Artists esakal
सातारा

'शासनाकडून भिक नको, कलेची उपासना करण्याची परवानगी द्या'

हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : दार उघडा हो मायबाप सरकार, नाट्यगृहाचे (Theater) दरा उघडा.., सांस्कृतिक, पारंपरिक लोककलेचे कार्यक्रम सुरु करा, अशी विनवणी करत आज कऱ्हाड (जि. सातारा) येथील कलाकारांनी शासनाला साद घातली. दीड वर्षापासून नाट्यगृहे, सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ आलीय. त्यातून वाचण्यासाठी आम्हाला शासनाकडून (Maharashtra Government) भिक नको, मात्र कलेची उपासना करण्याची परवानगी मिळावी, अशी विनवणी कलाकारांनी आज केली.

दीड वर्षांपासून नाट्यगृहे, सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ आलीय.

येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात कलाकारांनी एकत्र येत नटराजाची आरती केली. त्यानंतर शासनाला नाट्यगृहे, सांस्कृतिक कार्यक्रम (Cultural Events) सुरु करण्याचे आर्त विनवणी केली. यावेळी जुगलकिशोर ओझा, नितीन बनसोडे-करवडीकर, कला दिग्दर्शक वासू पाटील, ओंकार आपटे, प्रदीप हर्षे, प्रशांत कुलकर्णी, नाट्य विक्रेते प्रमोद गरगटे, सुनिल परदेशी यांच्यासह कलाकार उपस्थित होते.

सध्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आहे, त्यांच्या घरातील एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या अंत्यसंस्कारासाठीही पैसे नाहीत, जगण्याचीही आबाळ झाली आहे, त्याकडे सरकारनं लक्ष द्यावं, अशा व्यथा मांडून सरकारला हे कार्यक्रम सुरु करण्यासाठी तातडीने परवानगी द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushant Singh Rajput case : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीला ‘CBI’कडून क्लीन चिट, मात्र आता...

US Accident: अमेरिकेत भारतीय ट्रक चालकाची अनेक गाड्यांना धडक, घटनेत ३ जणांचा मृत्यू, भयंकर अपघाताचा व्हिडिओ समोर

Plane Crash Explosion Video : भयानक विमान दुर्घटना! उड्डाण घेताच मोठा स्फोट अन् क्षणात आगीच्या गोळ्यात रूपांतर

Akola News : खासगी रुग्णालयात तरुणाने जीवन संपवलं; कारण अस्पष्ट; परिसरात खळबळ

Latest Marathi News Live Update : मुंबईतील नॅशनल इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे SMS Envoclean Pvt. Ltd. कंपनीला जाब

SCROLL FOR NEXT