलची पुण्यात आज सुरुवात, ब्लॉकबस्टर गाण्याचं शूटिंग होणार!

Latest Marathi News Live Update : पुण्यात पीएमपीएमएलचा नवा उपक्रम; बसमध्येच फिरते वाचनालय

Chh. Sambhajinager: 'तू माझ्या नवऱ्याला इन्स्टाग्रामवर फॉलो का केलं' असं म्हणत तीन महिलांकडून एकीला बेदम मारहाण

Asian Aquatic Championship : तिरंग्याचा अपमान? जलतरणपटूंच्या पोशाखाबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं मागवला अहवाल, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT