दिवाळीत एसटीच्या १८१ जादा बस sakal
सातारा

सातारा : दिवाळीत एसटीच्या १८१ जादा बस

सकाळ वृत्तसेवा

सातारा : दिवाळीच्या सणाला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने ३० ऑक्‍टोबरपासून जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. दिवाळीतील सुट्यांच्या काळात शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासह जिल्ह्यातील इतर आगारांतून नियोजित बस व्यतिरिक्त जादा १८१ बस सोडण्यात येणार आहेत.

गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनाचा प्रादुर्भाव राहिल्याने मागील दिवाळी लॉकडाउनमध्ये अडकली होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दिवाळीच्या सुटीसाठी गावी जाणाऱ्या नोकरदार, विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने विविध मार्गांवर जादा बसच्या फेऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत, तसेच प्रवाशांची गर्दी वाढल्यास गरजेनुसार जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या फेऱ्या सातारा विभागातून दिवाळीसाठी ३० ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत सुरू राहणार आहेत. दिवाळीनिमित्त खानदेश, मराठवाडा, विदर्भ या भागांत जाण्यासाठी प्रशासनाकडून जादा बस सोडल्या जाणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी प्रशासनाने आगाऊ आरक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेत नागरिकांनी आगाऊ आरक्षण करावे, असेही आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, दिवाळीनिमित्त दैनंदिन फेऱ्या व्यतिरिक्त राज्यात सोलापूर, नगर, नाशिक, परभणी, नांदेड, अक्कलकोट, लातूर, शेगाव, कोल्हापूर, चिपळूण, पणजी व इतर ठिकाणी फेऱ्या सुरू होणार आहेत. याचबरोबर लांब पल्ल्याच्या सातारा- मुंबई २४ फेऱ्या, सातारा- ठाणे बोरिवली ८, सातारा- सायन- बोरिवली ८ व सातारा- स्वारगेट (विनावाहक विना थांबा) ५६ फेऱ्या होणार आहेत. त्याचप्रमाणे कऱ्हाड- स्वारगेट (बायपास सातारा) १४ फेऱ्या व फलटण- बोरिवली मार्गावर दैनंदिन १४ फेऱ्या (प्रत्येक तासाला) सुरू असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

SCROLL FOR NEXT