Ajit Pawar And Eknath Shinde
Ajit Pawar And Eknath Shinde Sakal
सातारा

Ajit Pawar: मंत्रालयात 3 हजार फाईल्स पडून अन् मुख्यंमत्र्यांनी साताऱ्यात तीन दिवसांत...; अजितदादांचा टोमणा

Amit Ujagare (अमित उजागरे)

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यंतरी अचानक साताऱ्यातील आपल्या गावी आले होते. यावेळी त्यांनी साताऱ्यातून मंत्रालयातील फाईल्सवर काम केल्याचं सांगितलं. पण यावरुनच आता विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी त्यांना टोमणा मारला आहे.

मंत्रालयात ३ हजार फाईल्स कार्यवाहीच्या प्रतिक्षेत असताना मुख्यमंत्री साताऱ्यातील तीन दिवसांत फक्त इतक्या फाईल्सवर काम करतात, अशा शब्दांत अजित पवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

साताऱ्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. (3000 files pending in Mantralaya and CM Eknath Shinde worked in Satara Ajit Pawar taunted on him)

पवार म्हणाले, अशा प्रकारचं सरकार मी कधी बघितलं नव्हतं. वाट्टेल तशा प्रकारे प्रशासनात भ्रष्टाचार बोकाळला आहे. बदल्यांमध्ये रेट ठरलेले आहेत. मी सांगत नाही कारण मी विरोधीपक्षात आहे, कारण तुम्ही म्हणालं तुम्ही तसंच बोलणार. पण राजू शेट्टींनी पण परवा सांगितलं की, बदल्याचे रेट ठरलेले आहेत.

मुख्यमंत्री काही झालं की दोन तीन दिवस इथं येऊन राहतात. स्ट्रॉबेरी बघून शेती होती का? काय चाललंय काही कळंना? शेतातील झाड बघायची अरे काय चाललंय? मुख्यमंत्री साताऱ्यात कशाला गेले असं लोक म्हणतात, मग यांच्या ऑफिसनं सांगायचं की, फाईल बघायला गेले आहेत.

पण तीन दिवसांत फाईल किती काढल्या तर ६५! तीन दिवसांत इतक्याचं फाईल निघतात का? आम्ही तीन तासांत इतक्या फाईल काढतो. मंत्रालयात ३,००० फाईल्स पडून आहेत, अशा शब्दांत अजितदादांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा लावला.

मी चार वर्षे अर्थमंत्री होतो पण फक्त गरजेपुरती जाहीरात केली. नऊ वर्षे जयंत पाटील तर एक वर्षे सुनील तटकरे आणि एक वर्षे दिलीप वळसे-पाटील होते. पण यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राला शिस्त लावली होती.

प्रशासनाला जरब निर्माण केली होती. प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्यात सांगत घातली होती ते सर्व उद्ध्वस्त करण्याचं काम सध्या सुरु आहे. तुम्ही तर असे लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत की, त्यांना वाटतं दुसऱ्याला शिव्या द्यायचं म्हणजेच सभा जिंकली. शिव्या देण्याऐवजी काम करा, असा सल्लाही अजितदादांनी यावेळी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT