Power Connection esakal
सातारा

मलकापूरला 'महावितरण'चा झटका; विभागात 670 वीज कनेक्शन बंद

राजेंद्र ननावरे

मलकापूर (सातारा) : लॉकडाउनमध्ये (corona lockdown) या विभागातील सहा गावांची वीज वितरण कंपनीची (Power Distribution Company) घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांची दोन कोटी ३२ लाख रुपये थकबाकी राहिली आहे. तर गावांच्या स्ट्रीटलाइट व पाणी कनेक्शनची (Water connection) थकबाकी एक कोटी ७० लाख रुपये आहे. या वसुलीचे वीज वितरण कंपनीपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. वसुलीसाठी कंपनीने कनेक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला असून, आत्तापर्यंत ६७० कनेक्शन बंद करण्यात आलेली आहेत. (670 Power Connection In Malkapur Division Closed Satara Marathi News)

वीज वितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात मलकापूर, कोयना वसाहत, जखिणवाडी, नांदलापूर, कापील, गोळेश्वर या सहा गावांत वीजपुरवठा करण्यात येतो.

वीज वितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात मलकापूर, कोयना वसाहत, जखिणवाडी, नांदलापूर, कापील, गोळेश्वर या सहा गावांत वीजपुरवठा करण्यात येतो. या विभागांमध्ये २२ हजार ग्राहकसंख्या आहे. त्यापैकी चार हजार ६५८ ग्राहकांकडे दोन कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी आहे. ४००० ग्राहकांनी वीजबिल भरले नसून त्यांच्याकडे एक कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी आहे. लवकरच या चार हजार ग्राहकांवर कनेक्शन तोडण्याची कारवाई होणार आहे.

घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसोबतच या गावांतील स्ट्रीटलाइटची ४१ कनेक्शन आहेत, तर पाणी कनेक्शन १७ आहेत. स्ट्रीटलाइट व पाणी कनेक्शनचे एक कोटी ७० लाखांचे वीजबिल थकीत आहे. वीज वितरण कंपनीकडून ४१ स्ट्रीटलाइट कनेक्शन कट केल्याने अनेक गावांतील रस्त्यांवर अंधार आहे. सार्वजनिक पाणी पुरवठ्याची वीजबिले निम्म्याने भरल्यामुळे ती तोडण्यात आलेली नाहीत. १५ व्या वित्त आयोगातून गावांना जो निधी मिळत आहे, त्या निधीतून वीजबिल भरावे, असे आवाहन वीज वितरण कंपनीकडून करण्यात येत आहे.

घरगुती उपकरणांसह इतर प्रत्येक उपकरणाला वीज आवश्यक आहे. त्यामुळे विजेचे बिल भरणे गरजेचे आहे. बिल न भरल्यास नाईलाजास्तव वीज कनेक्शन तोडावे लागणार आहे. तरी वीजबिल भरून सहकार्य करा व कठोर कारवाई टाळा.

युवराज धर्मे, शाखा अभियंता, मलकापूर

670 Power Connection In Malkapur Division Closed Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT