Anil Waichal esakal
सातारा

'खवळलेल्या समुद्राच्या डोंगरएवढ्या लाटांत सगळं उध्दवस्त झालं; जिवाभावाची माणसंही गेली'

राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : खवळलेल्या समुद्रात उसळणाऱ्या उंच उंच लाटांशी झुंजताना हिंमत हरली नव्हती म्हणूनच बचावलो. जीव वाचल्याचा आनंद जरूर आहे. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहिलेले अनेक सहकारी या अस्मानी संकटातून परतले नाहीत, हे दुःख न संपणारे आहे. ज्यांच्यासमवेत आयुष्यातील सुख-दुःखाचे अनेक क्षण व्यतित केले, त्या माझ्या सोबत्यांना आता कुठे शोधू, अशा शब्दात तौक्ते चक्रीवादळाशी (Cyclone Tauktae) दहा तास झुंज देऊन सुखरूप घरी परतलेल्या अनिल निवृत्ती वायचळ (Anil Waichal) यांनी आज आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. (Anil Waichal Battled With The Cyclone Tauktae Till Ten Hours)

खवळलेल्या समुद्रात उसळलेल्या डोंगरएवढ्या लाटांत कोण कुठे भरकटले? हे कळालेसुद्धा नाही. एकमेकांना पकडलेले हातही नंतर सुटले.

मूळचे वायचळवाडी (कुंभारगाव, ता. पाटण) गावचे अनिल वायचळ बुधवारी (ता.19) घणसोली (मुंबई) येथील आपल्या घरी सुखरूप परतले असून, गावाकडच्या मुंबईस्थित मंडळींसह अनेकजण त्यांना भेटून अचाट धैर्य व कामगिरीचे कौतुक करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनात साठून राहिलेल्या भावनांना अनिल यांनी आज 'ई-सकाळ'शी बोलताना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले, "मुंबईत अँफकॉन इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड कंपनीत (Afcons Infrastructure Limited Company) वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत असल्याने कंपनीच्या कामासाठी समुद्रात वारंवार टीमसोबत आमचे जाणे होते. परंतु, असा जीवघेणा प्रसंग प्रथमच वाट्याला आला. त्यादिवशी कंपनीच्या 13 इंजिनिअरसह 261 जण तेथे होतो. बार्ज बुडताना सर्वांनी समुद्रात उड्या टाकल्या, माझ्यासोबत साताऱ्यातील एक सहकारीही त्यावेळी होता.

खवळलेल्या समुद्रात उसळलेल्या डोंगरएवढ्या लाटांत कोण कुठे भरकटले? हे कळालेसुद्धा नाही. एकमेकांना पकडलेले हातही नंतर सुटले. दहा तास पाण्यावर तरंगल्यावर बचाव पथकाच्या दृष्टीस पडलो. जीवघेण्या प्रसंगातून बचावून घरी आलोय. थोडे वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर आता प्रकृती ठिकठाक आहे. जीव वाचल्याचा आनंद तर आहेच; परंतु जिवाभावाचे सोबती गमावल्याचे दुःख कसे पचवू? त्यांच्यासमवेत व्यतित केलेले क्षण, सुख-दुःखाच्या चर्चा कशा विसरू? त्यांच्याबद्दल विचारणा करणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना मी काय सांगू?

"जिवाभावाचे सहकारी गमावल्याचं दुःख मोठं आहे. पुढे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा आधार मिळेलही. परंतु, गेलेला माणूस परत येणार नाही, हे आम्हा सर्वांसाठीच दुःखदायक वास्तव आहे.''

-अनिल वायचळ

Anil Waichal Battled With The Cyclone Tauktae Till Ten Hours

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT