koyna Dam 
सातारा

तब्बल सहा दशकानंतर कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित

विजय लाड

कोयनानगर (सातारा) : कोयना धरणातील बाधित प्रकल्पग्रस्तांची तब्बल सहा दशकांनंतर संकलन यादी शासनाने अखेर जाहीर केली. पाटण, जावळी व महाबळेश्वर तालुक्‍यांतील 98 गावांतील 187 गावठाणांत नऊ हजार 800 पात्र खातेदार प्रकल्पग्रस्त आहेत, असे शासनाने यादीत जाहीर केले आहे. अद्यापही अनेक पात्र प्रकल्पग्रस्त यादीतून वंचित आहेत. सहा दशकांपासून कोयना प्रकल्पग्रस्त पुनर्वसनापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे खातेदारांच्या यादीमुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

श्रमिक मुक्ती दलाचे कोयना विभागप्रमुख महेश शेलार, सचिन कदम यांनी संकलन यादीबाबत माहिती दिली. कोयना काठावरील 98 गावे व 187 वाड्या-वस्त्यांनी त्याग केल्याने कोयना धरणाची निर्मिती झाली. मात्र, त्यासाठी योगदान देणारे प्रकल्पग्रस्त अद्यापही सहा दशकांपासून वंचित आहेत. त्यांना कशाचाही फायदा होऊ शकलेला नाही. कोयना धरणग्रस्तांचा त्यासाठी अखंडित लढा सुरूच आहे. सहा जिल्ह्यांत कोयना प्रकल्पग्रस्त विखुरलेले आहेत. त्यांना एकत्रित आणण्यापासून त्यांच्या मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दल हे पाच वर्षांपासून आंदोलने करत आहे. 

कोयना प्रकल्पास लाभक्षेत्र नाही. त्यामुळे सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सोलापूर, पालघर जिल्ह्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन विखुरलेले आहे. प्रकल्पावेळी पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे त्याचा फटका त्यांना बसत आहे. प्रकल्पासाठी 25 हजार 599 हेक्‍टर क्षेत्र संपादित झाले आहे. त्यात 187 पुनर्वसित गावठाणे आहेत. त्यात केवळ 9 हजार 171 खातेदार आहेत. 7 हजार 30 खातेदारांना पर्यायी जमीन वाटप केली आहे. 1 हजार 173 खातेदार अद्यापही वंचित आहेत. शासनाकडे त्याची नोंद आहे.
 
या प्रश्नावर श्रमिक मुक्ती दलाने अन्नत्याग आंदोलन केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक घेतली. तो प्रश्न 15 ऑगस्टपर्यंत निकालात काढण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार शासनाने सहा दशकांनंतर कोयना प्रकल्पग्रस्तांची संकलन यादी तयार केली आहे. त्या संकलन यादीत 9 हजार 800 पात्र प्रकल्पग्रस्त आहेत. त्यात पाटणला 343, जावळीला 2 हजार 804, महाबळेश्वरला 3 हजार 614 प्रकल्पग्रस्त आहेत. 

श्रमिक मुक्ती दलाचे कोयना विभागप्रमुख महेश शेलार म्हणाले, सहा दशकांपासून पुनर्वसन व त्याच्या अन्य सुविधांपासून वंचित राहिलेल्या कोयना धरणग्रस्तांना श्रमिक मुक्ती दलामुळे दिशा मिळाली. त्यामुळे संकलन यादी तयार झाली आहे. उर्वरित प्रश्न शासनाने हातावेगळे करावेत. 


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: भारताच्या फिरकी जाळ्यात अडकले ऑस्ट्रेलियन्स! चौथा T20I जिंकून टीम इंडियाची मालिकेत आघाडी

Ausa News : अतिवृष्टीत सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांच्या लेकींचा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाहो

Dy Chief Minister Attacked: धक्कादायक! आधी निदर्शने, नंतर उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, बिहारमध्ये नेमकं काय घडलं?

Solapur Crime : बार्शीत दारु पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात दारुच्या बाटल्या फोडल्या. दोघांविरोधात गुन्हा दाखल!

IND A vs SA A, Test: रिषभ पंतसमोर 'तडगा' स्पर्धक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पठ्ठ्याचं झुंजार शतक, भारताच्या कसोटी संघासाठी ठोकला दावा

SCROLL FOR NEXT