Adhikrao Mane Success Story esakal
सातारा

Success Story : वावर हाय, तर पावर हाय! शेतकऱ्यानं 55 गुंठ्यांत घेतलं 45 पोती भुईमुगाचं उत्पादन

मानेगाव येथील शेतकरी अधिकराव माने यांची प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख आहे.

सकाळ डिजिटल टीम

१२ ट्रेलर शेणखत व चार ट्रेलर पोल्ट्री खत शेतात विस्कटून मातीत मिक्स करून घेतले.

ढेबेवाडी : कडक ऊन, मुंग्या व किडीचा प्रादुर्भाव अशा विविध कारणांनी उन्हाळी भुईमुगाचे पीक यावर्षी अडचणीत आल्याने उत्पादनात मोठी घट झाल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. मात्र, मानेगाव (ता. पाटण) येथील प्रगतशील शेतकरी अधिकराव माने यांनी मात्र योग्य नियोजन व विविध उपाय योजनांद्वारे ५५ गुंठ्यांत ४५ पोती शेंगांचे उत्पादन घेतले आहे.

त्यांच्या वाळविलेल्या शेंगांना मागणीही मोठी आहे. मानेगाव येथील शेतकरी अधिकराव माने यांची प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख आहे. यंदाच्या उन्हाळ्यात त्यांनी उन्हाळी भुईमुगाच्या पिकासाठी आव्हानात्मक परिस्थिती असतानाही भरघोस उत्पादन घेतले. त्यांनी ऊस खोडवा निघाल्यानंतर ५५ गुंठे शेत रोटर मारून व पलटी देऊन तयार केले. १२ ट्रेलर शेणखत व चार ट्रेलर पोल्ट्री खत शेतात विस्कटून मातीत मिक्स करून घेतले.

‘कस्तुरी १०८’ भुईमूग बियाण्याची निवड करून पेरणी केली. आवश्यक खतांच्या मात्रा दिल्या. मशागत व फवारणी वेळच्या वेळी केलीच, शिवाय त्यांनी ताक, अंडी, गूळ यापासून तयार केलेला फॉर्म्युला खूपच परिणामकारक ठरला. १३० दिवसांनी पीक हातात आले. ४५ पोत्यांचे उत्पादन मिळाले. यामध्ये मुलगा विजय, पत्नी कल्पना, भाऊ सुभाष, भावजय निर्मला व कुटुंबातील सर्वांचाच हातभार, सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.

उन्हाळी भुईमुगासाठी यंदा सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती असतानाही भरघोस उत्पादन मिळाले. त्यासाठी योग्य नियोजन महत्त्वाचे ठरले. काढणी केलेल्या भुईमुगाचे डहाळे शेंगा तोडल्यानंतर वाळवून रचून ठेवले आहेत.

- अधिकराव माने प्रगतशील शेतकरी, मानेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : विशाळगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात; मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

Mumbai Water Supply: मुंबईवर कपातीचे संकट! धरणांनी गाठला तळ, अत्यल्प पावसामुळे चिंता

Video Viral: जग पाहता येत नाही... पण बापाच्या शब्दांनी रोनाल्डोचा गोल अनुभवला; लेकाची रिअ‍ॅक्शन डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT