Udayanraje Bhosale esakal
सातारा

प्रवास होणार सुखकर! खासदार उदयनराजेंच्या प्रस्तावाला केंद्राकडून 20 कोटींचा निधी

राज्य मार्गाच्या कामासाठी 20 कोटींचा निधी खासदार उदयनराजेंच्या प्रयत्नांमुळे मंजूर झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : केंद्राच्या सेंट्रल रोड फंड (सीआरएफ) मधून सातारा शहरातील वाढे फाटा ते पोवई नाका या रस्त्याच्या कामासाठी आणि कऱ्हाड-पाटण तालुक्‍यांतील डिचोली, नवजा, हेळवाक, मोरगिरी, गारवडे साजुर, तांबवे, विंग, वाठार, रेठरे, शेणोली स्टेशन या राज्य मार्गाच्या कामासाठी चार कोटी 91 लाख रुपये असा एकूण सुमारे 20 कोटींचा निधी खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे मंजूर झाला आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यालयातून पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले, की जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता खासदार उदयनराजे नेहमीच प्रयत्न करीत असतात. रस्ते मजबूत असतील तर दळणवळण सोयीचे होतेच. तथापि, सुरक्षित दळणवळणाची सुविधा निर्माण होण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, सेन्ट्रल रोड फंड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून उदयनराजे भोसले यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

यामध्ये कऱ्हाड-पाटण तालुक्‍यांतील डिचोली ते शेणोली रेल्वे स्टेशन या राज्य महामार्गाच्या मजबुतीकरणाच्या कामासाठी उदयनराजे भोसले यांनी कऱ्हाडचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्या समवेत प्रस्तावित केले होते, तसेच सातारा शहराची झालेली हद्दवाढ विचारात घेऊन वाढे फाटा ते पोवई नाका या सातारा शहरातील रस्त्याची दर्जोन्नती आणि सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारित येणाऱ्या सेन्ट्रल रोड फंडमधून या दोन्ही कामांसाठी एकूण सुमारे रुपये 20 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT