Corona
Corona esakal
सातारा

भीती कायम! साताऱ्यात 24 तासात 1792 बाधित, तर जिल्ह्यात 1828 रुग्ण बरे

प्रशांत घाडगे

सातारा : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या (Corona Patients) आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात आज एक हजार 792 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 34 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तसेच एक हजार 828 नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण (Dr. Subhash Chavan) यांनी दिली. दरम्यान, गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासादायक चित्र आहे. (1,828 Corona Patients Discharged In Satara District Today)

जिल्ह्यात कोरोनाची साखळी अद्यापही तुटताना दिसत नाही. जिल्ह्यात आज पाच हजार 442 बाधितांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, त्यामधील एक हजार 792 बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट 32.93 टक्के असल्याचे दिसून आले. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला मृत्यूंचे प्रमाण कमी होते. मात्र, मागील महिनाभरात बाधित व मृत्यूच्या संख्येने कहर केला आहे, तसेच अद्यापही मृत्यू सत्राची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

बाधितांची संख्या सतत दोन हजारांच्या टप्प्यात असून, कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभाग विविध उपाययोजना राबवित आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात कमी वयोगटातील व्यक्तींचा मृत्यू होत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज सातारा व फलटण तालुक्‍यांत अनुक्रमे, 342 बाधित आढळले असून, सातारा तालुक्‍यात 9, तर कऱ्हाड तालुक्‍यात 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

कोरोना अपडेट्‌स

  • एकूण नमुने : 6,59,295

  • एकूण बाधित : 1,43,061

  • घरी सोडण्यात आलेले रुग्ण : 1,20,646

  • मृत्यू : 3,328

  • सध्या उपचारार्थ रुग्ण : 19,082

1,828 Corona Patients Discharged In Satara District Today

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT