सातारा

कऱ्हाडला वाहनांकडून 2.69 कोटी दंड वसूल; वाहतूक शाखेचा कारवाईचा धडाका

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : शहर पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेने एक वर्ष नऊ महिन्यांत तब्बल दोन कोटी 36 लाख 67 हजार 700 रुपये दंडाची वसुली केली. पोलिसांनी तब्बल एक लाख 20 हजार 274 वाहनांवर कारवाई केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दंड वसूल झाला आहे. मार्च ते सप्टेंबर अखेरच्या लॉकडाउन काळात 28 लाख 39 हजार 600 रुपये दंडाची वसुली केल्याची माहिती वाहतूक शाखेतून देण्यात आली. 

शहरात लाखभर वाहनांची आरटीओकडे नोंद आहे. शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या तितकीच आहे. शहरातील वाहतुकीची समस्या जटिल आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखा स्वतंत्रपणे कार्यरत आहे. सहायक पोलिस निरीक्षक व 41 कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर त्याची जबाबदारी आहे. त्यांना 19 वाहतूक पॉइंटवर नेमण्यात येते. पोलिस क्रेन आहे. त्यावर एक कर्मचारी तैनात असतो. शाखेने एक वर्ष नऊ महिन्यांत एक लाख 20 हजार 274 वाहनांवर कारवाई करून तब्बल दोन कोटी 36 लाख 67 हजार 700 रुपये दंडाची वसुली केली आहे. 

डिसेंबरअखेर 80 लाख 59 हजार दंडाची वसुली झाली होती. जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत एक कोटी 56 लाख आठ हजार 700 इतक्‍या दंडाची वसुली केली आहे. 26 टक्के दंड नो पार्किंगमधून, 30 टक्के दंड ट्रीपलशीट व विनाहेल्मेट वाहनचालकांकडून तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून दहा टक्के अशी दंडाची आकारणी झाली आहे. त्याशिवाय 300 खटले न्यायालयात पाठवून तेथून दंडाची आकारणी केली आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 55 लोकांवर तर रहदारीस अडथळा करणाऱ्या 256 लोकांवर कारवाई करून त्यांचे खटले न्यायालयात पाठविण्यात आले आहेत. 

लॉकडाउन काळात 11 हजार नागरिकांवर कारवाई

लॉकडाउनच्या काळात पोलिसांनी तब्बल 11 हजार 299 नागरिकांवर कारवाई करत त्यांच्याकडून 28 लाख 39 हजार 600 रुपयांच्या दंडाची वसुली केली आहे. त्यात विनामास्क, सोशल डिस्टन्सिंच्या कारवाईत एक हजार 661 नागरिकांवर कारवाई करत आठ लाख 34 हजारांचा दंड वसूल केला. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या नऊ हजार 638 नागरिकांवर कारवाई करत पोलिसांनी त्यात 20 लाख 51 हजार 100 रुपयांच्या दंडाची वसुली केली आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT