Ajit Pawar
Ajit Pawar sakal
सातारा

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा

सातारा : विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) येत्या सोमवारी (ता. ३) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले(savitribai phule) यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमापासून त्यांच्या दौऱ्यास सुरुवात होणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता या दौऱ्यातील कार्यक्रमांत कोरोना नियमावलीचे पालन करण्याबाबतची काळजी जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली.

उपमुख्यमंत्री पवार यांचे सोमवारी सकाळी दहा वाजता नायगाव (ता. खंडाळा) येथे आगमन होईल. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व इतर कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी अडीच वाजता ते वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन व भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता रहिमतपूर पालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या उद्‌घाटनास ते उपस्थित राहतील. त्यानंतर साडेचार वाजता ते धामणेर येथील विकास सोसायटीच्या कार्यालयाचे उद्‌घाटनास उपस्थित राहतील. सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवनाच्या नूतनीकरणाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT