सातारा

सातारा: भूस्खलनग्रस्तांचे पुनर्वसन आले टप्‍प्यात

विजय लाड ः सकाळ वृत्तसेवा

लवकरच त्यांचे त्यात पुनर्वसन केले जाणार आहे.

कोयनानगर (सातारा): कोयना विभागात २२ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी गावांवर भूस्खलन झाले. त्यामुळे तेथील लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी शासनाने कोयनानगर येथे १५० खोल्या दुरुस्त करून तयार केल्या आहेत. लवकरच त्यांचे त्यात पुनर्वसन केले जाणार आहे.

कोयना विभागात २२ जुलै रोजी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या गावांवर भूस्खलन होऊन आपत्तीचा डोंगर काळ बनून गावांवर कोसळला. त्यात मिरगावचे ११, ढोकावळेचे पाच तर हुंबरळीतील एक असे १७ लोक गाडले गेले होते. त्यामुळे तीन गावांचे अस्‍तित्व धोक्यात आले. या तीन गावांतील सर्वांना कोयनानगर, चाफेर, मिरगाव येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत तर हुंबरळी येथील लोकांना पर्यटन महामंडळ व खासगी मालकाच्या रिसॉर्टमध्ये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

कोयना प्रकल्पाच्या शासकीय वसाहतीतील १५० मोडक्या खोल्या दुरुस्त करून त्यात आपत्तीग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सूचना केल्या होत्या. त्यानुसार मोडकळीस आलेल्या खोल्या तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १५० खोल्या कोयनानगर येथे तयार झाल्या आहेत. दोन महिन्यांनंतर आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन त्यामुळे टप्‍प्यात आले आहे. तेथे तीन गावांतील लोकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. चार ऑक्टोबरपासून दीड वर्षापासून बंद असलेली सर्व विद्यालये सुरू होत आहेत. विद्यालय सुरू करण्यासाठी या विद्यालयात असणारे आपत्तीग्रस्त अन्यत्र स्थलांतरित करणे गरजेचे आहे. तात्पुरते निवासस्थान पूर्ण झाल्याने आपत्तीग्रस्तांचे या निवासस्थानी तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी महसूल प्रशासनाने कंबर कसली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT