Satara Sakal
सातारा

पाटण तालुक्यात पीक काढणीला वेग; सोयाबीनची काढणी पूर्णत्वाकडे

नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याने या खरीप हंगामात उत्पादनात घट होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाटण : पाटण (patan) तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील पिकांच्या काढणीस वेग आला आहे. सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात असून, कमी कालावधीच्या भात पिकांची काढणी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. जूनपासून नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याने या खरीप हंगामात उत्पादनात घट होणार आहे.

खरीप हंगामाची सुरुवात जून महिन्यात चक्रीवादळाने झाली. खरिपासाठी तयार केलेली शेती चाटून गेली. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी शेतांची डागडुजी करून खरीप पेरण्या पूर्ण केलेल्या पिकांची उगवण चांगली झाली व कोळपणी व भांगलणीची कामे शेतकऱ्यांनी उरकून घेतली. २२ जुलै रोजी अतिवृष्टी झाली आणि ढगफुटीसारख्या झालेल्या पावसाने शेतकऱ्यांवर दुसरी आपत्ती कोसळली. नाले व ओढ्यांनी दिशा बदलल्या आणि हजारो एकर क्षेत्रावर दगड मातीचा भराव साचला. पेरणी केलेली व दमदार आलेली पिके गाडली गेली. दोन दिवसांत होत्याचे नव्हते झाले.

पावसाने चार दिवस हजेरी लावून विश्रांती घेतली. दोन आपत्तीतून वाचलेल्या पिकांना ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सलग पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला. सलग चार महिने खरीप हंगामातील पिकांनी आपत्तीचा सामना केला. तीन आपत्तीतून वाचलेल्या पिकांची काढणी सप्टेंबरअखेर सोयाबीन काढणीने झाली. सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात असून, याच काळात वरी, भुईमूग, उडीद, मूग व कडधान्ये पिकांची काढणी शेतकऱ्यांनी उरकून घेतली आहे. सध्या कमी कालावधीच्या भात पिकांच्या काढणीस वेग आला आहे. मजुरांची टंचाई जाणवत असल्याने शेतकरी हार्वेस्टरची मदत घेऊन भाताची काढणी करत आहेत.पाटण तालुक्यात पीक काढणीला वेग; सोयाबीनची काढणी पूर्णत्वाकडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT