Satara 
सातारा

महाराष्ट्रातील `या` शिक्षणाधिकाऱ्यांचे स्मार्ट फोन दानचे आवाहन

सुनील शेडगे

सातारा (जि. सातारा) : लॉकडाउनच्या काळानंतर शाळांच्या, शिक्षणाच्या वाटचालीपुढे प्रश्नचिन्हे उभी राहिलेली आहेत. त्यातून "व्हर्च्युअल एज्युकेशन'ची संकल्पना पुढे येत आहे. मात्र, ग्रामीण भागातील गरीब मुलांसाठी हे शिक्षणही आव्हान ठरत आहे. या पार्श्वभूमीवर (माध्यमिक) शिक्षणाधिकाऱ्यांनी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांना मदतीबाबत कळकळीचे आवाहनपत्र लिहिले आहे. 

सातारा जिल्ह्यात एकूण 814 माध्यमिक अन्‌ उच्च माध्यमिक शाळा आहेत. त्यात 554 अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांचा समावेश आहे. या शाळांतून सुमारे तीन लाख 25 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. जिल्ह्यातील बहुतेक शाळा ग्रामीण भागातील आहेत. बहुतेक विद्यार्थ्यांची परिस्थितीही बेताची आहे. सुमारे 32 टक्के पालकांकडे "लर्निंग फ्रॉम होम' या उपक्रमासाठी आवश्‍यक असलेले स्मार्ट फोन वा टॅब उपलब्ध नाहीत. लर्निग फ्रॉम होम पर्याय वापरावा लागल्यास काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर यांनी मदतीविषयी आवाहनपत्र लिहिले आहे.

पत्रात ते लिहितात, ""कोरोनाजन्य परिस्थितीमुळे सध्या शिक्षण क्षेत्रापुढे अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. शाळा सुरू करण्याबाबत राज्यभर विचारमंथन सुरू आहे. याबाबत शासन आदेशाची प्रतीक्षा आहे. सद्य:स्थितीत दोन सत्रांमध्ये किंवा दिवसाआड शाळा भरविणे, दूरचित्रवाणी, आकाशवाणीवर पाठ सुरू करणे अथवा व्हर्च्युअल पध्दतीने शाळा सुरू करणे असे अनेक पर्याय पुढे येत आहेत. या स्थितीत विद्यार्थी शिक्षणाच्या परिघात राहणे हे महत्त्वाचे आहे.'' 
ते पुढे लिहितात, ""स्मार्ट फोन हे बहुउपयोगी साधन आहे. शैक्षणिक साधन म्हणूनही त्याचा चांगला उपयोग करता येऊ शकतो. स्मार्ट फोन वा टॅबव्दारे व्हर्च्युअल शिक्षण हा एक सर्वोत्तम नसला तरी एक चांगला पर्याय आहे. "लर्निंग फ्रॉम होम' ही संकल्पना काहीशी वेगळी वाटत असली तरी सध्याच्या काळाशी सुसंगत ठरणारी आहे. अर्थात त्यासाठी स्मार्ट फोन, टॅबसारख्या साधनांची आवश्‍यकता आहे. शाळांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, सुमारे 32 टक्के पालकांकडे "लर्निंग फ्रॉम होम' या उपक्रमासाठी आवश्‍यक असलेले स्मार्ट फोन वा टॅब उपलब्ध नाहीत. हा पर्याय वापरावा लागल्यास काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे.

या पार्श्वभूमीवर समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी सामाजिक संस्था किंवा विविध औद्योगिक संस्थांवर महत्त्वपूर्ण जबाबदारी येऊन ठेपली आहे. त्यांनी पुढाकार घेऊन गरजू, गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन, टॅब उपलब्ध करून दिले तर वंचितांच्या शिक्षणाला गती लाभणार आहे. प्रगतीचे एक पाऊल आणखी पुढे पडणार आहे. शिक्षणासाठी धावणाऱ्या पावलांत आणखी बळ येणार आहे,' असे या पत्रात म्हटले आहे. 

""अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. आता त्या जोडीला आरोग्य व शिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. मूलभूत गरजांची पूर्तता करण्याची ज्यांना भ्रांत आहे, ते स्मार्ट फोन वा टॅब कोठून आणणार? त्यासाठी लागणारा नेटपॅकही कसा उपलब्ध करणार? त्यामुळे विद्यार्थ्यांची गरज ओळखून आपण पुढे यावे, ही विनंती आहे.'' 

-शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रातून... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB चा फलंदाज Unstoppable ! १४ चेंडूंत ६४ धावा कुटून संघाला मिळवून दिला दणदणीत विजय; KKR ला होतोय पश्चाताप

Latest Maharashtra News Updates : मराठा आरक्षणावरील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर डबल बेड मॅट्रेस अन् सोफ्यासह दुरुस्तीचा खर्च तब्बल ४० लाख; इतकी उधळपट्टी कशाला? विरोधकांचा सवाल

Gemini Photo Trend : गुगल जेमिनीवर तुम्ही फोटो बनवताय, पण त्या फोटोचे पुढे काय होते? खरंच यामुळे डेटा लिक होतो का..जाणून घ्या सत्य

Maruti car price cut : दसरा, दिवाळीच्या आधी ‘मारूती’चा बडा धमका! कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर

SCROLL FOR NEXT