Panchgani Mahabaleshwar Marriage Ceremony esakal
सातारा

पाचगणीत विवाहाच्या निमित्ताने नेत्‍यांची मांदियाळी; आमदार मकरंद पाटलांच्या पुतण्‍याचा सोहळा थाटामाटात

विवाहासाठी (Wedding Ceremony) आज महाराष्ट्रातील दिग्गज नेतेमंडळींनी वधुवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी हजेरी लावली होती.

सकाळ डिजिटल टीम

स्वागत कमानीतून बाहेर पडल्यावर उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘शरद पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, शशिकांत शिंदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है...’अशी घोषणाबाजी केली.

सातारा : नववधू आणि वरावर अक्षता टाकण्‍याच्‍या निमित्ताने पाचगणीत आज राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीतील दिग्गज नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली; परंतु या दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्‍ये अंतर असल्‍याचे जाणवले. निमित्त होते वाईचे आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) याच्या पुतण्याच्या लग्नाचे.

मकरंद पाटील यांचे बंधू मिलिंद पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव उत्कर्ष व नांदेड जिल्ह्यातील सिंधी येथील व्ही. पी. के उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव पाटील कवळे यांची कन्या पूजा यांचा विवाह आज पाचगणीतील संजीवनी विद्यालयात धूमधडाक्यात झाला. विवाहासाठी (Wedding Ceremony) आज महाराष्ट्रातील दिग्गज नेतेमंडळींनी वधुवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी हजेरी लावली होती.

यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते प्रफुल्‍ल पटेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री शंभूराज देसाई, सातारा लोकसभेचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, दीपक चव्हाण, महेश शिंदे, आनंदराव पाटील, सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासह सर्व राजकीय मंडळी उपस्थित होती. या सर्व दिग्गज नेत्यांचे स्वागत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, आमदार मकरंद पाटील व मिलिंद पाटील यांनी केले.

महाविकास आघाडी व महायुतीतील नेत्यांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार उदयनराजे भोसले एकमेकांच्या शेजारी बसले होते. दोघांत काहीवेळ चर्चा सुरू होती, तर आमदार शशिकांत शिंदे व माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर एकत्र बसले होते. दोघेही हास्यविनोदात रमले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे थोडे उशिरा समारंभस्थळी पोचले. सर्वांनी वधू-वरांना आशीर्वाद दिल्यानंतर सर्वजण लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले.

शरद पवारांच्या विजयाच्या घोषणा...

खासदार शरद पवार हे लग्न समारंभ उरकून बाहेर निघाले होते. स्वागत कमानीतून बाहेर पडल्यावर उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘शरद पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, शशिकांत शिंदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है...’अशी घोषणाबाजी केली.

महायुतीच्या नेत्यांची खलबते...

समारंभ उरकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र, महाबळेश्वरला मुक्कामी थांबले होते. यावेळी त्यांनी रात्री उशिरा खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई, महेश शिंदे, अमित कदम यांच्‍याशी एकत्रित बंद दाराआड चर्चा केली. त्यांनी निवडणुकीबाबत चर्चा करून शेवटच्या तीन दिवसांत करायची प्रचाराची रणनीती ठरवली. रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन कार्यक्रमस्थळी झाल्यानंतर त्यांनीही महायुतीचे उमेदवार उदयनराजेंच्या प्रचारासाठी अंतिम टप्प्यात घ्यायच्या सभांचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Metro News: मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी! 'या' दोन लाईनवरील रेल्वे सेवेच्या वेळेत बदल; कधी आणि का? जाणून घ्या...

विराट कोहली - रिषभ पंत BCCI चा नियम पाळणार! वनडे स्पर्धा खेळणासाठी संभावित संघात निवड

Mundhwa Land case: शीतल तेजवाणीचं आणखी घर आणि कार्यालय असण्याची शक्यता; पोलिसांच्या हाती काय लागलं?

Pune Protest : लोकमान्यनगर पुनर्विकासातील अनिश्चिततेविरोधात नागरिकांचा संताप उसळला; “हक्काचं घर” वाचवण्यासाठी जोरदार आंदोलन!

Maharashtra GST Strike : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतरही जीएसटी अधिकाऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT