Ladki Bahin Yojana esakal
सातारा

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण’साठी साताऱ्यात जमा झाले तब्बल इतके लाख अर्ज!

Latest Marathi News: उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ वृत्तसेवा

Satara: मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पाच लाख २० हजार ५६० ऑनलाइन अर्ज भरले गेले आहेत. त्यापैकी चार लाख ४२ हजार ८८७ अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्याने या योजनेत चांगले काम केले आहे, असे मत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

तालुकास्तरावर गठित केलेल्‍या समितीची बैठक घेऊन अर्जांना मंजुरी द्यावी. ज्या तालुक्यांची बैठक अद्याप झाली नाही, त्यांनी ती त्वरित आयोजित करावी. मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप करून महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर राहूया. या योजनेसंदर्भात जिल्ह्यात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करू, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

महसूल पंधरवड्याचा लाभ द्या

महसूल पंधरवड्यानिमित्त प्रशासन सर्वसामान्यांपर्यंत पोचवत नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ द्यावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. महसूल पंधरवड्यात शेतकऱ्यांविषयी राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा. दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांना प्रत्यक्ष लाभ द्यावा. यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांना सूचना द्याव्यात, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचाही आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT