satara sakal
सातारा

Army Jawan Accident : सातारचा जवान मयुर यादव यांचे पंजाबमध्ये अपघाती निधन

अंबाला येथील कॅम्प येथे शनिवारी (ता.१५) दुचाकीवरून ते त्यांच्या अन्य एका सहकाऱ्यासोबत जात होते. त्यावेळी गतीरोधकावरून दुचाकी जात असताना जवान मयुर खाली पडले. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा पोहोचल्याने उपचारासाठी त्यांना तेथील लष्कराच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते

आयाज मुल्ला

वडूज - येथील जवान मयुर जयंत यादव ( वय २९ ) यांचे अंबाला ( पंजाब) कॅम्प येथे देशसेवा बजावतानाअपघाती निधन झाले. या घटनेने शहरावर शोककळा पसरली आहे. मयुर यांचे पार्थिव उद्या ( मंगळवारी ता.१८) दुपारी बारा वाजेपर्यंत येथे येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयुर हे २०१५ साली लष्करात भरती झाले होते. ते सद्या १४५ बटालियन मध्ये लान्स नायक या पदावर कार्यरत होते.

अंबाला येथील कॅम्प येथे शनिवारी (ता.१५) दुचाकीवरून ते त्यांच्या अन्य एका सहकाऱ्यासोबत जात होते. त्यावेळी गतीरोधकावरून दुचाकी जात असताना जवान मयुर खाली पडले. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा पोहोचल्याने उपचारासाठी त्यांना तेथील लष्कराच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

उपचारा दरम्यान आज (सोमवारी ता. १७ ) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.मृत जवान मयुर यादव यांचे दहावी पर्यंतचे शिक्षणयेथील हुतात्मा परशुराम विद्यालयात झाले होते.मयूर यांचे पाच वर्षापूर्वी लग्न झाले होते.

त्यांच्या मागे आई,वडील, बंधू, पत्नी, तीन वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे. जवान मयूर यांचा येथे मोठा मित्र परिवार होता. तसेच त्यांचा सामाजिक कार्यातही सहभाग होता. त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच शहरावर शोककळा पसरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात पुराचा कहर; एकाचा मृत्यू, २४ तासांनंतरही शोध निष्फळ

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

सोहम बांदेकर अडकणार लग्नबंधनात! 'ही' मराठी अभिनेत्री होणार आदेश अन् सुचित्रा बांदेकरांची सून?

SCROLL FOR NEXT