सातारा

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच वाजला 'बॅंड'! वाचा, नेमका काय आहे प्रकार

उमेश बांबरे

सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे असंघटित कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. लग्न व इतर शुभकार्यात बॅंड व बेंजो वाजविण्यास मनाई केलेली आहे. त्यांच्याकडे उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन नसल्याने सध्या लॉकडाउन शिथिल केलेले असल्याने सुरक्षित अंतराचे पालन करत विविध लग्नकार्यात किमान दहा कलाकारांना बॅंड, बेंजो वाजविण्यास परवानगी मिळावी, या मागणीसाठी बॅंड, बेंजो चालक व कलाकार संघटनेने आज (ता. ७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बॅंड वाजवा आंदोलन केले. 

या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव जाधव व जिल्हाध्यक्ष सचिन वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन झाले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले, की प्रत्येक जिल्ह्यात 250 ते 300 बॅंड, बेंजो पथके कार्यरत आहेत. प्रत्येक पथकात 25 ते 30 कलाकार काम करतात. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात सहा ते सात हजार कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून आहेत. कोरोनाच्या काळात शासनाने बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगारांना आर्थिक मदत दिलेली आहे. त्याला विरोध नाही; पण असंघटित कलाकारांना दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

त्यामुळे शासनाने बॅंड व बेंजोवरील बंदी उठवून किमान दहा कलाकारांच्या उपस्थित सुरक्षित अंतराच्या माध्यमातून वाद्य वाजविण्यास परवानी द्यावी. या कलाकारांना असंघटित कामगारांप्रमाणे आर्थिक मदत द्यावी, बॅंड व बेंजो चालकांना बॅंकेची कर्ज हप्ते भागविण्यासाठी व पार्टीच्या देखभालीसाठी या अडचणीच्या काळात किमान पाच लाख रुपये बिनव्याजी मदत मिळावी, या लोककलेला मान्यता मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या वेळी संघटनेचे पदाधिकारी व कलाकार आंदोलनात सहभागी झाले होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banjara ST demand: मराठवाड्यात बंजारा समाजाविना निवडणूक जिंकून दाखवावी, हरीभाऊ राठोडांचा इशारा! ST मध्ये समाविष्ट करण्याची मागणी

Latest Marathi News Updates : मुक्ताईनगर तहसील कार्यालय घाणीच्या विळख्यात, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Vice President Oath 2025 : देशाचे १५ वे उपराष्ट्रपती बनले सीपी राधाकृष्णन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

Solapur Rain Update:'सोलापूरला पाण्याचा वेढा; १५० नगरांमध्ये पाणीच पाणी', घरांना नाल्याचे स्वरूप; आयुक्त, आमदारांकडून पाहणी

PM Kisan Yojana: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये येणार; नाव यादीत आहे का, कसं तपासाल?

SCROLL FOR NEXT