MLA Makarand Patil met Sharad Pawar GovindBaug Baramati esakal
सातारा

अजितदादांचं टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' आमदारानं अचानक घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

अजित पवार गटाचे आमदार पाटील यांच्या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

अशपाक पटेल

राष्ट्रवादी पक्षातून शरद पवार व अजित पवार गट यांनी आपली वेगळी चूल मांडली.

खंडाळा : अजित पवार गटाचे (Ajit Pawar) आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांनी बारामती (जि. पुणे) येथील गोविंदबाग (Govind Baug Baramati) इथं ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची आपल्या कार्यकर्त्यांसोबत भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला मोठे उधाण आले आहे.

ही भेट खासगी व दिवाळीनिमित्त घेतली असल्याचे सांगण्यात आले असले तरी, अजित पवार गटाचे आमदार पाटील यांच्या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. आमदार पाटील यांनी बुधवारी शरद पवार यांची सुमारे पाऊण तास विधानसभेच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, मुंबई बाजार समितीचे बाळासाहेब सोळसकर व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षातून शरद पवार व अजित पवार गट यांनी आपली वेगळी चूल मांडली. त्यावेळी शरद पवार प्रथमच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, जिल्ह्याच्या सीमेवर शिंदेवाडी - शिरवळ येथून शरद पवार यांच्या गाडीत बसून आमदार पाटील यांनी प्रवास केला होता.

यावेळी ही मोठी चर्चा घडली होती. यानतंर आज ही दिवाळीच्या मोक्यावर शरद पवार यांची पाटील यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा घडून आल्याने, वाई - खंडाळा - महाबळेश्वर या विधानसभासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT