सातारा

'डॉ. आंबेडकर विद्यार्थी दिवस'साठी केंद्राला पाठवणार सव्वा लाख पत्र : जावळे

सकाळवृत्तसेवा

सातारा : राज्य सरकरने तीन वर्षांपूर्वी सात नोव्हेंबर हा दिवस डॉ. आंबेडकर विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केला. आता देशभरात दिवस साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने घोषणा करावी, या मागणीसाठी राज्यभरातून एक लाख 20 हजार पत्रे पाठविणार असल्याचे विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा साताऱ्यातून शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ झाला. सात नोव्हेंबर 1900 रोजी त्यांनी छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलमध्ये पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला. हा शाळा प्रवेश दिन "विद्यार्थी दिवस' म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांतून शासन स्तरावर साजरा करण्यासाठी 15 वर्षे राज्य सरकारकडे आग्रह धरला. या आग्रहाला दाद देत सरकारने तीन वर्षांपूर्वी विद्यार्थी दिवस घोषित केला. 

आता विद्यार्थी दिवस देशभरात साजरा करण्यासाठी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी अधिकृत घोषणा करण्याची आवश्‍यकता आहे. याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी चर्चा केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि चालना देण्याच्या दृष्टीने "विद्यार्थी दिवस' साजरा होणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे जावळे यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीवर पालकमंत्री आबिटकरांनी दिली सविस्तर माहिती

IND vs ENG 5th Test: ख्रिस वोक्स वेदनेने विव्हळत होता, करूण नायरने काय केले ते पाहा? Video Viral होताच, इंग्लिश चाहते...

औकातीत राहायचं हा... 'बनवाबनवी'च्या सेटवर जेव्हा सचिन पिळगावकरांनी लक्ष्मीकांत बेर्डेंना सुनावलेलं; असं काय घडलेलं?

Yavat Violence : पळा पळा ! अचानक आठवडी बाजारात तरुण घुसले अन्... यवतमध्ये दंगलीच्या अफवेमुळे शेतकरी, व्यापाऱ्यांचा उडाला थरकाप

Ganeshotsav 2025: आता रेल्वेत मिळणार उकडीचे मोदक! प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

SCROLL FOR NEXT