Bullock Cart Race esakal
सातारा

Bullock Cart Race : नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत! मालदनला 125 शर्यतीचा थरार

तब्बल सात तास चाललेला शर्यतीचा थरार पाहण्यासाठी बैलगाडी शर्यत शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.

राजेश पाटील

सुपने (ता. कऱ्हाड) येथील देवराज पाटील यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचे ३१ हजार रुपये बक्षीस व ढाल पटकावली.

ढेबेवाडी : मालदन (ता. पाटण) येथे आयोजित बैलगाडी शर्यतीत (Bullock Cart Race) सुपने (ता. कऱ्हाड) येथील देवराज पाटील यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचे ३१ हजार रुपये बक्षीस व ढाल पटकावली. विविध भागातून सव्वाशे गाड्या शर्यतीत सहभागी झाल्या.

तब्बल सात तास चाललेला शर्यतीचा थरार पाहण्यासाठी बैलगाडी शर्यत शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. मालदनचे हर्षवर्धन काळे यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थ मंडळ व वजीर ग्रुपने शर्यतीचे आयोजन केले होते. सव्वाशे बैलगाड्या त्यात सहभागी झाल्या.

भैरवनाथ प्रसन्न तांबवे, नगरसेवक हणमंतराव जाधव आगाशिवनगर, अंबिका प्रसन्न अंबवडे, निखिल दादा पवार बेलवडे खुर्द यांच्या गाडीने अनुक्रमे, दोन ते पाच क्रमांक पटकावले. प्रथम क्रमांकाचे बक्षीस ३१ हजार रुपयांचे बक्षीस हर्षवर्धन काळे यांच्या स्मरणार्थ यशवंत काळे, द्वितीय क्रमांकाचे २५ हजार रुपयांचे बक्षीस रघुनाथ बोत्रे यांच्या स्मरणार्थ शशिकांत बोत्रे, तृतीय क्रमांकाचे २० हजार रुपयांचे बक्षीस सुरेश काळे, एम. डी. पाटील, सूर्यकांत काळे, चतुर्थ क्रमांकाचे १५ हजार रुपयांचे बक्षीस नितीन काळे (दादा), पाचव्या क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस राजेश साळुंखे यांच्यातर्फे ठेवले होते.

जयदीप अजितराव पाटील यांच्या स्मरणार्थ संदीप पाटील, तसेच स्वाती संतोष देसाई यांच्या स्मरणार्थ चैतन्य उद्योग समूह यांच्यातर्फे विजेत्यांना ढाली देण्यात आल्या. शर्यत पाहण्यासाठी पाटण-कऱ्हाड तालुक्यातील शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. झेंडापंच म्हणून संदीप माने यांनी काम पाहिले. बबलू देसाई व श्रीकांत साबळे यांनी समालोचन केले. अजित काळे यांनी स्वागत केले. युवराज काळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Resolution Controversy : गोकुळ निवडणुकीत पात्र ठराव ४४४८, तर नेत्यांनी दाखल केले तब्बल ७४०४ ठराव, फुगलेला आकडा कुणाचा?

Viral Video: असं कोण वागतं का? वैभव सूर्यवंशीला सराव करताना चेहरा लपवावा लागला... प्रेक्षकांनी नेमकं असं काय केलं?

Tukaram Mundhe Pattern : तुम्ही खाताय ते पनीर खरंच शुद्ध आहे? रत्नागिरीत 127 ठिकाणे छापे, 77 संशयास्पद नमुने जप्त; मुंढे पॅटर्नच्या भीतीने नामांकित कंपन्यांचे एजंट फरार

Gold Rate Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले! महिन्याभरात 17 हजार तर उच्चांकापासून 40 हजारांनी स्वस्त; पाहा ताजा भाव

Nivali Ghat Landslide : निवळी घाटात दरड कोसळली! ओंडका थेट रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार जखमी; कोकणात मुसळधार, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे...

SCROLL FOR NEXT